वृत्त विशेषजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी कामे

विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत शासन निर्णय जारी !

भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अस्तित्वात असलेल्या मतदार यादीची पडताळणी व दुरुस्ती करुन ती त्रुटी विरहीत करण्याचा व दिनांक ०१ जानेवारी या अर्हता दिनांकानुसार नविन मतदार नाव नोंदणी करुन मतदार यादी सुधारित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येतो. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, २०२३ मध्ये दिनांक १ जानेवारी, २०२३ रोजी १८ वर्षे पूर्ण करणारे नवमतदार यांची नोंदणी करून मतदार यादी सुधारीत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. तसेच सन २०२३ पासून दरवर्षी दिनांक १ जानेवारी, ०१ एप्रिल, ०१ जुलै व ०१ ऑक्टोंबर अशा चार अर्हता दिनांकानुसार वा त्यापुर्वी १८ वर्ष पुर्ण होणाऱ्या नागरीकांना मतदार यादीमध्ये आगाऊ नाव नोंदणी करता येणार आहे. सदर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक ०९ नोव्हेंबर, २०२२ रोजी राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत व दिनांक ९ नोव्हेंबर, २०२२ ते दिनांक ८ डिसेंबर, २०२२ या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. यामुळे वार्षिक संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, २०२३ अंतर्गत दिनांक ०१ ऑक्टोंबर, २०२३ या दिनांकापर्यंत १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या नवयुवकांना मतदार नाव नोंदणीसाठी ( दिनांक ९ नोव्हेंबर, २०२२ नंतर ) आगाऊ अर्ज सादर करता येणार आहेत.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, २०२३ अंतर्गत नागरिकांनी मतदार यादीतील त्यांची नोंदणी तपासणी करण्याचा व नविन मतदारांनी नाव नोंदणी करण्याचा उपक्रम तसेच मतदार यादीतील नोंदीला आधार क्रमांक जोडण्याचा उपक्रम गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचावा याकरीता प्रत्येक गावामध्ये एका विशेष ग्रामसभेचे आयोजन दिनांक ९ नोव्हेंबर, २०२२ ते दिनांक ८ डिसेंबर, २०२२ या कालावधीत करण्याची विनंती प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात आली आहे.

त्यानुसार राज्यातील सर्व ग्रामपंचायतीना असे निदेश देण्यात येत आहेत की, त्यांनी दिनांक १० नोव्हेंबर, २०२२ रोजी संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे.

सदर विशेष ग्रामसभेमध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने खालील उपक्रम करण्यात यावेत.

 • ग्रामपंचायतीची अस्तित्वात असलेली मतदार यादी ग्रामसभेमध्ये गावातील सर्व नागरिकांना पहाण्यासाठी/ तपासण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच या यादीचे ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात यावे.
 • गावातील सर्व नागरिकांना मतदार यादीमधील नोंदी तपासून घेण्यासाठी सांगण्यात यावे.
 • गावातील मतदार यादीमधील नोंदणी झालेल्या मतदारांच्या नोंदणीचे प्रमाणिकरण करण्यासाठी त्यांचा आधार क्रमांक NVSP, Voter Helpline App व GARUDA App द्वारे गोळा करण्यात यावा.
 • मतदार यादीमधील नोंदीबाबत नागरीकांना हरकती असल्यास त्यांना नोंदीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास किंवा नांव नसलेल्या पात्र नागरिकांना त्यांचे नांव नव्याने नोंदवावयाचे असल्यास त्यांना विहीत अर्ज फॉर्म तेथेच ग्रामसभेत उपलब्ध करुन दयावेत. याकरीता ग्रामपंचायत कार्यालयाने आधीच संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय/तहसिल कार्यालयाकडून आवश्यक अर्जाच्या फॉर्मचे नमुने उपलब्ध करुन घ्यावेत. या अंतर्गत मयत मतदारांची वगळणी, कायम स्थलांतरीत मतदारांची वगळणी, लग्न होऊन बाहेर गेलेल्या महिलांच्या नावाची वगळणी तसेच लग्न होऊन गावात आलेल्या महिलांच्या नावाची नोंदणी. PWD मतदार चिन्हांकित करणे व ज्यांचे दिनांक ०१/०१/२०२३ रोजी १८ वर्ष पूर्ण होत आहे त्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी, तसेच ज्यांचे दिनांक ०१ ऑक्टोंबर, २०२३ रोजी पर्यंत १८ वर्ष पूर्ण होणार आहेत, त्यांच्याकडून नविन मतदार नोंदणीसाठी आगाऊ अर्ज घेणे, या कामावर भर देण्यात यावा.
 • ग्रामसेवक किंवा संबंधित गावातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO ) यांनी नागरिकांना अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन करावे. या कामासाठी गाव कामगार व तलाठी यांनी सहकार्य करावे.
 • नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या हरकती/आक्षेप/ दुरुस्ती वा नांव नोंदणींच्या अर्जाचे संकलन करुन ग्रामपंचायत कार्यालयाने संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडे पाठवावे.
 • शक्य असल्यास. सदर ग्रामसभेमध्ये नागरिकांना ऑनलाईन नांव नोंदणी NVSP Portal/Voter Helpline App वरुन कशी करता येते याबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO ) यांनी माहिती दयावी.
 • नागरिकांना मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून मतदार यादीबाबतचे कामकाज कसे चालते याची महिती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO ) यांनी माहिती दयावी.
 • नागरीकांना संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO ) यांचे नांव, संपर्क क्रमांक उपलब्ध करुन दयावेत.
 • संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO ) यांनी ग्रामसभेमध्ये गावातील नागरिकांनी दिलेल्या हरकती / आक्षेप / दुरुस्ती या नाव नोंदणांच्या अर्जाची स्थितीबाबत त्या नागरिकांना कोठून व कशी माहिती मिळेल याबाबत मार्गदर्शन करावे.

वरीलप्रमाणे राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी दिनांक १० नोव्हेंबर २०२२ या रोजी संपुर्ण राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करुन त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे पाठवावा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी या विशेष ग्रामसभा या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये होतील याची दक्षता घ्यावी व तशा सुचना त्यांनी त्यांच्या स्तरावरुनही ग्रामपंचायतीना द्याव्यात.

या संदर्भात व्यापक योग्य ती प्रसिध्दी गावपातळीवर होईल याचीही दक्षता संबंधीत पंचायत समित्यांनी घ्यावी. याबाबतच्या प्रसिध्दीसाठीचा कंटेट जिल्हा निवडणूक अधिकारी/मतदार नोंदणी अधिकारी/सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडून उपलब्ध करून घ्यावा. याची प्रसिध्दी प्रत्यक्ष ग्रामसभेच्या १० दिवस अगोदर करावी. जेणेकरून जास्तीत जास्त ग्रामस्थांचा सहभाग वाढेल.

ग्राम विकास विभाग शासन निर्णय: मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणी, नविन नोंदणी तसेच मतदार यादीतील नोंदणीस आधार क्रमांक जोडणी इत्यादी प्रक्रीया गावातील नागरीकांपर्यंत सुलभतेने पोहचाव्या याकरिता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – ग्रामपंचायत ग्रामसभा नियम व अटी (महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ व ८ नुसार)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत शासन निर्णय जारी !

 • Sukhdev jondhale

  खूप छान माहिती आहे

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.