जिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी कामे

कामं अडली, गरज पडली तर फक्त एक फोन करा, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र घडवूया !

भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र घडवूया. लाच देणे आणि लाच घेणे हे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे. कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी शासकीय कामासाठी लागणाऱ्या शुल्काव्यतिरिक्त पैशाची, वस्तूची मागणी करत असेल तर ती लाच आहे असे समजावे. जर आपल्याकडे कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी अशा प्रकारे लाचेची मागणी करीत असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग 1064 या टोल फ्री क्रमांकावर किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संकेतस्थळावर लेखी तक्रार करा.

शासकीय नोकरांनी लाचेची मागणी, लाच स्वीकारणे, शासकीय नोकरास लाच देणे, अपसंपदा प्राप्त करणे व पदाचा दुरूपयोग करून भ्रष्टाचार करणे, शासकीय नोकराने भ्रष्टाचारामार्फत मोठ्या प्रमाणात स्वत:च्या नावे किंवा त्याच्यावतीने कोणत्याही व्यक्तीकडे, पद धारण करण्याच्या कालावधीत कोणत्याही वेळी तो समाधानकारक हिशोब देवू शकणार नाही अशा आर्थिक साधन-संपत्तीचा किंवा त्याच्या प्राप्तीच्या ज्ञात साधनांचा विसंगत प्रमाणात मालमत्ता जमवणे. अशा गुन्ह्याचा तपास एसीबीमार्फत होतो. लोकसेवक किंवा खासगी इसम. जो लोकसेवकाच्यावतीने लाचेची मागणी करेल व स्वीकारेल. ज्या लोकसेवकाकडे तक्रारदाराचे कायदेशीर काम प्रलंबित आहे अशा लोकसेवकाविरुध्द तसेच त्याच्याकडे काम प्रलंबित नसतानाही स्वत:च्या फायद्यासाठी पदाचा दुरूपयोग करणाऱ्या लोकसेवकाविरूध्द तक्रार देता येते.

सापळा कारवाई म्हणजे, लाचेची मागणी लाच स्वीकारताना व लाच देताना एसीबीमार्फत सरकारी नोकरास रंगेहात पकडणे. सापळा रक्कम तक्रारदाराकडून पुरवली जाते. ही रक्कम त्याला परत मिळते. सरकारी नोकराकडून कायदेशीर काम करण्याकरिता शासकीय फी व्यतिरिक्त इतर तसेच कायदेशीर काम न करण्याकरिता पैशाची अथवा इतर गोष्टींची मागणी होत असेल अशावेळी लाचेची तक्रार देता येते. सापळा कारवाईत तक्रारदाराचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने त्याला एसीबी कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे. तक्रारदाराची ओळख तसेच लाचेचा सापळा ही गुप्त ठेवली जाते.

सापळा कारवाईनंतर आरोपी लोकसेकवकाकडून तक्रारदारास धमकी प्राप्त झाल्यास एसीबीमार्फत आरोपीविरूध्द पुरावे जमा करून त्याचा जामिन रद्द होण्याकरिता न्यायालयास विनंती केली जाते. तक्रार 1064 या टोल फ्री क्रमांकाव्दारे Anti-Corruption Bureau Maharashtra या फेसबुक पेजवरील lodge व कंप्लेंट सदराखाली करता येते. लेखी अर्ज तसेच लाचेची तक्रार देण्याकरिता तक्रारदाराने स्वत: एसीबी कार्यालयात हजर राहणे गरजेचे आहे. सापळा कारवाईनंतर तक्रारदाराचे प्रलंबित काम एसीबीमार्फत पूर्ण होण्याकरिता पाठपुरावा केला जातो. न्यायालयीन प्रकियेदरम्यान साक्षीकामी हजर राहणे तक्रारदाराला आवश्यक असते.

लोकसेवकाने घटनास्थळीच लाचेची मागणी केली किंवा लाच स्वीकारली अशा वेळी अशा लाचेच्या घटनांच्या माहितीबाबत मोबाईल, कॅमेरामध्ये, ऑडीओ-व्हिडीओ टिपून तो एसीबीच्या www.acbmaharashtra.net या मोबाईल ॲपवरील कंप्लेंट पॅनलमधून पोस्ट करावी.

चला तर मग करूया लाच घेणाऱ्या लोकसेवकांची तक्रार आणि संपवूया भ्रष्टाचार. त्यासाठी लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या क्रमांकावर संपर्क साधावा.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य संपर्क:

भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागास संपर्क साधा. सुजाण नागरिकांनी खालील टोल फ्री क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, वेबसाईट, ईमेल, आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्क साधून तक्रार नोंदवावी.

हेही वाचा – शासकीय कामे होत नसतील तर ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची जाणून घ्या सविस्तर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.