मंत्रालयात प्रवेशासाठी ‘डीजीप्रवेश ॲप’वर अशी करा ऑनलाईन नोंदणी!
मंत्रालय सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारीत (Digi Pravesh) प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली. तसेच टप्पा २ अंतर्गत प्रवेशासाठी व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना १ एप्रिल पासून ‘डिजीप्रवेश – Digi Pravesh’ या ऑनलाईन ॲपवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नोंदणीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
मंत्रालयात प्रवेशासाठी ‘डीजीप्रवेश ॲप’वर नोंदणी करा! Digi Pravesh:
नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या क्यू आर कोड आधारे मंत्रालय बाहेर असलेल्या खिडकीवर मंत्रालय प्रवेशकरिता आरएफआयडी कार्ड वितरीत करण्यात येईल. हे आरएफआयडी कार्ड आधारे सुरक्षा विषयक तपासणी करून मंत्रालयात प्रवेश देण्यात येईल. अभ्यागतांना आरएफआयडी प्रवेश ओळखपत्र परिधान करावे व मंत्रालयातून बाहेर जाताना ते सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे जमा करावे.
ॲण्ड्राईड आणि आयओएस ॲपल या दोन्ही प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या मोबाईल च्या प्रणालीनुसार ॲण्ड्राईडमध्ये प्ले स्टोअर वर तर आयओएस ॲपलवर ॲपल स्टोअरवर digi pravesh हे सर्च केल्यास हे ॲप विनामुल्य डाऊनलोड करता येते. या ॲपवर सुरूवातीला केवळ एकदाच नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारीत यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्यानंतर ज्या विभागात काम आहे, त्याचा स्लॉट बुक करून रांगेशिवाय प्रवेश घेता येईल. या संपूर्ण प्रक्रियेला तीन मिनीटांपेक्षा कमी कालावधी लागतो.
डिजी प्रवेश ॲपची वैशिष्ट्ये
डिजिटल आणि पेपरलेस प्रक्रिया
फेस रिकग्निशन आधारित सुरक्षा
RFID कार्ड प्रणाली
ऑनलाइन स्लॉट बुकिंग
Android व iOS दोन्हीवर उपलब्धता
वेळेची मोठी बचत
मंत्रालयात प्रवेशासाठी डीजीप्रवेश ॲप – Mantralaya Digi Pravesh:
- राज्यभरातील क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना यापुढे कोणत्याही कामासाठी मंत्रालयात प्रवेश हवा असल्यास, त्यांना DigiPravesh या ऑनलाइन अॅप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात प्रवेश दिला जाणार आहे.
- यासाठी DigiPravesh अॅपद्वारे आपली नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या क्यूआर कोड आधारे मंत्रालयाबाहेर असलेल्या खिडकीवर मंत्रालय प्रवेशासाठी आरएफआयडी ( RFID) कार्ड वितरित करण्यात येईल. या कार्डच्या आधारे सुरक्षाविषयक तपासणी करून मंत्रालयात प्रवेश देण्यात येईल.
- अभ्यागतांना मिळालेले प्रवेश ओळखपत्र परिधान करणे व मंत्रालयातून बाहेर जाताना ते सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे जमा करणे बंधनकारक राहील.
- विभागीय कार्यालयीतील अधिकारी व कर्मचारी यांना कामानिमित्त मंत्रालयात प्रवेश हवा असल्यास त्यांनाही अॅपवर नोंदणी करणे बंधनकार करण्यात आले असून, त्यांना ज्या विभागामध्ये कामानिमित्त भेट द्यावयाची आहे त्या विभागाच्या संमतीने मंत्रालयात सकाळी १० वाजल्यापासून प्रवेश दिला जाईल.
- क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना बैठकीसाठी मंत्रालयात आमंत्रित केले असल्यास बैठक पत्र, सूचना बैठकीच्या किमान एक दिवस अगोदर अॅपवर अपलोड करणे बंधनकारक असेल. तसेच बैठकीसाठी संबंधित विभागांनी जास्तीत जास्त दोन अधिकाऱ्यांना पाठवावे.
- बैठक किंवा सुनावणीसाठी अधिकारी, लोकांना किंवा वकिलांना न बोलवता ऑनलाइन सुनावणी घ्यावी असे गृह विभागाच्या आदेशात नमूद केले आहे.
डीजीप्रवेश ॲप डाउनलोड : (Digi Pravesh App Download) :
डीजीप्रवेश (Digi Pravesh) ॲप खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा किंवा प्लेस्टोअर/ऍपस्टोअर वर “Digi Pravesh” सर्च करून हे ॲप डाऊनलोड करावे.
Google Play Store : Digi Pravesh App
Apple App Store : Digi Pravesh iOS App
अधिकृत संकेतस्थळ : digipravesh.com
डीजीप्रवेश (Digi Pravesh) ॲपद्वारे आपली आधार आधारित नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या क्यूआर कोड आधारे मंत्रालयाबाहेर असलेल्या खिडकीवर मंत्रालय प्रवेशासाठी आरएफआयडी ( RFID) कार्ड वितरित करण्यात येईल. या कार्डच्या आधारे सुरक्षाविषयक तपासणी करून मंत्रालयात प्रवेश देण्यात येईल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्र.१. डिजी प्रवेश अॅप कुठे मिळेल?
उ.१. हे अॅप Android व iOS या दोन्ही अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे.
प्र.२. नोंदणी करताना कोणते तपशील लागतात?
उ.२. Aadhaar क्रमांक व चेहरा ओळख पडताळणी अनिवार्य आहे.
प्र.३. मंत्रालयात प्रवेशासाठी आता कागदी पास मिळणार नाही का?
उ.३. नाही, आता प्रवेश फक्त डिजी प्रवेश अॅपद्वारेच मिळणार आहे.
प्र.४. ही प्रक्रिया किती वेळ घेते?
उ.४. नोंदणी व प्रवेश प्रक्रिया साधारण 3 मिनिटांत पूर्ण होते.
प्र.५. डिजी प्रवेश अॅप विनामूल्य आहे का?
उ.५. होय, हे अॅप पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे.
या लेखात, आम्ही मंत्रालयात प्रवेशासाठी ‘डीजीप्रवेश (Digi Pravesh) ॲप’वर नोंदणी विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता खड्डे तक्रार निवारण प्रणाली वर अशी करा तक्रार !
- शासकीय कामे होत नसतील तर ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची? जाणून घ्या सविस्तर – (आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली) Grievances Maharashtra
- आपले सरकार २.० – तक्रार निवारण प्रणालीची कार्यपध्दती अद्ययावत ! Aaple Sarkar 2.0 Grievances Maharashtra
- व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही आता डायल ११२ मध्ये समावेश !
- माहिती अधिकाराचा अर्ज ऑनलाईन मोबाईलद्वारे कसा करायचा ? जाणून घ्या सविस्तर
- महाराष्ट्र लोक आयुक्त कडे तक्रार कशी दाखल करावी? जाणून घ्या सविस्तर !
- ग्राहक संरक्षण अधिनियमान्वये तक्रार दाखल करण्याची पद्धत
- लोकाभिमुख प्रशासनच्या दृष्टीने जनतेच्या तक्रारींची दखल घेणे, त्यांचे वेळेत निराकरण करणे, तक्रारदारांना सन्मानाची वागणूक देणेबाबत शासन नियम
- निनावी तक्रारीसाठी काय नियम आहे?
- आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, ‘सीव्हिजिल ॲप’ वर तक्रार करा ! cVIGIL App
- निवडणूक उमेदवारांच्या गुन्हेगारी रेकॉर्ड पूर्ववृत्तांसाठी Know Your Candidate ॲप सुरू !
- दिव्यांग मतदारांना सक्षम ॲपच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध ! Saksham-ECI App
- मतदार यादी ऑनलाईन कशी डाउनलोड करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- घरबसल्या मतदान कार्ड ऑनलाईन कसे काढायचे? सविस्तर प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- डिजिटल मतदान कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर
- निवडणूक आयोगामार्फत मतदारांसाठी विविध उपयोगी प्रणाली पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- मतदार यादीत नाव नसेल तर पात्र व्यक्तींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन !
- “एक देश, एक निवडणूक” च्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी !
- निवडणूक आणि प्रचाराबाबात राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!