वृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) आयोजित संविधान दिनानिमित्त “राज्यस्तरीय निबंध स्पर्धा”

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योत), या महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत महाराष्ट्रातील सर्व समाजघटकांसाठी संविधान दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

महाज्योती राज्यस्तरीय निबंध स्पर्धा: 

गट अ

शिक्षण: १० वी पर्यंत

शब्द मर्यादा – ६५० ते ७०० शब्दांपर्यंत

पारितोषिक :

पहिला क्रमांक: रु. ५० हजार

दुसरा क्रमांक: रु. ३० हजार

तिसरा क्रमांक: रु. २० हजार

गट ब

शिक्षण: ११ वी ते पदव्युत्तर पदवी

शब्द मर्यादा: ११५० ते १२०० शब्दांपर्यंत

पारितोषिक:

पहिला क्रमांक: रु.७५ हजार

दुसरा क्रमांक: रु.५० हजार

तिसरा क्रमांक : रु. ३० हजार

गट क

शिक्षण : खुला गट

शब्द मर्यादा: २४५० ते २५०० शब्दांपर्यंत

पारितोषिक:

पहिला क्रमांक: रु.१ लाख

दुसरा क्रमांक: रु. ७५ हजार

तिसरा क्रमांक: रु.५० हजार

निबंधाचे विषय:

गट अ करिता निबंधाचे विषय:

१. भारतीय संविधानाचे महत्व
२. भारतीय संविधान व नागरिकांची कर्तव्ये
३. भारतीय संविधान पालनात माझी भूमिका

गट ब करिता निबंधाचे विषय:

१. भारतीय संविधान आणि नागरिकांचे हक्क
२. भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया
३. भारतीय संविधान व आजची परिस्थिती

गट क करिता निबंधाचे विषय

१. भारतीय संविधान व धर्मनिरपेक्षता
२. भारतीय संविधानाचे लोकशाही संवर्धनासाठी योगदान व भूमिका
३. भारतीय संविधानासमोरील आव्हाने व उपाय

स्पर्धेसाठी अटी व नियम:

१. निबंध हे स्व-हस्ताक्षरात व पानाच्या एकाच बाजूला लिहिलेला असावा. टंकलिखित निबंध बाद ठरविण्यात येतील.

२. निबंध हा शब्द मर्यादेत असावा, शब्द मर्यादेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

३. निबंध हा प्रत्यक्ष अथवा स्पीड पोस्टने किंवा रजिस्टर पोस्ट पोहच पावतीसह दि. ०७ डिसेंबर २०२१ पर्यंत नमूद पत्त्यावर पाठवावा. ईमेल ने कोणतेही निबंध स्वीकारले जाणार नाहीत.

४. गट अ व गट ब मधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळा/ महाविद्यालयाचे बोनाफाईड किंवा चालू वर्षाचे ओळखपत्र निबंधाच्या अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील.

५. निबंधाच्या पहिल्या पानावर निबंध लेखकाचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता पिनकोड सह, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक व निबंध स्वलिखित असल्याबाबत प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.

६. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

७.स्पर्धेबाबत सर्वाधिकार व्यवस्थापकीय संचालक यांना राहतील.

निबंध पोहचविण्याचा पत्ता:

व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), तिसरा माळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दीक्षाभूमी जवळ, श्रद्धानंद पेठ, नागपूर ४४००२२

अधिकृत अधिसूचना:

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत जरी केलेली अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

हेही वाचा – बॅंक, रेल्वे, एलआयसी, पोलिस, सैन्य भरती ई. स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण आणि शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरु

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.