वृत्त विशेष

आता WhatsApp द्वारे बुक करता येईल घरगुती गॅस सिलेंडर जाणून घ्या सविस्तर माहिती

घरून गॅस बुक करण्यासाठीच्या विविध पद्धती उपलब्ध आहेत त्यामध्ये आता वापरामध्ये असलेल्या पद्धती म्हणजे ऑनलाईन वेबसाईटद्वारे, कॉल द्वारे, अमेझॉन, आणि पेटीएम सारख्या ऍप्सद्वारे हि आपण गॅस बकिंग करू शकतो, पण आता आपण WhatsApp द्वारे सुद्धा गॅस बुक करता येऊ शकतो ते कसे ते आपण पाहू.

भारत गॅसच्या बुकिंग बद्दल(Bharat Gas):

भारत गॅसधारक [1800224344] या नंबर च्या व्हॉट्सएपवर सुरवातीला हॅलो (Hello) नंतर, Book लिहून पाठवा. असे करताच आपल्याला ऑर्डर तपशील प्राप्त होईल, त्यानंतर आपण गॅस बुक करू शकता, यामध्ये सिलेंडर वितरित केव्हा होईल, ते देखील आपण व्हॉट्सएपवर पाहू शकता.

एचपी गॅसच्या बुकिंग बद्दल(HP Gas):

HP च्या ग्राहकांनी [9222201122] हा नंबर सेव्ह करून व्हाट्सएप वर Book लिहून पाठवा,असे पाठविताच व्हाट्सएपवर ऑर्डर तपशील पाठविला जाईल. त्यात सिलेंडरच्या वितरण तारखेसह संपूर्ण तपशील लिहिलेला असेल ,दरम्यान याठिकाणी आपण एजन्सीमध्ये नोंदणीकृत केलेल्या नंबरवरुनच गॅस बुक करू शकता.

इंडेन गॅसच्या बुकिंग बद्दल(Indane Gas):

इंडेन गॅस चे ग्राहक [7588888824] हा नंबर सेव्ह करून आपण या व्हाट्सएपवर नोंदणीकृत क्रमांकावरून Book लिहून किंवा REFILL असे लिहून पाठवा नंतर, नंतर बुकिंगचा तपशील येईल, तसेच याच नंबर वर आपण बुकिंग स्टेटस देखील पाहू शकता.

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.