वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनउद्योगनीती

घरबसल्या शॉप एक्ट लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस (Shop Act Licenses)

उद्योग, व्यवसाय, हॉटेल इ. सर्वांसाठी अत्यावश्यक असलेले शॉप ऍक्ट ऑनलाईन कसे काढायचे हे आपण येथे पाहणार आहोत. जर शॉप ऍक्ट नसेल तर तुम्हाला तुमचा व्यवसाय बंद करावा लागू शकतो.

शॉप ॲक्ट लायसन्स ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया:(Shop Act License)

शॉप ॲक्ट लायसन्स ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी “आपले सरकारची” https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हि वेबसाईट ओपन करायची आहे.

त्यानंतर नवीन यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी (युजर प्रोफाईल) कशी करायची? हे आपण मागील लेखामध्ये पाहिले आहे.

रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.

लॉगिन
लॉगिन

लॉगिन केल्यानंतर तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषेचा पर्याय निवडा.

आता तुम्हाला सर्च मध्ये तुम्हाला “Shop and Establishment Registration” असे सर्च करून तो पर्याय निवडायचा आहे.

त्यानंतर एक पेज ओपन होईल त्याच्या डाव्या बाजूला दिलेल्या पर्यायांपैकी Shop and Establishment Application या पर्यायावर क्लिक करायचे आहे. Application Form या पर्यायावरती क्लिक केल्यावर तुमच्यापुढे दोन फॉर्म चे पर्याय दिसतील एक म्हणजे शून्य ते नऊ कामगार असेल तर आणि दुसरा म्हणजे दहापेक्षा जास्त कामगार असतील तर जर समजा मी शून्य ते नऊ वर्ग असा पर्याय निवडला त्यानंतर खाली Confirm या बटणावर क्लिक करायचे आहे.

Shop and Establishment Registration
Shop and Establishment Registration

“FORM F”:

त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल. या फॉर्म चे नाव असेल “FORM F”. “FORM F” ओपन झाल्यावर तुम्हाला विभाग निवडायचं आहे,त्यानंतर तुमचा जिल्हा आणि त्यासाठी उपलब्ध असलेले जवळील ऑफिस त्याचे नाव निवडायचे आहे.

FORM F
FORM F

Name of the Establishment ( आस्थापनेचे नाव ):

खाली दिलेल्या आस्थापनेचे नाव या पर्यायांमध्ये तुम्हाला तुमच्या दुकानाचे नाव टाकायचे आहे.

Previous details of establishment( आस्थापनेची पूर्वीची सविस्तर माहिती ):

खाली आस्थापनेची पूर्वीची सविस्तर माहिती या ठिकाणी New Registration हा पर्याय निवडायचा आहे.

Address and situation of the Establishment (आस्थापनेचा पत्ता व ठिकाण):

खाली आस्थापनेचे पत्ता व विभाग या खाली तुम्हाला तुमच्या दुकानाचा पत्ता टाकायचा आहे. पत्ता टाकल्यानंतर खाली व्यवसाय सुरू करण्याचा दिनांक हा पर्याय दिसेल तिथे तुम्हाला व्यवसाय सुरू करण्याचा दिनांक टाकायचा आहे.

Date of Commencement of Business ( व्यवसाय सुरु केल्याचा दिनांक ):

हिथे तुम्हाला व्यवसाय सुरू करण्याचा दिनांक टाकायचा आहे.

Nature of Business ( व्यवसायाचे स्वरुप ):

Whether establishment falls under public sector or private Sector (आस्थापना सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रात मोडते किंवा कसे,):

व्यवसायाचे स्वरूप यामध्ये तुमचा व्यवसाय प्रायव्हेट आहे कि पब्लिक सेक्टरमध्ये आहे यापैकी एक पर्याय निवडायचा आहे.

Manpower/ Workers Details ( मनुष्यबळ / कामगार तपशील ):

खाली दिलेल्या मनुष्यबळ/ कामगार तपशील या ठिकाणी तुम्हाला तुमच्याकडे किती कामगार आहेत त्यापैकी स्त्रिया किती व पुरुष किती आहेत आणि इतर किती यांची संख्या टाकायची आहे.

Name of the employer ( मालकाचे संपूर्ण नाव ):

हिथे मालकाचे पूर्ण नाव जे आधारकार्ड वर दिलेले असेल त्याप्रमाणे टाकायचे आहे

Residential Address of the Employer ( मालकाचा निवासी पत्ता ):

हिथे मालकाचा रहिवासी पत्ता टाकायचा आहे.

Name and Residential Address of Manager (व्यवस्थापकांचे नाव आणि निवासी पत्ता):

हिथे व्यवस्थापकांचे नाव आणि निवासी पत्ता टाकायचा आहे.

(a) Category of Establishment i.e. Shop/ Establishment/ Residential Hotel/ Restaurant / Theatre / Other places of public amusement or entertainment and other establishment

((क) आस्थापनेचे वर्गवारी उदा. दुकाने / आस्थापना / निवासी हॉटेल/ उपाहारगृहे / थिएटर / सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा व इतर आस्थापना)

खाली व्यवसायाचे वर्ग कोणता आहे जसे की दुकाने/सायबर कॅफे/थेटर यापैकी जे असेल ते निवडायचे आहे.

(b) Type of organisation i.e. Proprietor, Partnership, LLP, Company/ Trust/ Co-operative Society/ Board

(ख) आस्थापनेचा प्रकार (मालक, भागीदारी, एलएलपी, कंपनी, विश्वस्त, सहकारी संस्था, मंडळ)

हिथे आस्थापनेचा प्रकार टाकायचा आहे जसे की मालक/भागीदारी/कंपनी इत्यादी.

Name of the members of the employer’s family employed in the establishment ( आस्थापना मालकाच्या कुटुंबातील काम करीत असलेल्या व्यक्तींची नावे )

e.g. : Harry – Brother, Jack – Son, Michael – Husband, Mary – Wife, Laraine – sister, Angela – daughter

हिथे खाली दिलेल्या रकान्यात तुम्हाला तुमच्या कामगारांची नावे, पुरुष किती ,स्त्रिया किती आणि इतर किती यांची संख्या टाकायची आहे.

Self Declaration / स्वघोषणापत्र:

अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरून झाल्यावर खाली दिलेल्या Self Decleration वाचून घ्यायचं आहे.आणि I Agree या बॉक्स वर क्लिक करायचे आहे. व सेव्ह या बटन वर क्लिक करायचे आहे. submit केल्यावर स्क्रीन वर एक मेसेज येईल.ज्यावर एक Application ID दिलेला असेल त्यावर OK या बटन वर क्लिक करायचं आहे.

Upload Documents:

पुढे आपल्याला Upload Documents हा पर्याय दिसेल तिथे क्लिक केल्यावर कोणते कागदपत्रे लागणार आहेत आणि त्याची साईज काय असावी हे दिले आहे.त्याचप्रमाणे तुम्हाला तुमची कागदपत्रे तिथे अपलोड करायची आहेत. त्यानंतर डाव्या बाजूला Self Decleration या पर्यायावर क्लिक करून जो फॉर्म येईल तो प्रिंट करून घ्यायचा आहे आणि त्यावर खाली मालकाचे नाव आणि सही करून पुन्हा तो फॉर्म PDF मध्ये बनवून अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड, दुकानाचा मराठी पाटी असलेला फोटो, तुमचा पासपोर्ट साईझ फोटो व सही हे सगळे अपलोड करायचे आहे. हे केल्यावर जर तुमचा सायबर कॅफे असेल तर NOC द्यावी लागेल आणि Other या पर्यायाला टिक करून पॅनकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स हे देखील अपलोड करायचे आहे. हे सर्व केल्यावर Upload या बटन वर क्लिक करायचे आहे.

पेमेंट करण्याची पद्धत:

यानंतर पेमेंट भरण्यासाठी पेज येईल.यामध्ये ऑनलाइन आणि चलन असे दोन पर्याय येतील. त्यापैकी तुम्हाला हवा तो पर्याय तुम्ही निवडू शकता.समजा आपण Online पर्याय निवडला ,यानंतर खाली Confirm या बटन वर क्लिक करायचे आहे.असे केल्यावर Maha Online चा पेमेंट गेटवे ओपन होईल.जिथे तुम्ही वॉलेट /डेबिट कार्ड /क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग या पैकी काहीही वापरून पैसे भरू शकता.जिथे तुम्ही वॉलेट /डेबिट कार्ड /क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग या पैकी काहीही वापरून पैसे भरू शकता.पैसे भरल्यावर यशस्वी रित्या पेमेंट भरल्याचा मेसेज येईल.

Download Form:

त्यानंतर फॉर्म डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या Back या बटन वर क्लिक करायचे आहे.यानंतर तिथे उजव्या बाजूला Download Form असा ऑपशन येईल. यामध्ये तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो प्रिंट करू शकता. त्यानंतर खाली Download Intimation Receipt वर क्लिक करून तो आपल्याला पाहता येईल. जे की तुमचे शॉप ऍक्ट लायसन्स आहे.

हेही वाचा – नवीन उद्योजकांसाठी मोफत एमएसएमईच्या उद्यम नोंदणी ऑनलाईन कशी करायची? जाणून घ्या सविस्तर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

2 thoughts on “घरबसल्या शॉप एक्ट लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस (Shop Act Licenses)

  • Sharad Sadashiv Pawaskar

    Very good information sir

    Reply
  • Suresh Sawarkar

    Best guidance for New shop act licence.thanks.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.