वृत्त विशेषमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी योजना

दि यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक लि.; विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजना २०२२

दि यवतमाळ अर्बन को – ऑप. बँक लि., यवतमाळ या बँकेस “विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजना” मंजूर करण्याबाबत सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी दिनांक २१.०३.२०२२ रोजीच्या पत्रान्वये शासनास प्रस्ताव सादर केला आहे. दि यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक लि., यवतमाळ या बँकेच्या ठेवी अदा करण्यासाठी थकीत कर्जाची वसुली होणे आवश्यक आहे.

त्यानुषंगाने विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजना मंजूर केल्यास बँकेचे वाढते एन.पी.ए. कमी होण्यास मदतच होईल. ही बाब विचारात घेता, दि यवतमाळ अर्बन को ऑप. बँक लि., यवतमाळ या बँकेस “विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजना” मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी दि. २१.०३.२०२२ रोजीच्या पत्राद्वारे दि यवतमाळ अर्बन को – ऑप. बँक लि., यवतमाळ या बँकेसंदर्भात सादर केलेल्या विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मंजूरी देण्याच्या प्रस्तावास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५७ मधील तरतूदीनुसार शासनास प्राप्त असलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील नियम ४९ च्या तरतुदीमधून सूट देऊन दि यवतमाळ अर्बन को – ऑप. बँक लि., यवतमाळ या बँकेच्या परिशिष्ट “अ” प्रमाणे नमूद विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मान्यता देण्यात येत आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीचा सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी दरमहा आढावा घेऊन भारतीय रिझर्व बँकेच्या अटींचे दि यवतमाळ अर्बन को – ऑप. बँक लि., यवतमाळ यांचेकडून काटेकोरपणे पालन होत असल्याची खात्री करावी असे शासन निर्णया मध्ये नमूद केले आहे.

दि यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक लि.; विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजना २०२२: 

१) योजनेसाठी पात्र कर्जदार: दि. ३१/०९/२०१९ अखेर अनुत्पादक कर्जाच्या सबस्टँडर्ड वर्गवारीत समाविष्ट झालेल्या व नंतर संशयित व बुडित वर्गवारीत गेलेल्या कर्जखात्यांना देखील ही योजना लागू होईल.

२) योजनेसाठी अपात्र कर्जदार: रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सदर योजना ही पुढील कर्जांना लागू होणार नाही.

अ) फसवणूक, गैरव्यवहार करून घेतलेली कर्जे व जाणिवपूर्वक थकविलेली कर्जे.

ब) रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचे अथवा आदेशांचे उल्लंघन करुन वितरीत केलेली कर्जे.

क) आजी व माजी संचालकांना व त्यांच्याशी हितसंबंध असणाऱ्या भागीदारी संस्था/ कंपन्या/संस्था यांना दिलेल्या कर्जाना अथवा त्यांची जामिनकी असणाऱ्या कर्जाना रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय सदर सवलत देता येणार नाही.

ड) मंजूर कर्जाचा विनियोग, कर्ज ज्या कारणाकरीता मंजूर केले असेल, त्या कारणाव्यतिरिक्त इतर कारणाकरीता केला असेल तर (Diversification of Funds) ही योजना लागू होणार नाही.

३) योजनेची मुदत :

या योजनेची मुदत दि. ३१ मार्च, २०२३ पर्यंत राहील. दि. २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जावर दि. ३१ मार्च २०२३ पर्यंत निर्णय घ्यावा लागेल.

४) योजनेची व्याप्ती:

अ) ही योजना सर्व प्रकारच्या कर्जांना तसेच कर्जाव्यतिरिक्त दिलेल्या तात्पुरती उचल मर्यादा, बील डिस्काऊंट व इतर आर्थिक सवलतींना लागू होईल.

ब) कोणत्याही कायद्या अंतर्गत कारवाई चालू असणाऱ्या व कलम १०१ अन्वये वसूली दाखला प्राप्त व कलम ९१ अन्वये निवाडे प्राप्त झालेल्या कर्जांनासुद्धा ही योजना लागू होईल.

क) जेथे कर्जदाराची एकापेक्षा जास्त कर्जखाती असतील व त्यापैकी एखादे/काही कर्जखाती अनुत्पादक झाली म्हणून इतर सर्व कर्जखाती समूह कर्जे म्हणून अनुत्पादक होतात. तर त्या समूह कर्जापैकी जे खाते/खाती प्रत्यक्षात अनुत्पादक झाली असतील केवळ त्याच खात्यांना एक रकमी कर्ज परतफेड योजनेची सवलत मिळेल.

५) योजनेसाठी तडजोडीचे सूत्र :

अ) ज्या दिवशी संबंधित कर्जखाते हे अनुत्पादक होईल त्या दिवशीचे येणे बाकी मुद्दल व व्याज अशी एकत्रित रक्कम येणे समजावी.

ब) वरील रकमेपैकी केवळ मुद्दल रकमेवर द.सा.द.शे. ८% दराने सरळ व्याज पद्धतीने तडजोडीच्या दिनांकापर्यंत व्याजाची आकारणी करावी.

क) वर कलम अ’ आणि ‘ब’ मध्ये नमूद केलेल्या एकत्रित रकमेतून कर्जदाराने अनुत्पादक कर्जाच्या ‘ तारखेनंतर भरणा केलेल्या रकमेची वजावट (अ अधिक ब मध्ये नमूद एकत्रित रकमेतून) दिल्यानंतर जी रक्कम येणे राहील ती तडजोड रक्कम ‘ समजावी.

परतफेड करण्यासाठी कालावधी :

अ) कर्जदाराने दि यवतमाळ अर्बन को – ऑप. बँक लि., यवतमाळ या बँकेच्या एकरकमी कर्ज परतफेड योजना २०२२ नुसार करावयाच्या अर्जासोबत, सदर कर्ज प्रकरण ज्या दिवशी अनुत्पादक झाले, त्या दिवशीच्या (मुद्दल+ व्याज) किमान ५% रक्कम भरणे आवश्यक आहे.

ब) सदर योजनेंतर्गत अर्ज मंजूरीचे पत्र प्राप्त झाल्यापासून कर्जदाराने एक महिन्याच्या आत तडजोडीची सर्व रक्कम भरणे आवश्यक आहे. बाकी सर्व अटी व शर्ती महाराष्ट्र शासनाच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेनुसार लागू राहतील.

शासन निर्णय: दि यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक लि., यवतमाळ या बँकेस विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजना लागू करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी २३० कोटी निधी वितरीत !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.