सरकारी योजनाजिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र शासन निर्णय - GR

शिवभोजन केंद्र वर्ग करणेबाबत मार्गदर्शक सूचना जारी !

शिवभोजन योजना ही शासनाची महत्वाकांशी योजना असून या योजनेद्वारे गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दराने भोजन देण्यात येते. त्यासाठी प्रचलित पद्धतीने शिवभोजन केंद्र मंजूर करण्यात येतात. मात्र शिवभोजन केंद्र मंजूर झाल्यानंतर संबंधित शिवभोजन केंद्र चालकाचा मृत्यू झाल्यास किंवा अन्य कारणाने संबंधित शिवभोजन केंद्र, केंद्र चालकाच्या वारसाच्या अथवा अन्य व्यक्तीच्या नावे वर्ग करण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित शिवभोजन केंद्रचालक / क्षेत्रिय कार्यालयांकडून शासनास प्राप्त होतात. शिवभोजन केंद्र मंजूर केल्यावर त्या केंद्रासाठी वारसाहक्क प्राप्त होतो, अशी गैरसमजूत असल्याचे दिसून येते. तसेच शिवभोजन केंद्र मंजूर झाले म्हणजे एखादा परवाना (license) मिळाला, ज्याचे हस्तांतर करता येते अशी समजूत झाल्याचे देखील दिसून येते. त्यामुळे याबाबत स्पष्टता येणे गरजेचे आहे. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शिवभोजन केंद्र वर्ग करणेबाबत मार्गदर्शक सूचना जारी ! Shiv Bhojan Kendra:

१) शिवभोजन केंद्रचालक शिवभोजन केंद्र चालविण्यास असमर्थ असल्यास किंवा शिवभोजन केंद्र चालविण्याची त्याची इच्छा नसल्यास असे शिवभोजन केंद्र रद्द करण्यात यावे व त्या शिवभोजन केंद्राचा इष्टांक शासनाकडे वर्ग करण्यात यावा.

(२) शिवभोजन केंद्र चालकाने अथवा मान्यवरांनी शिवभोजन केंद्र वारसास किंवा अन्य व्यक्तिच्या नावे वर्ग करण्याची शिफारस केल्यास असे शिवभोजन केंद्र संबंधितांच्या नावे वर्ग करण्याबाबतचे प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करु नयेत.

३) शिवभोजन केंद्रचालकाचा मृत्यू झाल्यास संबंधित शिवभोजन केंद्र रद्द करून संबंधित शिवभोजन केंद्राचा इष्टांक शासनाकडे वर्ग करण्यात यावा. असे शिवभोजन केंद्र वारसाचे नावे वर्ग करण्यासाठी शासनाकडे प्रस्तावित करु नये.

४) अशा रद्द / बंद केलेल्या शिवभोजन केंद्राच्या ठिकाणी नवीन केंद्राची गरज आहे असे जिल्हा प्रशासनाचे मत असेल तर त्यासाठी प्रचलित पद्धतीने नवीन प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही करावी.

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय: शिवभोजन केंद्र वर्ग करणेबाबत मार्गदर्शक सूचना बाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – घरबसल्या शॉप एक्ट लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस (Shop Act Licenses)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “शिवभोजन केंद्र वर्ग करणेबाबत मार्गदर्शक सूचना जारी !

  • शिवभोजन केंद्र कसे चालू करता येणार यावर माहिती किव्हा शासन gr सांगा

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.