बोगस बियाणे विक्रीला बसणार आळा; सत्यप्रत बियाण्यांची विक्री साथी पोर्टलवरून करण्यास राज्य सरकारने दिली मान्यता!
कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे हित साधण्याचे काम राज्य शासन सातत्याने करत आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. खरीप २०२५ हंगामापासून सत्यप्रत बियाणे (Truthful Seeds) साथी पोर्टलवरून विक्री व वितरण करण्यास अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.
सत्यप्रत बियाण्यांची विक्री साथी पोर्टलवरून करण्यास राज्य सरकारने दिली मान्यता! – Truthful seeds:
बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि बियाण्यांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणणे, हा या निर्णयाचा मुख्य हेतू आहे. याअंतर्गत बियाण्यांचे उत्पादन, वितरण व विक्री यावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नियंत्रण ठेवले जाणार आहे.
साथी पोर्टलची पार्श्वभूमी:
साथी (Seed Authentication Traceability and Holistic Inventory) हे पोर्टल केंद्र शासनाने विकसित केले आहे. याचा उद्देश म्हणजे बियाण्यांच्या संपूर्ण प्रवासावर (उत्पादनापासून विक्रीपर्यंत) नियंत्रण ठेवणे आणि त्यांच्या गुणवत्तेची खात्री करणे. या पोर्टलच्या अंमलबजावणीला दोन टप्पे आहेत —
फेज १: बियाणे उत्पादन व प्रमाणीकरण प्रक्रिया
फेज २: बियाण्यांचे वितरण व विक्री
महाराष्ट्रात खरीप २०२३ पासून फेज १ प्रभावी करण्यात आला असून खरीप २०२४ पासून फेज २ सुरू झाला आहे. आता खरीप २०२५ पासून सर्व सत्यप्रत बियाणे (Truthful Seeds) विक्रीसाठीही साथी पोर्टलचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
सत्यप्रत बियाण्यांचे महत्त्व:
सत्यप्रत बियाणे (Truthful Seeds) म्हणजे खासगी कंपन्यांनी उत्पादित केलेले, प्रमाणित नसलेले पण संशोधन आधारित वाणांचे बियाणे. सध्या शेतकऱ्यांना उपलब्ध असणाऱ्या बियाण्यांपैकी सुमारे ७०-८०% बियाणे हे सत्यप्रत श्रेणीत मोडते. त्यामुळे सत्यप्रत (Truthful Seeds) बियाण्याच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक होते.
सत्यप्रत बियाणे (Truthful Seeds) साथी पोर्टलवरून विकल्यास पुढील फायदे अपेक्षित आहेत:
बियाण्याच्या स्रोतापासून विक्रीपर्यंत संपूर्ण शोधक्षमता (Traceability) वाढेल.
बियाण्याच्या गुणवत्तेबाबत पारदर्शकता राहील.
निकृष्ट, कालबाह्य किंवा बेकायदेशीर बियाण्यांच्या विक्रीवर नियंत्रण येईल.
बियाणे उत्पादक, वितरक व विक्रेते यांच्यात समन्वय वाढेल.
परराज्यातून येणाऱ्या बियाण्यांवरही प्रभावी नियंत्रण ठेवता येईल.
शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रतीचे व खात्रीशीर बियाणे सहज उपलब्ध होईल.
सरकारचा आदेश व जबाबदाऱ्या:
या निर्णयानुसार खरीप २०२५ पासून राज्यातील सर्व सत्यप्रत (Truthful Seeds) बियाण्यांची विक्री व वितरण साथी पोर्टलद्वारेच करावे लागणार आहे. यासाठी बियाणे उत्पादक, वितरक व विक्रेत्यांना काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत:
बियाण्याच्या गुणवत्तेची शासकीय मानकांनुसार खात्री करणे.
बियाण्यांची उगमक्षमता, शुद्धता आणि आद्रतेची पातळी निश्चित ठेवणे.
साथी पोर्टलशी सुसंगत योग्य प्रकारचे लेबलिंग करणे.
सर्व विक्री साथी पोर्टलवरूनच करणे.
कृषी आयुक्तालयानेही काही महत्त्वाची कार्यवाही करावी लागणार आहे जसे की केंद्र शासनाशी समन्वय साधणे, सर्व उत्पादक व विक्रेत्यांना प्रशिक्षित करणे, जनजागृती मोहीम राबवणे व शेतकऱ्यांसाठी हेल्पडेस्क स्थापन करणे.
सत्यप्रत (Truthful Seeds) बियाणे साथी पोर्टलवरून विक्री व वितरण करण्याचा हा निर्णय महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. या निर्णयामुळे बियाण्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांना खात्रीशीर बियाणे मिळेल, तसेच कृषी उत्पादनक्षमता वाढण्यास मोठा हातभार लागेल. शासनाने घेतलेला हा पुढाकार शेतकरी हिताचे व कृषी व्यवसायाच्या सुदृढतेचे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय:
सत्यप्रत बियाणे (Truthful Seeds ) साथी पोर्टलवर कार्यान्वित करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या लेखात, आम्ही सत्यप्रत बियाण्यांची (Truthful seeds) विक्री व वितरण साथी पोर्टलवरून करण्यास राज्य सरकारने दिली मान्यता या विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लेख देखील वाचा !
- सर्व शेतकरी योजना आता “महाडीबीटी शेतकरी मोबाईल अॅप” वर – MahaDBT Farmer App
- बियाणे, खते वाटपाच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
- बियाणे टोकन यंत्र योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
- या शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोलर पंप; असा करा ऑनलाईन अर्ज !
- मागेल त्याला सौर कृषी पंप योजना; असा करा ऑनलाईन अर्ज!
- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४; आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज!
- सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
- बॅटरी फवारणी पंप १००% अनुदानसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
- पाईप व पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
- कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी सुरु; असा करा ऑनलाईन अर्ज ! – Kusum Solar Pump Yojana Online Registration
- सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा !
- कुसुम सोलर पंपाचे दर, कंपनी संपर्क व लाभार्थी यादी पहा ऑनलाईन !
- पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु !
- कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य (कृषी यांत्रिकीकरण) योजनेसाठी असा करा महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज!
- महाडीबीटी लॉटरी मध्ये निवड व पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे !
- शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना – MahaDBT Portal Scheme
- महाडीबीटी पोर्टल वरील योजना प्रभावीपणे राबविणेबाबत परिपत्रक जारी – MahaDBT Portal Schemes.
- महाडीबीटी योजना लाभार्थी यादी ऑनलाईन डाउनलोड करा ! MahaDBT Yojana Beneficiary List Download Online!
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!