उच्च व तंत्र शिक्षण विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता रकमेत वाढ

मा. मुख्यमंत्री महोदयांनी दि.०३.०५.२०२३ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार, शासनाचे विविध विभाग / उपक्रम / महामंडळे यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचे निकष एकसारखे असावेत, यासाठी शिफारस करण्याकरिता मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. उपरोक्त समितीने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने दि.१९.१०.२०२३ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णयानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि.३०.१०.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये विविध विभागात देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती व वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयंम अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये तसेच, यापुढे प्रस्तावित करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये एकसमानता रहावी, यासाठीचे धोरण निश्चित केले आहे. या धोरणात वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी किती रक्कम अदा करावी, याबाबतचे दर निश्चित करण्यात आले आहेत. तसेच, हे दर उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येत असलेल्या विद्यार्थ्यांना लागू करण्यास देखील उपरोक्त धोरणात मान्यता दिली आहे. त्यानुसार या विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मान्यता दिलेल्या निर्वाह भत्त्याचे दर लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता रकमेत वाढ शासन निर्णय :-

राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे व कला संचालनालय, मुंबई यांच्या अखत्यारितील शासकीय, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने / सार्वजनिक विद्यापीठे (अभिमत विद्यापीठे / स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांस शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (Centralized Admission Process-CAP) (व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेशित विद्यार्थ्यापैकी, ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.८.०० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाह खर्च भागविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून खालील सुधारीत दराने निर्वाह भत्ता, पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट वितरीत करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे:-

(आकडे रुपयात)

अ.क्र.भत्तामुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरात उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी.इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी.इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी.तालुका ठिकाणी उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी.
भोजन भत्ता३२,०००/-२८,०००/-२५,०००/-२३,०००/-
निवास भत्ता२०,०००/-१५,०००/-१२,०००/-१०,०००/-
निर्वाह भत्ता८,०००/-८,०००/-६,०००/-५,०००/-
एकूण रक्कम६०,०००/-५१,०००/-४३,०००/-३८,०००/-

प्रस्तुत योजनेकरीता या विभागाच्या विविध शासन निर्णयान्वये वेळोवेळी विहित केलेल्या अन्य अटी-शर्ती व कार्यपध्दती लागू राहील.

सदर शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र.सान्यावि- २०२३/प्र.क्र.६०(४)/बांधकामे, दि.३०.१०.२०२३ अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरुन तसेच, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.११५०/व्यय-५. दि.१२.१२.२०२३ अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय : डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत प्रदान करण्यात येणाऱ्या भत्त्याच्या रकमेत वाढ करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – सुधारित मनोधैर्य योजना २०२४

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.