आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषशालेय शिक्षण व क्रीडा विभागशिक्षण मंत्रालयसरकारी कामे

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु २०२५-२६

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अकरावी (11th Admission) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (FYJC Online Admission) अत्यंत सुगम, पारदर्शक आणि वेळेवर राबवली जाणार आहे. ही प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी केंद्र सरकारच्या डिजिटल शिक्षण धोरणानुसार विकसित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी नंतर अकरावी (11th Admission) प्रवेश घेण्यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु २०२५-२६ – 11th Admission:

अकरावी (11th Admission) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना घरी बसूनच प्रवेश अर्ज भरता येतो, पसंतीची शाळा निवडता येते, आणि प्रवेशाची स्थिती ऑनलाईन पाहता येते. यामुळे वेळ, पैसा आणि मनस्ताप वाचतो. प्रवेश (11th Admission) प्रक्रियेचा उद्देश विद्यार्थ्यांना न्याय्य, सुलभ आणि पारदर्शक माध्यमातून उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेचे टप्पे:

१. नोंदणी व अर्ज भरने (२६ मे ते ३ जून २०२५): या कालावधीत विद्यार्थ्यांनी mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल. अर्ज भरण्याच्या वेळी कमीत कमी १ व जास्तीत जास्त १० शाळांची पसंती निवडता येईल. विद्यार्थ्यांच्या गुण, पसंती व आरक्षणाच्या आधारावर त्यांना अकरावीचा (11th Admission) प्रवेश मिळेल. याच वेळेत व्यवस्थापन कोटा, इन-हाउस कोटा, व अल्पसंख्याक कोटासाठी शून्य फेरीसाठीही अर्ज करता येतो.

२. तात्पुरती गुणवत्तावार यादी (५ जून २०२५): या दिवशी तात्पुरती सामान्य गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. यामध्ये आपले नाव, गुण, आरक्षण तपशील तपासणे आवश्यक आहे.

३. हरकती व दुरुस्ती (६ ते ७ जून २०२५): जर गुणवत्तावार यादीमध्ये काही चुका आढळल्या, तर विद्यार्थी ‘Grievance Redressal’ प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन हरकत दाखल करू शकतात. विभागीय उपसंचालक हरकतींचे निवारण करतील.

४. अंतिम गुणवत्तावार यादी व शून्य फेरी वाटप (८ जून २०२५): हरकतींचे निवारण झाल्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्याच दिवशी शून्य फेरी अंतर्गत व्यवस्थापन, इन-हाउस व अल्पसंख्याक कोट्याचा प्रवेश वाटपही होईल.

५. शून्य फेरी प्रवेश प्रक्रिया (९ ते ११ जून २०२५): वरील कोट्यांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावर प्रवेश घेता येईल. अर्जदारांनी ‘Proceed for Admission’ या बटणावर क्लिक करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

६. CAP फेरी (९ ते ११ जून २०२५): CAP (Centralized Admission Process) फेरी १ मध्ये विद्यार्थ्यांची यादी तयार केली जाईल. याचे ऑडिट विभागीय समितीद्वारे केले जाईल.

७. CAP फेरी निकाल (१० जून २०२५): CAP फेरीतील शाळा वाटपाची यादी पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये वाटप झालेल्या शाळेचा तपशील दिसेल. याच दिवशी कट-ऑफ लिस्टही प्रसिद्ध केली जाईल.

८. प्रवेश घेणे व पुढील फेरीसाठी तयारी (११ ते १८ जून २०२५): विद्यार्थ्यांनी वाटप झालेल्या शाळेतील प्रवेश स्वीकारायचा असल्यास ‘Proceed for Admission’ वर क्लिक करणे गरजेचे आहे. यानंतर मूळ कागदपत्रांसह शाळेत उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा लागेल.

महत्त्वाचे:

  • जर विद्यार्थ्याला प्रथम पसंतीची शाळा मिळाली असेल, तर अकरावी (11th Admission) प्रवेश घेणे बंधनकारक आहे. अन्यथा तो पुढील CAP फेरी (Round 2 ते 4) साठी अपात्र ठरेल.

  • प्रवेश घेतल्यानंतर रद्द केल्यासही पुढील CAP फेरीसाठी अर्ज करता येणार नाही.

९. फेरी क्रमांक २ साठी उर्वरित जागांची यादी (२० जून २०२५): या दिवशी CAP फेरी २ साठी उपलब्ध उर्वरित जागांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. यामध्ये कोटा जागांचाही समावेश असेल.

अकरावी प्रवेशासाठी महत्वाच्या सूचना:
  1. सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जाईल.

  2. अकरावी (11th Admission) प्रवेशासाठी कोणतीही सेवा शुल्क किंवा दलाली दिली जाऊ नये.

  3. विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रे योग्य प्रकारे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.

  4. नोंदणी शुल्क फक्त डिजिटल माध्यमातून भरता येईल.

  5. वेळापत्रकाचे पालन न केल्यास प्रवेश संधी गमावू शकता.

अकरावी प्रवेश (11th Admission) प्रक्रिया २०२५-२६ या वर्षासाठी अत्यंत सुबोध, पारदर्शक आणि वेळेत राबवण्याचा शासनाचा उद्देश आहे. प्रत्येक टप्प्याला सुस्पष्ट वेळापत्रक व प्रणाली दिलेली असल्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचे भान ठेवून अकरावी (11th Admission) प्रवेशासाठी अर्ज करावा. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस एक सशक्त पायाभरणी मिळते.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बाबत महत्वाच्या PDF फाईल्स: अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (11th Admission) २०२५-२६ संदर्भातील महत्वाच्या PDF फाईल्स खालील लिंक वरून डाउनलोड करा.

  1. अकरावी वेळापत्रक २०२५-२६ PDF फाईल
  2. 11वी ऑनलाइन प्रवेश २०२५-२६ माहिती पुस्तिका PDF फाईल
  3. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय – शैक्षणिक वर्ष 2025 -2026 पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सुधारीत सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  4. विद्यार्थी नोंदणी आणि पसंती निवडीची अंतिम तारीख ५ जून २०२५ रोजी दुपारी २:०० वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे प्रेसनोट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  5. FYJC Admission Schedule सुधारित -२ 

जर तुम्हाला या प्रक्रियेबाबत अधिक माहिती हवी असेल, तर अधिकृत संकेतस्थळ www.mahafyjcadmissions.in ला भेट द्या किंवा support@mahafyjcadmissions.in या ईमेलवर / सहाय्यता क्रमांकः ८५३०९५५५६४ वर संपर्क साधा.

या लेखात, आम्ही अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ (11th Admission) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

खालील लेख देखील वाचा!

  1. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  2. आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२५
  3. MahaDBT Scholarship : महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु !
  4. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ ऑनलाईन अर्ज सुरु !
  5. संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना : टायपिंग कोर्स केलेल्यांना ६,५०० रुपये अर्थसहाय्य मिळणार !
  6. पंडित दीनदयाळ उपाध्याय शिष्यवृत्ती योजना
  7. दीनदयाल स्पर्श योजना : भारतीय डाक विभागा मार्फत विद्यार्थ्यांना मिळणार ६ हजार रूपये प्रती वर्षी !
  8. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुधारित !
  9. परदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल; शासन निर्णय जारी !
  10. सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत विद्यार्थ्यांना परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना सुरु करणेबाबत शासन निर्णय
  11. महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती
  12. महात्मा जोतीराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना
  13. लेडी मेहेरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्ट शिष्यवृत्ती
  14. चुकून राईट टू गिव्ह अपचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा मिळणार शिष्यवृत्ती !
  15. एकलव्य आर्थिक सहाय्य योजना – Eklavya Scholarship
  16. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
  17. १ ली ते पदवीधर विद्यार्थ्यांसाठी १५ ते ७५ हजार एचडीएफसी बँक स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज सुरु !
  18. अपार आयडी ‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र’ प्रत्येक विद्यार्थ्याला बनवावे लागणार !
  19. कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी अर्थसहाय्याची सुवर्णसंधी!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.