जिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी योजनास्पर्धा परीक्षा

सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना

शासन मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कायम कार्यरत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळावा, सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न विद्यार्थी दशेतच त्यांच्यात निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, शौर्य, सांघिक वृत्ती, नेतृत्व, देशभक्ती इत्यादी गुणांची जोपासना होण्यासाठी सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता ही योजना शासनाने सुरु केली आहे. ही योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना:

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळावा, सैन्यदलात भरती होण्याचे आकर्षण विद्यार्थीदशेतच त्यांच्यात निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, शौर्य, सांघिक वृत्ती, नेतृत्व देशभक्ती इत्यादी गुणांची जोपासना होण्यासाठी योजना लागू करण्यात आली आहे.

अटी व शर्ती:

१) विद्यार्थी १ वी ते १० वी पर्यंतच्या वर्गात शिकत असलेला असावा.

२) विद्यार्थी मागासवर्गीय अथवा अनुसूचित जाती या प्रवर्गातील असावा.

३) पालकाचे वार्षिक उत्पन्न भारत सरकार शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्तीकरिता केंद्र शासनाने निर्धारित केल्यानुसार.

लाभाचे स्वरूप:

१) नाशिक, पुणे, सातारा येथील सैनिक शाळांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांची शिक्षण व परीक्षा शुल्क, भोजन, निवास, कपडे, घोडेस्वारी, पॉकेट मनी इत्यादीवर होणाऱ्या संपूर्ण खर्चाची प्रतिपुर्ती करण्यात येते.

२) इतर मान्यताप्राप्त सैनिक शाळांना प्रति विद्यार्थी प्रतिवर्षी १५ हजार रूपये शिष्यवृती देण्यात येते.

संपर्क: संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण किंवा संबंधित सैनिक शाळेचे प्राचार्य.

हेही वाचा – डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना – Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojana

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.