कृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी योजना

मध केंद्र योजनेअंतर्गत अर्ज सुरु – पालघर जिल्हा

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. या करीता पात्र व्यक्ती, संस्थाकडुन खाली दर्शविल्याप्रमाणे अर्ज मागविण्यांत येत आहे.

योजनेची वैशिष्टे –

मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुतंवणुक, शासनाच्या हमीभावाने मध खरेदी, विशेष, छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती.

योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता पुढीलप्रमाणे.

वैयक्तिक मधपाळ पात्रता –

  1. अर्जदार साक्षर असावा,
  2. स्वतःची शेती असल्यास प्राधान्य,
  3. वय 18 वर्षापेक्षा जास्त,
  4. अर्जदाराने मंडळाचे मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्रात 10 दिवसाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील.

पात्रता: केंद्रचालक प्रगतिशिल मधपाळ व्यक्ती पात्रता-

  1. किमान 10 वी पास,
  2. वय वर्ष 21 पेक्षा जास्त,
  3. अशा व्यक्तीच्या नांवे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नांवे किमान 1 एकर शेत जमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेत जमीन,
  4. लाभार्थीकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता व सुविधा असावी.

केंद्रचालक संस्था- पात्रता –

  1. संस्था नोंदणीकृत असावी,
  2. संस्थेच्या नांवे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1000 चौ. फुट सुयोग्य इमारतअसावी.
  3. संस्थेकडे 1 एकर स्व मालकीची,भाडयाने घेतलेली शेत जमिन असावी.
  4. मधमाशा पालन प्रजननव मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता असलेली सेवा असावी.

अटीव शर्ती –

  1. लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणांपुर्वी मध व्यवसाय सुरू करणेसंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील.
  2. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील.

संपर्क: अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, नविन प्रशासकीय इमारत, विंग – अ दुसरा मजला, कक्ष क्र. 208, जिल्हा मुख्यालय, पालघर- बोईसर रोड, कोळगांव ता.जि. पालघर.

ईमेल [email protected] मोबा.क्र. 9820758276,9422982621, 7397916120 अथवा संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योगमंडळ, शासकीय बंगला नं. 5 मु.पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा- 412 803, दुरध्वनी02168-260264 येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी पालघर अंजनागायकवाड यांनी केले आहे.

हेही वाचा – मधुमक्षिका पालन योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.