स्पर्धा परीक्षावृत्त विशेष

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज पाठविण्यास ११ जुलैपर्यंत मुदतवाढ

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्था बरगढ आणि वेंकटगिरी येथे शैक्षणिक सत्र २०२२-२३ साठी अनुक्रमे १४ आणि २ जागांवर महाराष्ट्र राज्यातून प्रवेश देण्यात येणार आहे.

त्यासाठी इच्छुक उमेदवारांना केंद्र शासनाने अर्ज पाठविण्यास ११ जुलै २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे, असे वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.

तीन वर्षीय हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्था बरगढ (ओडिशा) येथे १४ आणि वेंकटगिरी येथे २ जागांवर महाराष्ट्र राज्यातून प्रवेश देण्यात येणार आहे. या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना नागपूर, सोलापूर, मुंबई आणि औरंगाबाद येथील वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांमार्फत विहित नमुन्यातील अर्ज आता ११ जुलै २०२२ पर्यंत पाठवता येतील.

प्रवेश अर्जाचा नमुना आणि इतर माहिती वस्त्रोद्योग विभागाच्या http://www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून सर्व प्रादेशिक उपायुक्त कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असेही आयुक्त श्रीमती तेली-उगले यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

>

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरीता तीन वर्षीय हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेच्या प्रथम सत्राकरीता उमेदवारांची निवड या शिर्षाअंतर्ग माहीती आणि अर्ज नमुना खालील लिंक वरून डाउनलोड करुन सबंधीत प्रादेशिक उप आयुक्तालयांचे कार्यालयात दिनांक १०/०५/२०२२ ते ११/०७/२०२२ या कालावधीत सादर करण्याच्या सुचना पहा.

अर्ज आणि माहीती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – अग्निपथ योजना : ठाण्यात मुंब्रा येथे 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2022 या कालावधीत लष्कर भर्ती मेळाव्याचे आयोजन

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.