सरकारी कामेआपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेष

आयुष्मान मित्र आयडीसाठी अशी करा ऑनलाईन नोंदणी – Ayushman Mitra Online Registration

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत, मोफत आणि कॅशलेस आरोग्य सेवा देण्याचे लक्ष्य आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी ‘आयुष्मान मित्र’ ची संकल्पना करण्यात आली आहे. आयुष्मान मित्र एक स्वयंसेवी उपक्रम आहे. देशातील कोणताही नागरिक आयुष्मान मित्र बनू शकतो.

आयुष्मान मित्राची कार्ये: 

  • लाभार्थ्यांना त्यांची पात्रता तपासण्यासाठी मदत करणे.
  • लाभार्थ्यांना जवळच्या CSC किंवा सूचीबद्ध रुग्णालयातून आयुष्मान कार्ड तयार करण्यात मदत करणे.
  • सूचीबद्ध रुग्णालये ओळखण्यात लाभार्थ्यांना मदत करणे.
  • योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या हक्कांविषयी माहिती देणे.

आयुष्मान मित्र आयडी तयार करण्याची ऑनलाईन प्रोसेस:

आयुष्मान मित्र आयडी तयार करण्यासाठी खालील आयुष्मान भारत (PMJAY) राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण या अधिकृत वेबपोर्टलवर भेट द्या.

https://pmjay.gov.in/ayushman-mitra

पोर्टल ओपन झाल्यावर Click here to register वर क्लिक करा.

Click here to register
Click here to register

आता User Management चे एक पेज ओपन होईल त्यामध्ये Ayushman Mithra Registration वर क्लिक करा.

Ayushman Mithra Registration
Ayushman Mithra Registration

Ayushman Mithra Registration वर क्लिक केल्यानंतर Self Registration चे पेज ओपन होईल, यामध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर टाका आणि Submit बटन वर क्लिक करा.

Self Registration
Self Registration

मोबाईल नंबर पडताळणीसाठी प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा. ई-केवायसीसाठी आधार प्रमाणीकरणासाठी प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा.

Personal Details मध्ये आपली सर्व माहिती आधारकार्ड प्रमाणे येईल. आपल्याला फक्त आपला फोटो अपलोड करायचा आहे, तसेच  इमेल आयडी आणि आधारकार्ड वरचा पत्ता जर सध्याचा पत्ता असेल तर तिथे बॉक्स मध्ये टिक करायची आहे.

पुढे Declaration बॉक्स मध्ये टिक करा आणि Self Register वर क्लिक करा मग तुमचा आयुष्मान मित्र आयडी यशस्वीरित्या जनरेट केला जाईल.

आता तुम्ही वेब पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी आयुष्मान मित्र आयडी वापरकर्ता आयडी म्हणून वापरू शकता आणि डॅशबोर्डवर कधीही प्रवेश करू शकता.

आयुष्मान मित्र लॉगिन (Ayushman Mithra Login):

आयुष्मान मित्र लॉगिन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि Ayushman Mithra Login वर क्लिक करा.

Ayushman Mithra Login
Ayushman Mithra Login

Ayushman Mithra Login वर क्लिक केल्यानंतर आयुष्मान मित्र आयडी टाका आणि रजिस्टर मोबाईलवर ओटीपी येईल तो टाकून लॉगिन करा. आयुष्मान मित्र लॉगिन मध्ये विविध पर्याय लवकरच उपलब्ध होतील जेणे करून आयुष्मान मित्र (Ayushman Mithra) आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड संदर्भात मदत करू शकतील.

हेही वाचा – आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लाभार्थी यादी ऑनलाईन कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.