स्वाईन फ्ल्यू आजारावरील रुग्णांना प्रलंबित वैद्यकीय खर्चाची प्रतीपुर्ती मिळणार
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दि. २० मार्च, २०१५ नुसार स्वाईन फ्ल्यू या आजाराने बाधित खाजगी रुग्णालयात गंभीरस्थितीत जीवनावश्यक प्रणालीवर उपचार घेतलेल्या रुग्णांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
संचालक, आरोग्य सेवा (हिवताप हत्तीरोग व जलजन्य रोग), पुणे यांनी शासनास सादर केलेल्या प्रस्तावानुसार स्वाईन फ्ल्यू या आजाराने बाधित गंभीरस्थितीत जीवनावश्यक प्रणालीवर खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांना सन २०१५ ते सन २०२१ पर्यंतची वैद्यकीय खर्चाची प्रलंबित देयकाची प्रतिपूर्ती यासाठी रु.१२५ लक्ष एवढया रकमेची पुरवणी मागणी सन २०२३ च्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आली होती. सदर पुरवणी मागणी (रु.१२५ लक्ष) व अर्थसंकल्पीय तरतूद (रु.२.२१ लक्ष) विचारात घेऊन, सुधारित अंदाज २०२३-२४ नुसार रु.१२७.२१ लक्ष यानुसार वित्त विभागाने रु.१२५.२३ लक्ष इतका निधी वितरीत करण्यास दिलेल्या मान्यतेनुसार रु.१२५.२३ लक्ष (अक्षरी रुपये एक कोटी पंचवीस लक्ष तेवीस हजार फक्त) एवढा निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
स्वाईन फ्ल्यू आजारावरील रुग्णांना प्रलंबित वैद्यकीय खर्चाची प्रतीपुर्ती मिळणार शासन निर्णयः-
शासन निर्णय दि.२० मार्च, २०१५ अन्वये राज्यातील खाजगी रुग्णालयात स्वाईन फ्ल्यू आजारावर ज्या रुग्णांनी गंभीरस्थितीत जीवनावश्यक प्रणाली किंवा तत्सम लाईफ सपोर्टवर (Ventilator) उपचार घेतले आहेत, अशा रुग्णांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्यास शासन मंजुरी देण्यात आली आहे. या शासन निर्णयान्वये स्वाईन फ्ल्यू या आजाराने बाधित गंभीरस्थितीत जीवनावश्यक प्रणालीवर खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांना सन २०१५ ते २०२१ पर्यंतची वैद्यकीय खर्चाची प्रलंबित देयकाची प्रतिपूर्ती करण्याकरिता रुपये १२५.२३ लक्ष (अक्षरी रुपये एक कोटी पंसवीस लक्ष तेवसी हजार फक्त) एवढा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सदर शासन निर्णयानुसार प्राप्त होणाऱ्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीचे प्रस्ताव मंजुरीसाठी दि. २० मार्च, २०१५ च्या शासन निर्णयातील अटी व शर्ती लागू राहतील. सदरील खर्च मागणी क्र. आर-१, २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य, राज्य योजनाअंतर्गत योजना, १०१-रोग प्रतिबंध व नियंत्रण, (०१)- रोग प्रतिबंध व नियंत्रण (०६) पटकी नियंत्रण कार्यक्रम (राज्य क्षेत्र), १३-कार्यालयीन खर्च, सांकेतांक (२२१००६२९) (अनिवार्य खर्च) या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.
तसेच, दि.२० मार्च २०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुरू करण्यात आलेली स्वाईन फ्ल्यू या आजाराने बाधित गंभीरस्थितीत जीवनावश्यक प्रणालीवर खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांना दि.१ एप्रिल, २०२२ पासून पूर्वलक्षी प्रभावाने या शासन निर्णयान्वये बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे यापुढील वैद्यकीय प्रतिपुर्ती देय राहणार नाही.
सदर निधीचे वितरण हे प्रस्तुत प्रलंबित देयकाची व्दिरुक्ती होणार नाही याची खात्री करण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग:
स्वाईन फ्ल्यू आजारावर खाजगी रुग्णालयात गंभीरस्थितीत जीवनावश्यक प्रणालीवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना प्रलंबित वैद्यकीय खर्चाची प्रतीपुर्ती अदा करणे बाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क उपचार; १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!