वृत्त विशेषमहाराष्ट्र ग्रामपंचायत

महाराष्ट्रातील 271 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल ऑनलाईन पहा – २०२२

राज्यातील विविध 15 जिल्ह्यांमधील 62 तालुक्यातील 238 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 78 टक्के मतदान झाले.

राज्य निवडणूक आयोगाने 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची 29 जून 2022 रोजी घोषणा केली होती. त्यातील 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आज प्रत्यक्षात 238 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. सर्व ठिकाणी मतमोजणी 5 ऑगस्ट 2022 रोजी झाली.

मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी : नाशिक- 36, धुळे- 41, जळगाव- 20, अहमदनगर- 13, पुणे- 17, सोलापूर- 25, सातारा- 7, सांगली- 1, औरंगाबाद- 16, बीड- 13, परभणी- 2, उस्मानाबाद- 9, जालना- 27, लातूर- 6, आणि बुलडाणा- 5. एकूण- 238.

महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकाल असा पहा ऑनलाईन:

>

ग्रामपंचायत निवडणूक निकाल पाहण्यासाठी सर्व प्रथम खालील राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र ची वेबसाईट ओपन करा.

https://mahasec.maharashtra.gov.in/

राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र ची वेबसाईट ओपन झाल्यावर भाषा बदलण्यासाठी वरती मराठी निवडू शकता. नंतर खालील “Election Results” (निवडणुकीचा निकाल) या ऑप्शन वर जा.

Election Results
Election Results

“Election Results” या ऑप्शन वर गेल्यावर “You can see ward wise election result for Local Body General Election on Click Here” असा मॅसेज येईल तेथे “Click Here” वर क्लिक करा.

नंतर “Disclaimer” विंडो ओपन होईल त्यामध्ये खालील मुद्दे नमूद केले आहेत ते वाचून (I agree) ऑप्शन वर टिक करून Accept बटन वर क्लिक करा.

  • या ‘डॅशबोर्ड’ वर दिलेले निकाल मोजणीच्या दिवशी नामांकन सॉफ्टवेअरमध्ये रिटर्निंग ऑफिसरने दिलेल्या डेटा नुसार दिले आहेत.
  • उमेदवारांची भरती ऑनलाईन नामांकन अर्जानुसार उमेदवारांची व राजकीय पक्षांची नावे आहेत.
  • काही विसंगती आढळल्यास संबंधित स्थानिक संस्थेशी कृपया पुष्टी करा.

मतदारसंघनिहाय निवडणुकीचा निकाल:

मतदारसंघनिहाय निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी खालील पर्याय निवडा.

  • Local Body Type: “GRAM PANCHAYAT” हा पर्याय निवडा.
  • Division: तुमचा विभाग निवडा.
  • District: तुमचा जिल्हा निवडा
  • Taluka: तुमचा तालुका निवडा
  • Local Body: स्थानिक संस्था
  • Election Program: 271 Grampanchayat General Election Poll Date 04-08-2022
Constituency Wise Election Result
Constituency Wise Election Result

वरील पर्याय सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल पाहता येणार आहे.

हेही वाचा – ग्रामपंचायतीचे काम कसं चालते? सरपंच, उपसरपंच व सदस्यांना मानधन किती? ग्रामस्थ म्हणून गावच्या विकास कामात कसं सहभागी व्हायचं आणि विकासकामांवर लक्ष कसं ठेवायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.