वृत्त विशेषसरकारी कामेस्पर्धा परीक्षा

नागरी संरक्षण दलातील स्वयंसेवक विषयी सविस्तर माहिती; – निकष, अटी व शर्ती, कर्तव्य व जबाबदाऱ्या

नागरी संरक्षण उपाय तात्काळ आणीबाणीच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, जनतेचे संरक्षण करण्यासाठी आणि आपत्तीमुळे नष्ट झालेल्या किंवा खराब झालेल्या महत्वाच्या सेवा आणि सुविधा पुनर्संचयित करण्यासाठी नागरी संरक्षण स्वयंसेवक दल डिझाइन केलेले आहेत. नागरी संरक्षण ही देशातील सामान्य लोकांची संघटना आणि प्रशिक्षण आहे जेणेकरून ते सशस्त्र दल, वैद्यकीय सेवा किंवा पोलिस दलाला मदत करू शकतील. आपण या लेखात नागरी संरक्षण दलातील स्वयंसेवक विषयी माहिती म्हणजेच नागरी संरक्षण दलातील स्वयंसेवकांच्या नोंदणी व पुननोंदणी प्रक्रियेसंबंधीचे सुधारीत निकष, अटी व शर्ती, कर्तव्य व जबाबदाऱ्या इ विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

नागरी संरक्षण दलातील स्वयंसेवकांच्या नोंदणी व पुननोंदणी प्रक्रियेसंबंधीचे सुधारीत निकष:

नागरी संरक्षण स्वयंसेवक नोंदणीचे निकष :

  • भारतीय नागरीक असावा.
  • वयोमर्यादा 18 वर्षे पूर्ण असावे.
  • शैक्षणिक पात्रता: प्राथमिक शिक्षण उत्तीर्ण असावा.
  • शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुदृढ असावा. यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून वैद्यकीय दृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
  • पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल अनुकुल असावा.
  • नागरी संरक्षण कार्यक्षेत्रातील स्थानिक रहिवाशी असावा, (अधिकृत शासकीय कागद पत्रावरील पत्त्यानुसार)
  • अत्यावश्यक सेवेच्या कार्यालयातील कर्मचारी नसावा.

अटी व शर्ती:

वरीलप्रमाणे अर्हता पूर्ण करणा-या नागरीकांची नोंदणी करून त्यांना नागरी संरक्षण दलाचा प्राथमिक पाठ्यक्रम पूर्ण करावा लागेल. सदर पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल अनुकूल असल्यास त्यांना नागरी संरक्षण सदस्यत्व खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून देण्यात येईल.

i. नागरी संरक्षण स्वयंसेवक सदस्यत्व व ओळखपत्र 3 वर्षाकरीता देण्यात येईल. प्रत्येकी तीन वर्षानंतर पुननोंदणी आवश्यक असेल.

ii. नागरी संरक्षण स्वयंसेवक (सदस्यत्व) मिळाल्यानंतर त्यांनी नागरी संरक्षण विषयक इतर प्राथमिक व प्रगत पाठयक्रम पूर्ण करणे आवश्यक राहील.

iii. स्वयंसेवकास आपत्कालीन परिस्थितीत कर्तव्यावर बोलविल्यास अथवा त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात घडणाऱ्या दुर्घटनांना स्वयंस्फूर्तींने योग्य तो प्रतिसाद नागरी संरक्षण दलाने वेळोवेळी निश्चित केलेल्या कार्यपध्दतीनुसार देणे आवश्यक राहील.

iv. आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक खात्याचा तपशील नोंदणी करताना सादर करणे अनिवार्य राहील.

v. सदस्य म्हणून नोंदणी करणा-या नागरीकाने नोकरी करीत असल्यास तो कार्यरत असलेल्या आस्थापनेमधून स्वंयसेवक होण्यास हरकत नसल्याचे “ना – हरकत प्रमाणपत्र ( NOC )” देणे बंधनकारक आहे.

नागरी सरंक्षण स्वयंसेवकांसाठी दर 3 वर्षानंतर पुननोंदणीचे निकष खालीलप्रमाणे राहतील:

1. ज्या स्वयंसेवक/मानसेवी अधिकारी यांना संघटनेमधून शिस्तभंग विषयक कारवाई करुन सदस्यत्व रद्द केलेले असल्यास त्यांना सदस्यत्व देण्यात येणार नाही.

2. शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुदृढ असावा, यासाठी वैद्यकीय अधिका-याकडून वैद्यकीय दृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक,

3. नागरी संरक्षण कार्यक्षेत्रातील स्थानिक रहिवाशी असावा. (अधिकृत शासकीय कागदपत्रांवरील पत्त्यानुसार)

4. अत्यावश्यक सेवेच्या कार्यालयातील कर्मचारी नसावा.

5. आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक खात्याचा तपशील नोंदणी करताना सादर करणे अनिवार्य राहील.

6. सदस्य म्हणून पुर्ननोंदणी करणा-या स्वंयसेवकाने तो कार्यरत असलेल्या आस्थापनेमधून स्वंयसेवक होण्यास हरकत नसल्याचे “(ना हरकत (NOC)” प्रमाणपत्र विहित नमुन्यात देणे बंधनकारक आहे.

7. सदस्यत्व नुतनीकरणासाठी तीन वर्षात पूर्ण केलेले नागरी संरक्षण पाठ्यक्रम, संघटनात्मक उपक्रम व कर्तव्य यामधील सक्रीय सहभाग याचा विचार केला जाईल.

सन 2016 पूर्वीनागरी सरंक्षण स्वयंसेवक/मानसेवी अधिकारी म्हणून नोंदणी रद्द केलेल्या नागरी सरंक्षण स्वयंसेवक/मानसेवी अधिकारी यांच्या पुर्ननोंदणी चे निकष खालीलप्रमाणे राहतील.

1. ज्या स्वयंसेवक/मानसेवी अधिकारी यांना संघटनेमधून शिस्तभंग विषयक कारवाई करुन सदस्यत्व रद्द केलेले असल्यास त्यांना सदस्यत्व देण्यात येणार नाही.

2. नागरी संरक्षण दलाचे सदस्य असल्याबाबतचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

3. शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुदृढ असावा, यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून वैद्यकीय दृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.

4. नागरी संरक्षण कार्यक्षेत्रातील स्थानिक रहिवासी असावा. (अधिकृत शासकीय कागदपत्रांवरील पत्त्यानुसार)

५. अत्यावश्यक सेवेच्या कार्यालयातील कर्मचारी नसावा.

6. आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक खात्याचा तपशील नोंदणी करताना सादर करणे अनिवार्य राहील.

7. सदस्य म्हणून पुर्ननोंदणी करणाऱ्या स्वंयसेवकाने तो कार्यरत असलेल्या आस्थापनेमधून स्वंयसेवक होण्यास हरकत नसल्याचे “ना हरकत ( NOC )” प्रमाणपत्र विहित नमुन्यात देणे बंधनकारक आहे.

8. वरीलप्रमाणे अर्हता पूर्ण करणाऱ्या स्वयंसेवकाची 7. सदस्य म्हणून पुर्ननोंदणी करणाऱ्या स्वंयसेवकाने तो कार्यरत असलेल्या आस्थापनेमधून स्वंयसेवक होण्यास हरकत नसल्याचे “ना हरकत ( NOC )” प्रमाणपत्र विहित नमुन्यात देणे बंधनकारक आहे.करून त्यांना नागरी संरक्षण दलाचा उजळणी पाठयक्रम पूर्ण करावा लागेल.

अटी व शर्तीं:

उजळणी पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल अनुकूल असल्यास त्यांना नागरी संरक्षण पुर्ननोंदणी सदस्यत्व खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून देण्यात येईल.

I. नागरी संरक्षण सदस्यत्व व ओळखपत्र तीन वर्षाकरीता देण्यात येईल. प्रत्येकी तीन वर्षानंतर पुर्ननोंदणी आवश्यक असेल.

ii. स्वयंसेवकास आपत्कालीन परिस्थितीत कर्तव्यावर बोलविल्यास अथवा त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात घडणाऱ्या दुर्घटनांना स्वयंस्फूत्तेने योग्य तो प्रतिसाद नागरी संरक्षण दलाने वेळोवेळी निश्चित केलेल्या कार्यपध्दतीनुसार देणे आवश्यक राहील.

iii. नागरी संरक्षण स्वयंसेवकांनी वरील अटी व शर्तींचे पालन न केल्यास अथवा शासकीय नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांचे नागरी संरक्षण सदस्यत्व तात्काळ रद्द करण्यांत येईल.

iv. पुर्ननोंदणी प्रक्रियेत सदस्यत्व दिलेल्या स्वयंसेवकास पुढील 6 महिन्याच्या कालावधीतील त्याचा नागरी संरक्षण संघटनेतील सक्रीय सहभाग, प्रतिसाद आणि कर्तव्यदक्षता याचा आढावा घेऊन त्यांना मानसेवी पदावरील नियुक्तीबाबत संचालनालयाच्या परिपत्रक आदेशानुसार निर्णय होईल.

नागरी संरक्षण स्वयंसेवकांची कर्तव्य व जबावदाऱ्या:

१) आपत्ती पूर्व कालावधीमध्ये पार पाडावयाची कर्तव्ये:

वरील सर्व बाबी विचारात घेता नागरी संरक्षण स्वंयसेवक जिल्हयामध्ये खालीलप्रमाणे कर्तव्ये सहाय्यक उपनियंत्रकाच्या मार्गदर्शनाखाली पार पाडतील.

अ) आपत्तीप्रवण क्षेत्रात तेथे उदभवणाऱ्या आपत्तीला प्रतिसाद देण्यासाठी नागरिकांमध्ये विविध आपत्तीच्या अनुषंगाने प्रशिक्षण देऊन जनजागृती करणे व आपत्तीस प्रतिसाद देण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे,

ब) सामाजिक व इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी समन्वय साधून आपत्ती विषयक प्रशिक्षण/ जनजागृती व इतर विविध उपाययोजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे.

क) आपत्ती व्यवस्थापन विषयाच्या अनुषंगाने स्थानिक स्तरावर विविध ठिकाणी नियमित मॉक ड्रिल, कवायती व प्रदर्शन आयोजित करणे,

ड) शाळा/महाविद्यालयांमधून शिक्षक विद्यार्थ्यांकरिता आपत्ती विषयी व्याख्याने व प्रात्यक्षिके आयोजित करुन त्याबाबत जनजागृतीकरिता पत्रके वाटणे.

इ) विद्यार्थ्यांकरिता शिबिरे आयोजित करुन त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्राथमिक प्रशिक्षण देणे.

ई) शासकीय निमशासकीय विभागात कार्यशाळा, सेमिनार्स आयोजित करुन शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्यामध्ये आपत्तीच्या वेळी प्रथम प्रतिसादक म्हणून काम करण्याबाबत प्रोत्साहीत करुन संवेदनशीलता निर्माण करणे.

२) आपत्ती दरम्यान पार पाडावयाची कर्तव्ये:

अ) नैसर्गिक आपत्तीबाबत आगाऊ सूचना मिळाल्यास शासकीय यंत्रणेला प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास मदत करणे.

ब) नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास प्रशासनास मदत करणे.

क) शोध व बचाव कामात प्रशासनास मदत करणे.

ड) जखमीना प्रथमोपचार देऊन आवश्यकतेनुसार त्यांना रुग्णालयात पाठविण्यास मदत करणे.

इ) आपत्तीच्या ठिकाणी माहिती व मार्गदर्शन केंद्र स्थापन करुन प्रशासनाच्या मदतीने नागरिकांना जखमी, हरविलेली व्यक्ती, इत्यादीबाबत योग्य माहिती देणे.

ई) आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत वाटप करण्यास व आपत्तीग्रस्त भागात वाहतूक नियंत्रण व्यवस्था सुरळीत चालू ठेवण्यास प्रशासनास मदत करणे.

फ) आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीबाबत माहिती संकलित करण्यासाठी प्रशासनास मदत करणे.

३) आपत्ती नंतर पार पाडावयाची कर्तव्ये :

अ) आपत्ती नंतर आपदग्रस्तांना प्राथमिक गरजांची पूर्तता करणे,

ब) शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था, स्थानिक नागरीकांच्याद्वारे स्थानिक स्तरावर आपत्तीनंतरची कल्याणकारी कर्तव्य पार पाडणे. उदा. मलबा हटविणे, जनजीवन सुरळीत करणे, तात्पुरता निवारण निर्मिती, आरोग्य विषयक सुविधा निर्माण करणे इतर.

क ) बेघर झालेल्या नागरीकांसाठी तात्पुरते निवारण केंद्राची उभारणी करण्यास आवश्यक ते सहकार्य करणे.

ड) निर्वासित / बेघर झालेल्या तसेच आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या नागरीकांना अन्नधान्य, रेशन अथवा अन्नाच्या पाकीटांचे वाटप करणे,

इ) आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या विभागांतील पंचनामे करण्यास शासकीय यंत्रणांना सहकार्य करणे,

ई ) आरोग्य विभागाच्या सहकार्याने आपत्ती घडलेल्या विभागातील रोगराई नियंत्रण करण्यास आवश्यक ते सहकार्य करणे.

फ) आपत्ती घडलेल्या विभागात राबविण्यांत येणाऱ्या शासकीय उपाययोजनांना आवश्यक ते सहकार्य करणे.

हेही वाचा – नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या नोंदणी व पुनर्नोंदणीसाठी अर्ज सुरु – Civil Defence & Home Guards Of Maharashtra

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.