नोकरी भरतीवृत्त विशेषसरकारी कामे

DGIPR Internship : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी !

कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात आंतर्वासिता (DGIPR Internship) उपक्रमाची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

शासनाच्या योजना, ध्येय-धोरणे, मंत्रिमंडळ निर्णय, उपक्रम यांना प्रसिद्धी देण्याचे काम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे करण्यात येत असते. यामध्ये मुद्रित माध्यम, दृक श्राव्य माध्यम, वेब माध्यम, समाज माध्यम अशा विविध माध्यमांचा वापर करण्यात येतो. या सर्व बाबींचा जवळून अभ्यास करण्याची संधी या उपक्रमाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

या उपक्रमाची अधिक माहिती खालीलप्रमाणे- (DGIPR Internship)

1.आंतर्वासिता (DGIPR Internship) उपक्रमाचा कालावधी 3 महिन्यांचा असेल.

2. विद्यार्थ्यांना यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन, प्रवास भत्ता अथवा निवास व्यवस्था सुविधा देय असणार नाही.

3.विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार/कौशल्यानुसार विविध शाखांमध्ये काम देण्यात येईल. (मुद्रित माध्यम, दृकश्राव्य, सोशल मीडिया, प्रकाशने, व्हिडीओ एडिटिंग, तंत्रज्ञान विषयक बाबी इत्यादी)

4. सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी कामकाजाची वेळ असेल. मात्र संबंधित शाखेच्या कामकाजानुसार ती बदलू शकते. शनिवारी व रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल

5. विद्यार्थ्यांच्या कामकाजाचा दरमहा आढावा घेण्यात येईल. एखाद्या विद्यार्थ्याचे काम असमाधानकारक आढळल्यास त्याचा कार्यकाळ तातडीने संपुष्टात आणण्यात येईल.

6. आंतरवासिता उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल.

अर्ज कोठे करावा?

इच्छुकांनी संशोधन अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, १७ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन मंत्रालयासमोर, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई -३२ येथे बंद पाकिटात अर्ज सादर करावा.

अर्जासोबत वैयक्तिक माहिती, नमुन्यातील माहिती, पदवी प्रमाणपत्राची प्रत व सध्या शिकत असल्यास अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयीन ओळखपत्राची प्रत जोडावी. पाकिटावर (DGIPR Internship) इंटर्नशिपसाठी अर्ज असा स्पष्ट उल्लेख करावा.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: १५ जून २०२४ ही असेल.

अर्ज (DGIPR Internship Application Form): इंटर्नशिपचा अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या उपक्रमासंदर्भातील सर्वाधिकार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय राखून ठेवत आहे.

हेही वाचा – राष्ट्रीय करिअर सेवा : 10वी/12वी उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; ऑनलाईन अर्ज करा ! – National Career Service

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.