वृत्त विशेष

मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार !

मराठी पाटी नसलेल्या व्यावसायिकांना आता दुप्पट मालमत्ता कर भरावा लागेल. दुकाने व आस्थापनांवर मराठी भाषेत, देवनागरी लिपीत ठळक अक्षरात नामफलक लावण्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

काही व्यावसायिक मराठी नामफलक लावण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत त्या व्यावसायिकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सोमवारी आढावा बैठकीनंतर दिले. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेनुसार, दुकाने व आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपीत ठळक अक्षरात लावण्यासाठी दिलेली दोन महिन्यांची मुदत २५ नोव्हेंबर २०२३ रोजी संपुष्टात आली. त्यानंतर, २८ नोव्हेंबर २०२३ पासून महापालिकेने तपासणी सुरु केली.

३१ मार्चपर्यंत ८७,०४७ पैकी ८४,००७ दुकाने व आस्थापनांनी (९६.५० टक्के) मराठीत नामफलक लावल्याचे आढळून आले. उर्वरित ३,०४० आस्थापनांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. मराठी पाट्यांसंदर्भात न्यायालयात एकूण १,९२८ प्रकरणे दाखल झाली असून १७७ व्यावसायिकांना १३ लाख ९४ हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला. १,७५१ प्रकरणांची सुनावणी प्रलंबित आहे. पालिका प्रशासनाकडे सुनावणीसाठी आलली ३४३ प्रकरणे निकाली निघाली. त्यातून ३१ लाख ८६ हजारांचा दंडवसूल केला. उर्वरित प्रकरणांच्या सुनावणीची प्रशासकीय कार्यवाही सुरू असल्याचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा-शर्तींचे विनियमन) नियम, २०१८ व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, २०२२ च्या अनुक्रमे नियम ३५ व कलम ३६ क च्या तरतुदींनुसार आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत, देवनागरी लिपित, ठळक अक्षरात असणे बंधनकारक आहे, असे उपायुक्त (विशेष) (अतिरिक्त कार्यभार) किरण दिघावकर यांनी सांगितले.

>

प्रकाशित फलकांचा परवाना रद्द होणार

मराठीत नामफलक नसेल, तर प्रकाशित फलकासाठी (ग्लो साईन बोर्ड) दिलेला परवानाही तात्काळ रद्द करण्यात येणार आहे. हा परवाना रद्द झाल्यास नव्याने परवाना मिळविणे, फलक तयार करणे यासाठी संबंधित आस्थापनाधारकांना २५ हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत भुर्दंड सहन करावा लागू शकतो.

हेही वाचा – नगरपरिषद किंवा नगरपंचायतचा मालमत्ता कर ऑनलाईन कसा भरायचा? जाणून घ्या सविस्तर ! Municipal Council or Nagar Panchayat property tax online

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.