अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना
अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेअंतर्गत सध्या ग्रामीण भागातील ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी एसटीने मोफत प्रवास सवलत लागू आहे. ही सवलत १०० टक्के इतकी आहे.
अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना:
योजनेचे स्वरुप-
ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी, त्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी, ५ वी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण घेणे सुलभ होण्यासाठी मोफत प्रवास सवलत पास देण्यात येतो.
योजना कोणासाठी-
१) सवलत फक्त ग्रामीण भागातील विद्यार्थीनींसाठी अनुज्ञेय.
२) ग्रामीण भागातील स्थानिक ठिकाणी माध्यमिक शिक्षणाची सोय असल्यास दुसऱ्या गावात अथवा शहरात जावून माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना ही सवलत अनुज्ञेय राहणार नाही.
योजनेची कार्यपद्धती-
१) शाळेच्या मुख्याध्यापकांनी पात्र विद्यार्थीनींची तपशिलवार पादी राज्य परिवहन महामंडळाच्या आगारप्रमुखांना पाठवावी.
२) मुख्याध्यापकांकडून यादी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थीनीस संबंधित आगार प्रमुखांमार्फत तिमाही पास मोफत उपलब्ध करून देण्यात येतो.
३) पुढील तिमाहीचा पास महामंडळाकडून घेण्यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी दर महिन्यास विद्यार्थीनींची किमान उपस्थिती ७५ टक्के असण्यासंबंधीचे प्रमाणपत्र राज्य परिवहन महामंडळास देणे आवश्यक.
संपर्क: संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किंवा महाविद्यालयाचे प्राचार्य.
हेही वाचा – “शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांसाठी ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’ – (Mission Zero Dropout)
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!