बीज प्रक्रिया मोहीम – २०२२-२३ – Seed processing campaign – 2022-23
राज्यात सन २०२१-२२ पर्यंत बीज प्रक्रिया मोहीम क्षेत्रीय स्तरावर विना अनुदानित तत्वावर लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर राबविली जात होती. सदर मोहिमेस शेतकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. मागील काही वर्षात विविध प्रशिक्षणे, कृषि सप्ताह, शेतीशाळा इ. च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या बीज प्रक्रिया मोहीमेचा अनुभव उत्साहवर्धक आहे. राज्यात सन २०२१-२२ मध्ये तूर व हरभरा पिकावर मर रोग, सोयाबीन पिकावर लीफ क्रिंकल व मोझॅक तसेच मुग, उडीद पिकावर लीफ क्रिंकल या रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला होता.
सदर रोगांमुळे शेतकऱ्यांच्या पीक संरक्षणावरील खर्च वाढून पिकाच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे तसेच पर्यायाने उत्पादनही घटत आहे. त्याकरीता बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक मोहिमेअंतर्गत अशा शेतकऱ्यांना स्वत: कडील/घरगुती वापरण्यात येणाऱ्या बियाण्यास बीज प्रक्रिया करण्यास प्रोत्साहित करून बीज प्रक्रियायुक्त बियाण्याची जास्त प्रमाणावर पेरणी करणे व बियाण्याव्दारे पसरणारे जीवाणूजन्य/विषाणूजन्य, बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भावाला आळा घालणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
वरील पार्श्वभूमिवर येत्या खरीप हंगामामध्ये बीज प्रक्रिया मोहीम राबवावयची आहे. त्यानुषंगाने क्रॉपसॅप सन २०२२-२३ प्रकल्पांतर्गत खरीप व रब्बी हंगामाध्ये राज्यातील भात, ज्वारी, मका, सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस, ऊस, उडीद आणि मुग व तेलबिया या प्रमुख पिकांसाठी बीजप्रक्रिया प्रात्याक्षिके कृषि सहाय्यक यांना नेमून दिलेल्या गावांमध्ये तसेच प्रामुख्याने कीड रोग प्रवण गावात राबविल्या जाणाऱ्या शेतीशाळेमध्ये राबविले जाणार आहेत.
अशाप्रकारे गावाच्या संपूर्ण पिक क्षेत्रावर बीज प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करावे. सदर मोहीम राबविताना तालुक्यातील गावांमध्ये १००% पिक क्षेत्रावर बीज प्रक्रिया मोहीम राबविण्यासाठी गावे निवडावीत व निवडलेल्या गावांमध्ये बीज प्रक्रिया मोहीम यशस्वीपणे राबविली जाईल याबाबत योग्य ते नियोजन व अमलबजावणी करावी.
बीज प्रक्रियेसाठी लागणारी रासायनिक व जैविक औषधे तसेच जैविक खते याबाबतच्या शिफारसी वरील संदर्भात उल्लेख केल्याप्रमाणे आहेत. त्यानुसार बीज प्रक्रियेकरीता लागणाऱ्या निविष्ठांची गरज निश्चित करावी व लागणारी औषधे स्थानिक पातळीवर उपलब्ध आहेत याची खातरजमा करावी. या कार्यक्रमाच्या प्रगतीबाबतचा अहवाल दर आठवडयास बीज प्रक्रिया मोहीम २०२२-२३ या नावाने उपलब्ध करून दिलेल्या गुगल स्प्रेडशीट वर अद्यावत करावा.
हेही वाचा – शासकीय मत्स्य बीज उत्पादन व संवर्धन केंद्रातील मत्स्य बीजांचे सुधारित दर जाहीर
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!