गाव नमुना ८-क उतारा विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 8K
मागील लेखामध्ये आपण गाव नमुना ८-अ आणि ८-ब उतारा विषयीची संपूर्ण माहिती पाहिली. या लेखामध्ये आपण गाव नमुना ८ क उतारा, मागण्या व वसुली यांची वार्षिक खातेवही आणि जमीन महसुलाखेरीज इतर बाबी उदा. बांधबंदिस्तीविषयक येणे रकमांव्यतिरिक्त पाटबंधारेविषयक येणे रकमा, पोट हिस्सा भूमापन फी, विक्रीकर, आयकर इत्यादी यांचा चाचणी ताळेबंद यांची नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
गाव नमुना ८-क उतारा – Gav Namuna 8K:
गाव नमुना ८ क म्हणजे जमीन महसुलाव्यतिरिक्त इतर मागण्या व वसुलीची नोंदवही. या नोंदवहीत महसुलाव्यतिरिक्त इतर सरकारी येणे (पोट हिस्सा फी, सिंचन कर, आयकर, विक्री कर, आर.टी.ओ. कर इ.) यांची नोंद केली जाते. ज्या विभागाची मागणी असते तो विभाग या नमुन्यातील स्तंभ १ ते ५ भरून तीन प्रतीत वर्षाच्या १५ डिसेंबर पर्यंत तहसिलदार यांच्याकडे पाठवायची असतात.
या तिन्ही प्रती तहसिलदारामार्फत संबंधित तलाठीकडे पाठविल्या जातात.
वसूल झाल्यानंतर तलाठी यांनी स्तंभ ६ ते १० भरून दोन प्रती तहसिलदाराकडे पाठवायच्या असतात. तिसरी प्रत तलाठी यांनी स्वतःच्या अभिलेखात ठेवायची असते.
उपरोक्त दोन प्रतींची पडताळणी केल्यानंतर, तहसिलदाराने एक प्रत संबंधित विभागाला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाठवायची असते तर एक प्रत स्वतःच्या अभिलेखात ठेवायची असते.
गाव नमुना आठ- क मध्ये एकूण १० स्तंभ, १ ते ५ हे संबंधित विभागाने तर स्तंभ ६ ते १० तलाठी यांनी भरावयाचे असतात.
गाव नमुना आठ- क स्तंभ १ मध्ये संबंधित विभागाने अनुक्रमांक असतो.
गाव नमुना आठ- क स्तंभ २ मध्ये संबंधित विभागाने जिच्याकडून वसूल करावयाची अशा व्यक्तीचे नाव असते.
गाव नमुना आठ- क स्तंभ ३ मध्ये संबंधित विभागाने शासनाला प्रदान करावयाची रक्कम इत्यादींच्या थकबाकीची नोंद असते.
गाव नमुना आठ- क स्तंभ ४ मध्ये संबंधित विभागाने शासनाला प्रदान करावयाची रक्कम इत्यादींच्या चालू मागणीची नोंद असते.
गाव नमुना आठ- क स्तंभ ५ मध्ये संबंधित विभागाने शासनाला प्रदान करावयाची रक्कम इत्यादींच्या एकूण मागणीची नोंद असते.
गाव नमुना आठ- क स्तंभ ६ मध्ये तलाठी यांनी वसुली झाल्यानंतर वसूल केलेल्या रकमांचा पावती क्रमांक व दिनांकाची नोंद.
गाव नमुना आठ- क स्तंभ ७ मध्ये तलाठी यांनी वसूल केलेल्या रकमेची नोंद असते.
गाव नमुना आठ- क स्तंभ ८ मध्ये तलाठी यांनी वसूलपात्र शिल्लक रकमेची नोंद असते.
गाव नमुना आठ- क स्तंभ ९ मध्ये तलाठी यांनी वसूल केलेली रक्कम शासकीय तिजोरीत भरल्याचा दिनांक आणि चलन क्रमांकाची नोंद असते.
गाव नमुना आठ- क स्तंभ १० हा शेरा स्तंभ आहे. यामध्ये तलाठी वसुलीस स्थगिती आल्यास किंवा वसूलपात्र रकमेचे हप्ते पाडून दिल्यास त्याची नोंद असते.
गाव नमुना ८ क मध्ये एक स्वतंत्र रकाना तयार करून त्यात कोणत्या प्रकारची वसुली आहे याची नोंद करतात. उदा. आयकर, मो. व्हे. ऍक्ट, मोजणी फी इत्यादी.
हेही वाचा – तलाठी कार्यालयातील – गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!