आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी योजनास्कॉलरशिप - शिष्यवृत्तीस्पर्धा परीक्षा

सारथी संस्थेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजना २०२४-२५ करिता अर्ज केलेल्या सर्व अर्जदारांना पुन्हा ऑनलाईन अर्ज करण्याचे आव्हान !

दि.३०/१०/२०२३ रोजीच्या शासन निर्णय क्र. सा.न्या.वि.-२०२३/प्र.क्र.६० (४)/ बांधकामे अन्वये, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) व महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थांकरिता टी. आर. टी. आय या नोडल संस्थेमार्फत संबंधित संस्थांच्या लक्षित गटातील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अर्जदारांची एकत्रित Common Entrance Test (CET) घेण्याचे नियोजन आहे.

तरी सारथी संस्थेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजना २०२४-२५ करिता अर्ज केलेल्या सर्व अर्जदारांना आव्हान करण्यात येते कि, सदर ऑनलाईन अर्ज पुन्हा भरावा. (All Candidate who had applied previously for SARTHI’S UPSC (Civil Services) २०२४-२५, MPSC (State Services) २०२४-२५, MPSC Judicial Services (CJJD & JMFC) २०२४-२५, Staff Selection Commission (Non Gazetted) २०२४-२५ व IPBS, NABARD व इतर बैंकिंग परीक्षा २०२४-२५ must fill the Online form on given Link compulsorily.)

ज्या इच्छुक अर्जदारांनी यापूर्वी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी Online Application Form भरलेला नाही त्यांनी सुध्दा हा फॉर्म विहित मुदतीत भरावा. अर्ज भरण्यापूर्वी ‘मार्गदर्शक सूचना’ व्यवस्थित वाचून नंतरच अर्ज भरावा.

ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख: दि. ०३/०७/२०२४

सदर अर्ज भरण्यासाठी वाढीव मुदत दिली जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी व विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावा.

अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना सारधी, पुणे च्या संकेतस्थळावरील सूचना फलकवरील लिंकवर पहावी.

सदर विषयी भविष्यात कोणतीही माहिती/सूचना उपरोक्त लिंक वरच दिली जाईल. वृत्तपत्रात जाहिरात दिली जाणार नाही. इच्छुक उमेदवारांनी सारथीच्या संकेतस्थळावर सूचनाफलक पहावे.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

घोषणा (Notification): घोषणा पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

सारधी अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – NSFDC Scheme : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.