सरकारी योजनाकृषी योजनामत्स्योत्पादन पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालयवृत्त विशेष

Pashu Kisan Credit Card : पशु किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा अर्ज !

AHDF KCC म्हणजे पशुसंवर्धन विकास निधी (AHDF Pashu Kisan Credit Card) किसान क्रेडिट कार्ड होय. मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय या क्षेत्रातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डची सुविधा देणाऱ्या  देशव्यापी  AHDF KCC अभियान आहे.

मत्स्यपालन,पशुपालन आणि दुग्धव्यवसायात असलेल्या सर्व छोट्या भूमिहीन शेतकऱ्यांना (Pashu Kisan Credit Card) किसान क्रेडिट कार्डच्या सेवा-सुविधा मिळू शकतील.

पशु किसान क्रेडिट कार्डचे उद्दिष्ट (Pashu Kisan Credit Card):

किसान क्रेडिट कार्ड हे विशेषत: पशुसंवर्धन किंवा पशुपालन व्यवसायात गुंतलेल्या शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले एक आर्थिक उत्पादन आहे. पारंपारिक किसान क्रेडिट कार्ड (KCC) प्रमाणेच, AHDF KCC शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी आणि संलग्न क्रियाकलापांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेळेवर आणि पुरेसे कर्ज उपलब्ध करून देते.

पशु किसान क्रेडिट कार्ड ! Pashu Kisan Credit Card AHDF KCC:

देशातील सर्व मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धव्यावसायिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ देण्यासाठी, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय, मत्स्य विभाग आणि वित्त सेवा विभाग यांच्या सह कार्यातून, एक ‘देशव्यापी एएचडीएफ केसीसी अभियाना’चे आयोजन केले आहे.

या संदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना देणारे परिपत्रक मंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना पाठवले होते. वित्त सेवा विभागाने देखील या संदर्भात, राज्ये आणि संबंधित बँकांना आवश्यक ते निर्देशही दिले आहेत.

मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने, वित्तीय सेवा विभागाच्या मदतीने, सर्व पात्र पशुपालक आणि मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत.

>

ज्या पशुपालन आणि  मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी नवे क्रेडिट कार्ड स्वीकारले आहे, त्यांना आपल्या व्यवसायासाठी भांडवलाची पूर्तता करण्यासाठी संघटनात्मक कर्ज वितरण व्यवस्था करण्यात आली आहे.

या अभियानाअंतर्गत, दर आठवड्यात मुख्य जिल्हा व्यवस्थापकांच्या सहकार्याने किसान क्रेडिट कार्ड समन्वय समितीने शिबिरे आयोजित केली जातील. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या अर्जांची तपासणी आणि छाननी त्या शिबिरातच राज्याचे पशुपालन आणि मत्स्यविभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.

पिक कर्ज दर (Pashu Kisan Credit Card Rate):

पिक कर्ज दर प्रति हेक्टरी खालील प्रमाणे आहेत.

खरीप भात/सुधारित 75,000 प्रति हेक्टर, भात उन्हाळी/बासमती 75000 प्रति हेक्टर, खरीप भात (जिरायत) 62000 प्रति हेक्टर, खरीप ज्वारी (बागायत) 44,000 प्रति हेक्टर, खरीप ज्वारी (जिरायत) 44,000 प्रति हेक्टर, बाजरी (बागायत) 43,000 प्रति हेक्टर, बाजरी (जिरायत) 35,000 प्रति हेक्टर, बाजरी (उन्हाळी) 35,000 प्रति हेक्टर, मका (बागायत) 40,000 प्रति हेक्टर, मका (जिरायत) 35,000 प्रति हेक्टर, मका (स्विट कॉर्न) 40,000 प्रति हेक्टर, तूर (बागायत) 46000 प्रति हेक्टर, तूर (जिरायत) 45,000 प्रति हेक्टर, मूग (जिरायत) 27,000 प्रति हेक्टर, मूग (उन्हाळी) 27,000 प्रति हेक्टर, उडीद (जिरायत) 27,000 प्रति हेक्टर, भुईमुग (बागायत/उन्हाळी) 49,000 प्रति हेक्टर, भुईमुग (जिरायत) 46,000 प्रति हेक्टर, सोयाबीन 54,000 प्रति हेक्टर, सुर्यफूल (बागायत) 27000 प्रति हेक्टर, सूर्यफूल (जीरायत) 24000 प्रति हेक्टर, तीळ (जिरायत ) 24000 प्रति हेक्टर, जवस (जिरायत) 25000 प्रति हेक्टर, कापूस (बागायत) 76,000 प्रति हेक्टर  , कापूस (जिरायत) 65,000 प्रति हेक्टर, ऊस (आडसाली)165000 प्रति हेक्टर, ऊस (पूर्वहंगामी) 155000 प्रति हेक्टर, ऊस (सुरू) 155000 प्रति हेक्टर, ऊस (खोडवा) 120000 प्रति हेक्टर, रब्बी ज्वारी ( बागायत) 44,000 प्रति हेक्टर, रब्बी ज्वारी (जिरायत) 31000 प्रति हेक्टर, गहू (बागायत) 38000 प्रति हेक्टर, हरभरा (बागायत) 40000 प्रति हेक्टर, हरभरा (जिरायत) 35000 प्रति हेक्टर, करडई 30000 प्रति हेक्टर, मिरची 1,00,000, मिरची (निर्यातक्षम)1,00,000 प्रति हेक्टर, टोमॅटो 80000 प्रति हेक्टर, कांदा ( खरीप ) 1,05,000 प्रति हेक्टर, कांदा ( रब्बी ) 90,000 प्रति हेक्टर, बटाटा 1,05,000 प्रति हेक्टर, हळद 1,36,000 प्रति हेक्टर, आले 1,36,000 प्रति हेक्टर, कोबीवर्गीय पिके 42000 प्रति हेक्टर, ऑस्टर 36000 प्रति हेक्टर, शेवंती 36000 प्रति हेक्टर, झेंडू 41000 प्रति हेक्टर, गुलाब 47000 प्रति हेक्टर, मोगरा 42000 प्रति हेक्टर, जाई 38000 प्रति हेक्टर, द्राक्ष 37000 प्रति हेक्टर, काजू 121000 प्रति हेक्टर, डाळिंब 2,00,000 प्रति हेक्टर, चिकू 70000 प्रति हेक्टर, पेरू 1,05,000 प्रति हेक्टर, , कागदी लिंबू 80,000 प्रति हेक्टर, नारळ 75000 प्रति हेक्टर, सिताफळ  80,000 प्रति हेक्टर, केळी  1,50,000 प्रति हेक्टर, केळी (टिशूकल्चर) 1,80,000 प्रति हेक्टर, संत्रा /मोसंबी  ८८००० प्रति हेक्टर, आंबा( हापूस ) 155000 प्रति हेक्टर, बोर 40000 प्रति हेक्टर, आवळा 40000 प्रति हेक्टर, पपई 85,000 प्रति हेक्टर, गजराज 32000 प्रति हेक्टर, लसुन गवत 63000 प्रति हेक्टर, पवना गवत 34000 प्रति हेक्टर, मका (हिरवा चारा) 32000 प्रति हेक्टर, बाजरी (हिरवा चारा) 16000 प्रति हेक्टर, ज्वारी (हिरवा चारा ) 22000 प्रति हेक्टर, रेशमी  तुती 90000 प्रति हेक्टर, पानमळा 55000 प्रति हेक्टर.

पशु किसान क्रेडिट कार्ड अर्ज (Pashu Kisan Credit Card) :

पशु किसान क्रेडिट कार्ड अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

वरील पशु किसान क्रेडिट कार्ड अर्ज डाउनलोड करून तो बँकमध्ये किंवा दूध संघामध्ये जमा करा.

हेही वाचा – किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा ऑनलाईन अर्ज – Kisan Credit Card Apply Online (KCC Card Registration)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “Pashu Kisan Credit Card : पशु किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा अर्ज !

  • I. K. Pathan

    सर आपण आपल्या वेबसाईट च्या माद्यमातून खूप छान माहिती देत असता. प्रत्येक योजनेची समर्पक माहिती मिळते.
    I. K. Pathan

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.