नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा निकाल 2022 – (IFS) Indian forest service Result 2022

5 जून, 2022 रोजी नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा, 2022 च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्क्रीनिंग चाचणीच्या आधारावर, पुढील अनुक्रमांक असलेले उमेदवार भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा, 2022 मध्ये प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

या उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती आहे. परीक्षेच्या नियमांनुसार, या सर्व उमेदवारांना भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा 2022 साठी विस्तृत आवेदन प्रपत्र-I (डीएएफ-I)  मध्ये पुन्हा अर्ज करावा लागेल. डीएएफ भरण्याच्या तारखा आणि महत्त्वाच्या सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर योग्य वेळी जाहीर केल्या जातील.

भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा निकाल 2022 – (IFS) Indian forest service Result 2022:

उमेदवारांना असेही सूचित केले जाते की नागरी सेवा परीक्षा, 2022 द्वारे भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षेसाठी घेण्यात आलेल्या स्क्रिनिंग चाचणीचे गुण, कट ऑफ मार्क्स आणि उत्तरांचा संच भारतीय वन सेवा परीक्षा, 2022 ची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर आयोगाच्या संकेतस्थळावर https://upsconline.nic.in अपलोड केले जातील.

केंद्रीय  लोकसेवा आयोगाच्या संकुलात परीक्षा हॉल इमारतीजवळ एक सुविधा केंद्र आहे. उमेदवार वर नमूद केलेल्या परीक्षेच्या निकालाबाबत कोणतीही माहिती/स्पष्टीकरण सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 दरम्यान वैयक्तिकरित्या किंवा 011-23385271, 011-23098543 or 011-23381125  या दूरध्वनी क्रमांकावरून  मिळवू शकतात.  लोकसेवा आयोगाच्या https://upsconline.nic.in , http://www.upsc.gov.in” या संकेतस्थळावर  जाऊन उमेदवार त्यांच्या निकालाबाबत माहिती मिळवू शकतात.

निकालांसाठी येथे क्लिक करा:

हेही वाचा – पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर – India Post GDS Result 2022 Maharashtra Circle

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.