वन्यप्राणी हल्ला नुकसान भरपाई: ऑनलाईन अर्ज व संपूर्ण माहिती!
ग्रामीण व वनालगतच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना अनेकदा वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, हत्ती, मगर, कोल्हा, तरस, माकड/वानर अशा वन्यप्राण्यांच्या (Vanyaprani Halla Nuksan Bharpai) हल्ल्यांना सामोरे जावे लागते. अशा प्रसंगी जीवितहानी, कायम अपंगत्व किंवा गंभीर जखमा होऊ शकतात. या कठीण परिस्थितीत पीडित व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा म्हणून शासनाने वन्यप्राणी हल्ला नुकसान भरपाई योजना लागू केली आहे.
या लेखात आपण वन्यप्राणी हल्ला नुकसान भरपाई (Vanyaprani Halla Nuksan Bharpai) म्हणजे काय, कोणाला मिळते, किती रक्कम मिळते, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतात, अर्जानंतर पुढे काय होते हे सर्व सोप्या आणि स्पष्ट भाषेत पाहणार आहोत.
वन्यप्राणी हल्ला नुकसान भरपाई – Vanyaprani Halla Nuksan Bharpai:
वन्यप्राणी हल्ला नुकसान भरपाई (Vanyaprani Halla Nuksan Bharpai) म्हणजे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्याला झालेल्या हानीबद्दल शासनाकडून दिली जाणारी आर्थिक मदत. ही मदत खालील परिस्थितींमध्ये दिली जाते:
व्यक्तीचा मृत्यू झाल्यास
व्यक्ती कायमस्वरूपी अपंग झाल्यास
व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास
व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास (औषधोपचार खर्च)
ही भरपाई महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयांनुसार दिली जाते आणि ती थेट पीडित व्यक्तीच्या किंवा वारसांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
कोणत्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात भरपाई मिळते?
PDF मध्ये नमूद केल्याप्रमाणे खालील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत ही योजना लागू होते:
वाघ
बिबट्या
अस्वल
गवा (बायसन)
रानडुक्कर
लांडगा
तरस
कोल्हा
मगर
हत्ती
रानकुत्रे (ढोल)
रोही (बनलगाय)
माकड / वानर
वरील कोणत्याही वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मानवी हानी झाल्यास वन्यप्राणी हल्ला नुकसान भरपाई (Vanyaprani Halla Nuksan Bharpai) मिळू शकते.
नुकसान भरपाईची रक्कम किती मिळते?
शासन निर्णयानुसार नुकसान भरपाईची रक्कम खालीलप्रमाणे आहे: ही रक्कम शासन वेळोवेळी अद्ययावत करत असते.
| अ. क्र. | तपशिल | देय असलेल्या अर्थसहाय्याची रक्कम |
| 1 | व्यक्ती मृत झाल्यास | रुपये २५,००,०००/- (रु. पंचवीस लक्ष फक्त) |
| 2 | व्यक्ती कायम अपंग झाल्यास | रुपये ७,५०,०००/- (रु. सात लक्ष पन्नास हजार फक्त) |
| 3 | व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास | रुपये ५,००,०००/- (रु. पाच लक्ष फक्त) |
| 4 | व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास | औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात यावा. मात्र खाजगी रुग्णालयात औषधोपचार करणे आगत्याचे असल्यास त्याची मर्यादा रुपये ५०,०००/- (रु. पन्नास हजार फक्त) प्रति व्यक्ती अशी राहील. शक्यतो औषधोपचार शासकीय/जिल्हा परिषद रुग्णालयात करावा. |
वन्यप्राणी हल्ला नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
वन्यप्राण्यांचे हल्ल्यामुळे मनुष्यहानी झाल्यास अर्थसहाय्य/नुकसान भरपाईसाठी (Vanyaprani Halla Nuksan Bharpai) तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास प्रथम तुम्हाला खालील वनविभागाच्या महाराष्ट्र फॉरेस्ट पोर्टलवर जायचे आहे.
https://intranet.mahaforest.gov.in/forestportal
महाराष्ट्र फॉरेस्ट पोर्टल मध्ये विविध RTS अर्ज फॉर्म आणि सेवा दिसतील त्यामधून तुम्हाला “वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या पशु नुकसानीची नुकसान भरपाई मंजुर करणे” किंवा “वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती जखमी किंवा मृत झाल्यास आर्थिक सहाय्य मंजुर करणे” या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.

वरील RTS अर्जामध्ये अर्जदार आणि नुकसान भरपाईची माहिती, तसेच आवश्यक तपशील/कागदपत्रे जोडून अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काडून ठेवा. अर्ज भरल्यानंतर मोबाईल वर मेसेज येईल व वनविभागाचे अधिकारी नुकसान पहाणी दौरा करतील. त्यानंतर तुमच्या अर्जाला मंजुरी मिळून नुकसान भरपाई मिळेल.
आवश्यक कागदपत्रे:
वन्यप्राणी हल्ला नुकसान भरपाईसाठी (Vanyaprani Halla Nuksan Bharpai) सामान्यतः खालील कागदपत्रे लागतात:
मृत्यू प्रमाणपत्र / वैद्यकीय प्रमाणपत्र
पोस्टमॉर्टेम रिपोर्ट (मृत्यू असल्यास)
जखमी असल्यास डॉक्टरांचा अहवाल
घटना स्थळाचे फोटो (असल्यास)
पंचनामा अहवाल
आधार कार्ड
बँक पासबुक झेरॉक्स
अर्जानंतर पुढे काय होते?
अर्ज केल्यानंतर:
वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी भेट देतात
पंचनामा व तपास केला जातो
अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला जातो
मंजुरीनंतर नुकसान भरपाई थेट खात्यात जमा होते.
अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील उपवनसंरक्षक/उप विभागीय अधिकारी/वन क्षेत्रपाल यांचे कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
१) वन्यप्राणी हल्ला नुकसान भरपाई किती दिवसात मिळते?:- साधारणपणे तपास पूर्ण झाल्यानंतर 30 ते 90 दिवसांत भरपाई मिळते.
२) अर्ज ऑफलाईन करता येतो का?:- सध्या ऑनलाईन अर्जालाच प्राधान्य दिले जाते, मात्र अडचण असल्यास वन कार्यालयात मदत मिळते.
३) किरकोळ जखमीसाठी भरपाई मिळते का?:- होय, औषधोपचाराचा खर्च ₹50,000/- पर्यंत दिला जातो.
४) वन्यप्राणी हल्ला नुकसान भरपाई कोण मंजूर करते?:- संबंधित वन विभाग व महसूल विभाग मंजुरी देतात.
५) अर्ज नाकारला तर काय करावे?:- आपण वरिष्ठ वन अधिकाऱ्याकडे तक्रार किंवा पुनर्विचार अर्ज करू शकता.
या लेखात, आम्ही वन्यप्राणी हल्ला नुकसान भरपाई (Vanyaprani Halla Nuksan Bharpai): ऑनलाईन अर्ज विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लेख देखील वाचा!
- महाराष्ट्र “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” योजना – CM Relief Fund Scheme
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्सॲप हेल्पलाईन !
- आयुष्मान कार्ड ऑनलाईन डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ योजना : रुग्णांना मिळणार विविध आरोग्य सेवा !
- ई-संजीवनी ॲप रुग्णांसाठी संजीवनी!
- वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना आता मिळणार २५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य !
- CGHS लाभार्थी आयडी आयुष्मान भारत हेल्थ आयडीला लिंक करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
- प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांवर औषधे माफक दरात उपलब्ध !
- ई-श्रम यूएएन कार्डसाठी अशी करा ऑनलाईन नोंदणी!
- MJPJAY : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना – Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY)
- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता राज्यातील सर्व कुटुंबांना लागू !
- आयुष्मान कार्ड ऑनलाईन डिजिलॉकर मधून डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
- शासकीय कामे होत नसतील तर ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची? जाणून घ्या सविस्तर – (आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली) Grievances Maharashtra
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

