वृत्त विशेषसरकारी योजना

विशेष केंद्रीय सहाय्य योजना महिलांना दोन दुधाळ जनावरांचा गट वाटप योजना; ऑनलाईन अर्ज करा

विशेष केंद्रीय सहाय्य योजना (आदिवासी विकास विभाग) अंतर्गत आदिवासी महिलांना दोन दुधाळ जनावरांचा गट वाटप योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, आदिवासी विकास विभागाने केले आहे. या योजनेअंतर्गत संकरित गाय – एच.एफ. / जर्सी म्हैस – मुऱ्हा / जाफराबादी, देशी गाय – गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी वाटप केलं जाणार आहे.

विशेष केंद्रीय सहाय्य योजना दोन दुधाळ जनावरांचा गट वाटप योजना:

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने):

१) लाभार्थी ही आदिवासी महिला बचत गटातील सदस्य असणे अनिवार्य राहिल.

>

२) लाभार्थी सदस्य असलेला महिला बचत गट हा नोंदणीकृत असावा.

३) महिला बचत गट ज्या यंत्रणे अंतर्गत स्थापन केलेला आहे त्यांचे बचत गट चालू स्थितीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

४) अपंग, विधवा, परितकत्या, अल्प भूधारक महिलांना प्राधान्य देण्यात यावे.

५) लाभार्थीकडे ओलिताखालील क्षेत्र व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक राहील. किमान २० गुंठे क्षेत्र सिंचनाखाली आवश्यक असून ७/१२ उतारा /८ उतारावर नोंद असणे आवश्यक आहे. तसेच सुखा चारा उपलब्ध करून द्यावा.

६) सदस्यांकडे किमान ४ गायीकरिता गोठ्यांची उपलब्धता असावी.

७) एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचे लाभ देण्यात यावा.

८) लाभार्थ्याने किंवा त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी मागील ३ वर्ष सदर योजनेचा लाभ यापूर्वी आदिवासी विकास विभाग अथवा इतर कोणत्याही शासकीय विभागाकडून घेतला नसल्याबाबत हमी पत्र सादर करणे आवश्यक राहील.

९) लाभार्त्याने दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण घेतलेले शासन मान्य संस्थेचे प्रमाणपत्र (उदा. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना, दीनदयाळ कौशल्य विकास योजना,जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजगकता विकास केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, राष्ट्रीय कृत बँक, कृषी विद्यापीठ, आत्मा ई.) यांना प्राधान्य देण्यात यावे.

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील:

अ.क्र. बाब २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )
1 संकरित गाईचा गट – प्रति गाय रु. ५५,०००/- प्रमाणे १,१०,०००
2 प्रति गाय विमा रु. २,७५०/- (३ वर्षासाठी) ५,५००
3 वाहतुक खर्च प्रती लाभार्थी ४,५००
एकूण प्रकल्प किंमत १,२०,०००

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
२) सातबारा (अनिवार्य)
३) ८ अ उतारा (अनिवार्य)
४) अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
५) आधारकार्ड (अनिवार्य )
६) बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य)
७) अनुसूचीत जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (अनिवार्य)
८) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र (अनिवार्य)
९) ग्रामपंचायत नमुना नंबर ८ (असल्यास अनिवार्य)
१०) लाभर्थ्याची स्वत:ची जमीन नसल्यास भाडे तत्वावर जमीन घेतले बाबतचे संमती पत्र सातबारा व ८ अ उतार्‍यासह (अनिवार्य)
११) रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
१२) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१३) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य)
१४) दिव्यांग असल्यास दाखला (अनिवार्य )
१५) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१६) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१७) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१८) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

अधिक माहिती साठी शासन निर्णय पाहावा : शासन निर्णय पहा

अर्ज करावयाचा कालावधी: 

मा.जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील निवड समितीसमोर नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत प्राथमिक लाभार्थी निवड ऑनलाईन पद्धतीने करणेकरिता जिल्हा निहाय वेळापत्रक

जिल्हा दिनांक
लाभार्थींचे ऑनलाईन अर्ज स्वीकारणे
नंदूरबार १४ जानेवारी २०२२ ते २३ जानेवारी २०२२

ऑनलाईन अर्ज करा:

विशेष केंद्रीय सहाय्य योजना (आदिवासी विकास विभाग) अंतर्गत आदिवासी महिलांना दोन दुधाळ जनावरांचा गट वाटप योजनांसाठी खालील पोर्टलवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करावा किंवा Nandurbar-MAHABMS  या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत अँड्रॉईड मोबाईल अप्लिकेशन डाउनलोड करून ऑनलाईन अर्ज करा.

NAH MAHABMS अधिकृत पोर्टल: https://nah.mahabms.com/webui/registration

Nandurbar MAHABMS अधिकृत अप्लिकेशन: Nandurbar MAHABMS App 

संपर्क: जिल्हा पशुसवर्धन उपआयुक्त/ जिल्हा पशुसवर्धन अधिकारी / पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) पंचायत समिती याच्याशी संपर्क करण्याकरिता सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजे पर्यन्त संपर्क करावा, संपर्क साधण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM); शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा – National Livestock Mission

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.