CSC बँक मित्र BC ऑनलाईन नोंदणी सुरू – CSC Bank BC Online Registration
CSC ही अनेक सरकारी तसेच खाजगी सेवा एकाच क्षेत्रा खाली देते त्यातील एक महत्वाची सेवा म्हणजेच बँकिंग सेवा. बँक मित्र या नावाने अनेक ठिकाणी बँक आपल्या प्रतींनिधी मार्फत बँकेच्या विविध सेवा पुरवते हीच सेवा CSC च्या माध्यमातून अनेक VLE ना चांगला आर्थिक लाभ देण्याचे काम हे Bank BC अर्थात Banking correspondent ची नेमणूक करून CSC करत आहे.
CSC व अनेक खाजगी तसेच सरकारी बँका यांच्यामध्ये करार होऊन CSC ने अनेक आपल्या VLE ची नेमणूक Bank BC म्हणून केलेली आहे. तुमच्याकडे जर CSC सेंटर (आपले सरकार सेवा केंद्र) म्हणजे CSC ID तुमच्याकडे असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे ती म्हणजे सर्वांसाठी बीसी पॉइंट ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले आहे.
CSC बँक मित्र BC ऑनलाईन नोंदणी करण्याची प्रोसेस – CSC Bank BC Online Registration :
नवीन CSC बँक मित्र BC नोंदणी करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला Digital Seva Portal – CSC वर लॉगिन करून खालील CSC Bank Mitra पोर्टल ओपन करायची आहे.
CSC Bank Mitra पोर्टल ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी सबमिट करायचा आहे.
ओटीपी सबमिट झाल्यानंतर बँक बीसी मिळण्यासाठी तुम्हाला कॉल येईल. त्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला कळविली जाईल.
सूचना: फक्त एका बँकेसाठी एक बीसी अनुमत आहे. तुम्ही आधीपासून इतर कोणत्याही बँकेचे BC चालवत असाल तर तुम्ही नवीन दुसऱ्या कोणत्याही बँकेचे BC नोंदणी करू शकत नाही.
CSC अधिकृत ट्विटर नोटिफिकेशन:
Good News!!
Regarding Application for Bank BC, Visit at https://t.co/4hRe6wFtX1…
If interested for BC point tick on Yes#CSC #DigitalIndia #RuralEmpowerment #BankBC #FridayMotivation #FridayFeeling #FridayVibes #Bankmitra pic.twitter.com/XQMs6ZlYdS
— CSCeGov (@CSCegov_) January 14, 2022
हेही वाचा – CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (Common Service Centres)
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!