या १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत मिळणार, तुमचं नाव ऑनलइन यादि मध्ये चेक करा !
शासन निर्णयानुसार जाहीर झालेल्या दुष्काळ सदृश्य १५ जिल्ह्यांमधील ४० तालुके व या तालुक्यांव्यतिरिक्त १०२१ महसूल विभागातील, बाधित क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना ‘माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४’ मधील परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची यादी इ.१०वीसाठी इ.१२वीसाठी ऑनलाईन लिंकवर उपलब्ध करुन दिलेली आहे.
१०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत मिळणार, तुमचं नाव ऑनलइन यादि मध्ये चेक करा ! SSC HSC Fee Refund:
सदर लिंकवर पहिल्या रकान्यात विद्यार्थ्यांनी परीक्षा आवेदनपत्रामध्ये सादर केलेल्या माहितीच्या आधारे, माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव व सांकेतिक क्रमांक (Index Number), विद्यार्थ्याचे नाव, विद्यार्थ्याचे गाव, महसूल मंडळ, तालुका, जिल्हा, विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक, आधार क्रमांक, आवेदनपत्रामधे नमूद केलेला Bank Account Number, Bank IFSC code अशी माहिती उपलब्ध करुन दिली आहे. सदर माहितीमध्ये काही त्रुटी निदर्शनास आल्याने बॅंक खात्याचा तपशील नव्याने मागविण्यात येत आहे.
मुख्याध्यापक / प्राचार्य, माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांनी दुस-या रकान्यामध्ये नमूद केलेले पाच पात्रता निकष तपासून त्यापुढे बरोबर (√) असे दर्शविल्यानंतरच तो विद्यार्थी ह्या योजनेंतर्गत परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसाठी पात्र होणार आहे. अन्यथा सदर विद्यार्थी ह्या योजनेंतर्गत परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसाठी अपात्र ठरणार आहे.
पात्र झालेल्या विद्यार्थ्याच्या नावाखाली “Qualify” दर्शविले जाईल. त्यानंतर सदर विद्यार्थ्याची Bank Account ची माहिती भरण्यास रकाने उपलब्ध (enable) केले जातील. याच पध्दतीने सर्व पात्र विद्यार्थ्यांचे निश्चितीकरण करण्यात यावे. ह्या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची सर्व माहिती क्रमाने (Bank Account Number, Bank IFSC code,MICR code, खातेदाराचे नाव, खातेदाराचा आधार क्रमांक, खातेदाराचे लाभार्थ्याशी नाते इ.) नव्याने भरणे आवश्यक आहे. रकान्यातील सर्व माहिती परिपूर्ण / अचूकपणे भरण्यात यावी.
शासन निर्णय दि.१ ऑगस्ट २०१९ मधील अ.क्र.८ नुसार ही योजना स्वयं अर्थसहाय्यीत शाळा वगळता अन्य सर्व म्हणजे शासकीय / खाजगी अनुदानित / विना अनुदानित माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लागू राहील.
‘Qualified / Disqualified लाभार्थ्यांची यादी प्रमाणित (यादीच्या शेवटी सहा मुद्दे नमूद केले आहेत) केल्यानंतर ‘मुख्याध्यापक / प्राचार्य’ यांनी स्वाक्षरी upload करावयाची आहे. स्वाक्षरी upload केल्यानंतर submit हे बटन उपलब्ध होईल. त्यानुसार Bank Account चा तपशील प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती निर्धारित दि. १२ एप्रिल, २०२४ अखेर ऑनलाईन पध्दतीने राज्यमंडळास सादर (submit) करावयाची आहे. माहीती एकदा submit केल्यानंतर पुन:श्च submit करता येणार नाही. सदर माहिती ऑनलाइन पध्दतीने राज्यमंडळाकडे प्राप्त होणार आहे.
परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेंतर्गत सर्व अभिलेख (प्रमाणपत्र व Annexure ‘A’ ‘B’) हे संबंधित माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर जतन करण्यात यावेत. प्रिंट घेतलेले प्रमाणपत्र, प्रपत्र ‘अ’ व प्रपत्र ‘ब’ याची एक साक्षांकित प्रत संबधित विभागीय मंडळास सादर करावी.
परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती ही राज्यमंडळ स्तरावरुन NEFT / RTGS द्वारे विद्यार्थ्यांच्या / पालकांच्या आधार संलग्न Bank Account मध्ये वर्ग करण्य़ात येणार असल्याने, सदर माहिती उपलब्ध न झाल्यास अथवा चुकीची माहीती अथवा चुकीचा Bank Account दिल्यास सदर लाभापासून विद्यार्थी वंचित राहणार असल्याने परिपूर्ण माहिती निर्धारित कालावधीमध्ये भरण्याची दक्षता घेण्यात यावी. ही जबाबदारी पूर्णतः संबधित मुख्याध्यापक / प्राचार्य यांची राहील.
- इ. १० वीसाठी विद्यार्थ्यांची यादी पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट: इ. १० वीसाठी विद्यार्थ्यांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- इ. १२ वीसाठी विद्यार्थ्यांची यादी पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट: इ. १२ वीसाठी विद्यार्थ्यांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
सदर योजना नव्याने कार्यान्वित झाली असल्याने, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापक / प्राचार्य, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), विभागीय शिक्षण उपसंचालक आणि विभागीय सचिव, विभागीय मंडळ यांनी वैयक्तिक लक्ष घालून विहित कालावधीमध्ये राज्यमंडळाकडे माहिती सादर करणेबाबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे. उपरोक्त सर्व माहिती परिपूर्ण / अचूक भरल्याशिवाय पात्र लाभार्थ्यांना परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम वर्ग केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
हेही वाचा – कोटक सुरक्षा स्कॉलरशिप – Kotak Suraksha Scholarship 2024-25
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
Thanks
Exam fee