महसूल व वन विभागवृत्त विशेषसरकारी कामे

Stamp License : मृत पावलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना मिळणार मुद्रांक परवाना !

बनावट मुद्रांक विक्री (Stamp License) प्रकरण उघडकीस आल्यानंतर असे दिसून आले आहे की, सध्या राबविण्यात येत असलेली पारंपारिक विक्रेत्यांव्दारे मुद्रांक विक्री करण्याची पध्दत व उपाययोजना कालबाह्य झाली आहे. मुद्रांक विक्रीत सुटसुटीतपणा व विश्वासार्हता निर्माण व्हावी यासाठी राज्य शासनाने ज्या संस्थांवर शासन / रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे नियंत्रण आहे, अशा राष्ट्रीयकृत बँका, शेड्यूल बँका, पोस्ट ऑफिसेस व तत्सम वित्तीय संस्थांमार्फत मुद्रांक वितरण व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे.

राज्य शासनाने जनतेच्या सुविधेसाठी मुद्रांक विक्री व तत्सम कामांमध्ये सुटसुटीतपणा येण्याकरिता फ्रैंकिंग व ई-पेमेंट सुरु केलेले आहे. बनावट मुद्रांक प्रकरण उघडकीस आल्यापासून मुद्रांक विक्रीची खाजगी वितरण व्यवस्था कमी करुन पोस्ट खाते व बँकामार्फत मुद्रांक वितरण व्यवस्था राबविण्यात येत आहे. पारंपारिक खाजगी मुद्रांक विक्रीचे नवीन परवाने (Stamp License) देण्यास शासनाने स्थगिती दिली होती. तसेच राज्यात यापुढे खाजगी व्यक्तीना अधिकृत मुद्रांक विक्री परवाने देणे कायमस्वरुपी बंद करण्याबाबत शासनाने दि.२४.०९.२०१० रोजी निर्णय घेतला आहे.

मृत पावलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना मिळणार मुद्रांक परवाना ! – Stamp License:

कोव्हिड-१९ या भयंकर महामारीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांनी त्यांना उपजिविकेचे साधन मिळावे म्हणून तसेच अनेक मा. विधानसभा सदस्य व मा. संसद सदस्यांकडून कोरोना काळात मृत्यू पावलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना मुद्रांक विक्री परवाना (Stamp License) हस्तांतरण करण्याबाबत शासनास अनेक निवेदने प्राप्त झालेली आहेत.

सदर निवेदनातील विनंतीबाबत साधकबाधक विचार करून, कोरोना महामारीमध्ये कोरोना या रोगाने मृत्यू पावलेल्या परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना तसेच राज्यातील इतर मयत मुद्रांक विक्रेते ज्यांचे मृत्यू दिनांक २४.०९.२०१० रोजी व त्यानंतर नैसर्गिक किंवा अन्य कारणास्तव झालेले आहेत त्यांच्या वारसांना देखिल वारसा हक्काने त्यांचा मुद्रांक विक्री परवाना हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

अटी व शर्ती:

कोव्हीड-१९ या भयंकर महामारीमध्ये कोरोना या रोगाने तसेच दिनांक २४.९.२०१० रोजी व त्यानंतर नैसर्गिक किंवा अन्य कारणास्तव ज्या परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांचे मृत्यू झालेले आहेत त्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना उपजिविकेचे साधन मिळावे या दृष्टीने एक विशेष बाब म्हणून ज्या ठिकाणच्या परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याचा मृत्यू झालेला आहे, त्या ठिकाणच्या जनतेच्या सोईसाठी जनहितार्थ, मुद्रांक विक्री परवाना (Stamp License) हस्तांतरण करण्याबाबत खालील नमूद अटी व शर्तीनुसार पात्रता निश्चिती करुन मुद्रांक विक्री परवाना हस्तांतरीत करण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे.

१) मुद्रांक विक्रेत्याच्या वारसांनी शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील, ज्यामध्ये सदर परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याचा मृत्यूचे कारण स्पष्टपणे नमूद असणे आवश्यक राहील.

२) परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याचा अधिकृत वारसदार म्हणजे पती, पत्नी, मुलगा, मुलगी, मुलाची विधवा पत्नी, नातू व नात असावी व त्याबाबत त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील.

३) परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याचा वारस हा सज्ञान असावा.

४) ज्या वारसास परवाना हस्तांतरण करावयाचा आहे तो सुशिक्षित असावा. त्याने किमान १० वी पास शैक्षणिक अर्हता धारण केलेली असावी.

५) ज्या वारसास परवाना (Stamp License) हस्तांतरण करणार आहेत त्याचे पोलीसांकडील चारित्र्य पडताळणी (Good moral character) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

६) मुद्रांक विक्रेत्याच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त वारस असतील, अशा परिस्थितीमध्ये ज्या वारसास मुद्रांक विक्री परवाना हस्तांतरीत करावयाचा आहे, त्यासाठी इतर वारसांचे कार्यकारी दंडाधिकारी यांचेसमोर केलेले संमतीपत्र / नाहरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

७) वारसाने सादर केलेली माहिती खोटी आढळून आल्यास, भारतीय दंड संहितेमधील कलमांन्वये व अन्य संबंधित कायद्यानुसार त्या वारसावर खटला भरला जाईल व त्यानुसार तो शिक्षेस पात्र राहील.

८) मुद्रांक विक्री परवाना वारसांना हस्तांतरित करण्याबाबतची कार्यवाही मुंबई मुद्रांक पुरवठा व विक्री नियम, १९३४ मधील नियम ७(१) नुसार संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी करतील.

९) सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधीत मुद्रांक परवाना (Stamp License) धारकाच्या वारसांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक राहील.

१०) सदर शासन निर्णयास नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे व सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी व्यापक प्रसिद्धी देतील.

नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रचलित पध्दतीनुसार मुद्रांक विक्री परवाना (Stamp License) हस्तांतरीत करण्याची कार्यपध्दती निश्चित करून उचित कार्यवाही करतील.

महसूल व वन विभाग शासन निर्णय :

कोरोना या आजाराने तसेच नैसर्गिक वा अन्य कारणांमुळे मृत्यू पावलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना मुद्रांक परवाना (Stamp License) हस्तांतरीत करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर असलेले मुद्रांक शुल्क माफ करणेबाबत शासन नियम !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.