वृत्त विशेषसरकारी योजना

घरासाठी सोलर होम लाईट सिस्टम योजनेसाठी अर्ज सुरु – Solar Home Light System scheme Nandurbar

आदिवासी विकास विभागामार्फत केंद्र शासनाच्या वनबंधु कल्याण योजनेंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा यांच्या कार्यक्षेत्रातील अक्राणी तालुक्यातील विद्युतीकरण न झालेल्या गाव, पाड्यांमध्ये घरासाठी सोलर होम लाईट सिस्टम पुरवठा करण्यायसाठी पात्र अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून 13 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्यक कागदपत्रे आणि अटी:

वरील कागदपत्रे आणि अटी आवश्यक राहील. या योजनेतंर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी नंदुरबार यांनी अक्राणी तालुक्यातील विद्युतीकरण न झालेल्या गाव, पाड्यांची यादी सादर केल्यानुसार तेथील पात्र लाभार्थ्यांना सोलर होम लाईट सिस्टम (500 व्हॅट सोलर पॅनल मॉडेल 250*2, जीआय स्टॅअचर, 150 AH 12 व्हॅट सोलर टयूबलर बॅटरी, 1 के.व्ही. सोलर इनर्व्हटर, टयुब लाईट 20 व्हॅट, सिलींग फॅन 36 व्हॅट,(एक नग), टी.व्ही / मोबाईल चार्जिंग सॉकेट ) देणे प्रस्तावित आहे.

विद्युतीकरण न झालेल्या गाव, पाड्यांची यादी प्रकल्प कार्यालय,तळोदा तसेच पंचायत समिती, अक्राणी येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

योजनेचे अर्ज 30 मार्च 2022 पासून उपलब्ध असून अधिक माहितीसाठी (सुटीचे दिवस वगळून ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, शासकीय दुध डेअरीच्या मागे, शहादा रोड, तळोदा जि.नंदुरबार येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

हेही वाचा – घरगुती छपरावरील रूफटॉप सोलर अनुदान योजना सुरु, असा करा ऑनलाईन अर्ज – Apply Online for Solar Rooftop

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.