वृत्त विशेषमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी कामे

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकींसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत शासन परिपत्रक जारी

भारत निवडणूक आयोगाच्या दि .१४.०७.२०२२ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार, राज्यातील नाशिक व अमरावती विभाग पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक विधानपरिषद मतदारसंघामध्ये सन २०२३ मध्ये होणाऱ्या द्विवार्षिक निवडणूकींसाठी त्या विभागातील अनुक्रमे पदवीधर व शिक्षक यांची दि. १-११-२०२२ या अर्हता दिनांकावर पुर्णत: नविन मतदार यादी ( de – novo elector’s roll ) तयार करण्याची मोहीम दि.०१.१०.२०२२ पासून सुरु होत आहे.  या मोहिमेंतर्गत दि. १-१०-२०२२ ते दि. ७-११-२०२२ या कालावधीत पदवीधर मतदार नोंदणीसाठी नमुना १८ ( Form १८ ) व शिक्षक मतदार नोंदणीसाठी नमुना १९ (Form १९) स्विकारण्यात येतील. दि. २३-११-२०२२ रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील व दि.२३-११-२०२२ ते दि. ९ – १२-२०२२ या कालावधीत दावे व हरकती स्विकारल्यानंतर, दि. ३०-१२ २०२२ रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील.

उपरोक्त द्विवार्षिक निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी, नाशिक व अमरावती विभागातील पात्र पदविधर व्यक्तींनी तसेच औरंगाबाद, नागपूर व कोकण विभागातील पात्र शिक्षकांनी त्या संबंधित विभागामध्ये पदवीधर/शिक्षक मतदार म्हणून मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी करावी, यासाठी नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर व कोकण विभागातील विद्यापीठे व त्याअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांनी खालीलप्रमाणे मोहिम राबविण्याबाबतची विनंती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात आली आहे. या निवडणूकांसाठी संबंधित विभागीय आयुक्त हे मतदार नोंदणी अधिकारी ( Electoral Registration Officer ) तसेच त्या विभागातील जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी ( Assistant Electoral Registration Officer ) असतात.

नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर व कोकण विभागातील विद्यापिठे व त्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयानी पुढीलप्रमाणे मोहिम राबवावी:

अ) पदवीधर मतदार संघ:

नाशिक व अमरावती विभागामध्ये पदवीधर विधानपरिषद मतदारसंघासाठी मतदार यादी तयार करण्यात येत असल्याने, त्या विभागातील पात्र पदवीधर महाविद्यालयीन शिक्षकांनी नाशिक व अमरावती विभागातील महाविद्यालयातील पात्र पदवीधर शिक्षकांना संबंधित पदवीधर विधान परिषद मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नांव नोंदणी करण्यासाठी नमुना १८ ( FORM १८ ) भरावा लागेल. सदर नमुना १८, संबंधित विभागीय आयुक्त ( या निवडणूकीचे मतदार नोंदणी अधिकारी ), संबंधित जिल्हाधिकारी ( या निवडणूकीचे मतदार नोंदणी अधिकारी ), विभागीय आयुक्तांकडून पदनिर्देशित केलेले उप विभागिय आयुक्त तसेच तहसिलदार यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील तसेच सदर योग्यरित्या भरलेले अर्ज त्या कार्यालयात भरुन देता येतील. त्याच प्रमाणे, हा नमुना मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर Downloads / DownloadForms / Form – १८.pdf येथे सुद्धा उपलब्ध आहे. सदर नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घेऊन ( प्रिन्ट काढून ) भरुन देता येईल. ( ऑन – लाईन पद्धतीने नमूना सादर करण्याची सुविधा उपलब्ध नाही ) ( अर्हता दिनांक दि. १-११-२०२२ पुर्वी किमान ३ वर्षे आधी पदवी धारण केलेल्या संबंधित पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याचे आवाहन करण्यात यावे तसेच प्रोत्साहित करण्यात यावे.

योग्य रितीने भरलेला नमुना १८ ( FORM १८ ), त्यासोबत शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक पुराव्यासह वर नमूद सबधित कार्यालयात सादर करण्यात यावा. सदर अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात सादर केल्यास संबंधित पदनिर्देशित अधिका-याला मुळ पदवी प्रमाणपत्र/गुणपत्रिका किंवा अन्य विहित कागदपत्र दाखवावे लागेल. टपालाद्वारे नमुना १८ पाठविल्यास संबंधित शैक्षणिक पात्रता दर्शविणारा पुरावा/कागदपत्रे पदनिर्देशित अधिकारी/सहायक पदनिर्देशित अधिकारी/संबंधित जिल्ह्यातील राजपत्रित अधिकारी/नोटरी पब्लिक यांच्याकडून प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे.

ब ) शिक्षक मतदार संघ:

औरंगाबाद, नागपूर व कोकण विभागामध्ये शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी मतदार यादी तयार करण्यात येत असल्याने, त्या विभागातील लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५० च्या अधिनियम २७ ( ३ ) ( ब ) खाली राज्य शासनाने निवडणूक आयोगाच्या मान्यतेने निश्चित केलेल्या, माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थामध्ये दि. १-११-२०२२ या अर्हता दिनांकापुर्वीच्या लगतच्या सहा वर्षांमध्ये किमान ३ वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकांना संबंधित शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याचे आवाहन करण्यात यावे तसेच प्रोत्साहित करण्यात यावे.

औरंगाबाद, नागपूर व कोकण विभागातील पात्र शिक्षकांना संबंधित शिक्षक विधान परिषद मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नांव नोंदणी करण्यासाठी नमुना १९ ( FORM १९ ) व त्यासोबत विहित नमुन्यातील संबंधित शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाने दिलेले प्रमाणपत्र भरावे लागेल. सदर नमुना १९ व विहित प्रमाणपत्राचा नमुना, संबंधित विभागीय आयुक्त ( या निवडणूकीचे मतदार नोंदणी अधिकारी ), संबंधित जिल्हाधिकारी ( या निवडणूकीचे मतदार नोंदणी अधिकारी ), विभागीय आयुक्तांकडून पदनिर्देशित केलेले उप विभागिय आयुक्त तसेच तहसिलदार यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील तसेच सदर योग्यरित्या भरलेले अर्ज त्या कार्यालयात भरुन देता येतील. त्याच प्रमाणे, नमुना १ ९ व विहित प्रमाणपत्राचा नमुना, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर अनुक्रमे, Downloads / Download Forms / Form – १९. pdf व Downloads / Download Forms / Certificate – Form- १९. pdf येथे सुद्धा उपलब्ध आहेत. सदर नमुने संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घेऊन ( प्रिन्ट काढून ) भरुन देता येतील. ( ऑन – लाईन पद्धतीने नमूना सदर करण्याची सुविधा उपलब्ध नाही )

योग्य रितीने भरलेला नमुना १९ ( FORM १९ ), त्यासोबतच्या वर नमूद केलेल्या विहित प्रमाणपत्रासह उपरोक्त संबंधित कार्यालयात सादर करण्यात यावा.

एकत्रित स्वरुपात अर्ज ( Application in bulk ) प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे स्विकारण्यात येत नाहीत. तथापि, संस्था प्रमुख ( Head of Institution ) त्यांच्या संस्थेतील पात्र शिक्षक / पदवीधर कर्मचा-यांचे अर्ज एकत्रित रित्या सादर करु शकतात. राजकीय पक्ष, मतदान केन्द्र निहाय प्रतिनिधी किंवा रहिवाशी कल्याणकारी संघटना यांच्यामार्फत एकत्रित स्वरुपात अर्ज ( Application in bulk ) प्राप्त होणा-या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.

विधानपरिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदार संघासाठी मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठीची पात्रता तसेच कार्यपध्दती या बाबतची सविस्तर माहिती भारत निवडणूक आयोगाच्या पत्र क्र. ३७ / एलसी / इन्स्ट / इसीआय / एफयुएनसी / इआरडी / इआर / २०१६ दि. ५ सप्टेंबर, २०१६ च्या पत्रात नमूद करण्यात आली आहे. सदर पत्र मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर Sohedule for de – novo preparation of electoral rolls w.r.t. १-११-२०२२ as qualifying date in respect of Graduates and Teachers ‘ Constituencies of State Legislative Council ” या शिर्षकाखाली उपलब्ध आहे.

शासन परिपत्र: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकींसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत शासन परिपत्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – पदवीधर मतदारसंघ – Graduate constituency

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.