महाराष्ट्र जमीन महसूल कायदासरकारी कामे

भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान जमिनी भोगवटादार वर्ग १ करणे नियम – शासन निर्णय २०२१

आपण या लेखामध्ये भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान जमिनी भोगवटादार वर्ग १ करणे नियम काय आहे याची सविस्तर माहिती घेणार आहोत. महसूल कायद्याअंतर्गत प्रतिबंधीत सत्ताप्रकाराने आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्‍या जमिनी मालकी हक्‍काने देणे यामध्ये समाविष्ट आहे.

भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान जमिनी भोगवटादार वर्ग १ करणे नियम:

दिनांक ०८ मार्च २०१९ रोजी महाराष्‍ट्र शासनाने, महाराष्‍ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्‍या जमिनी भोगवटादार वर्ग १ मध्‍ये रूपांतरीत करणे) नियम, २०१९ हा सुधारीत नियम राजपत्रात प्रसिध्‍द केला आहे. या सुधारीत नियमामुळे आता कृषीक, निवासी, वाणिज्‍यिक किंवा औदयोगिक प्रयोजनासाठी प्रतिबंधीत सत्ताप्रकाराने अथवा भाडेपट्टयाने प्रदान केलेल्‍या जमिनी मालकी हक्‍काच्‍या होणार आहेत.

जर शासनाने प्रदान केलेल्‍या उपरोक्‍त जमिनींबाबत लादलेले नियम ,अटी व शर्तींचा भंग झाला तर अशा जमिनी मालकी हक्‍काच्‍या होणार नाहीत. तथापि, अटी व शर्तींचा असा झालेला भंग सक्षम प्राधिकार्‍याने नियामानुकूल केला असल्‍यास त्‍या मालकी हक्‍कामध्‍ये रूपांतरीत करता येतील. परंतु हा नियम कुळवहीवाट, वतन व इनाम कायदा, कमाल जमीन धारणा कायदा या कायद्‍याखाली प्रदान केलेल्‍या जमिनींना लागू होणार नाही.

वरील प्रमाणे भोगवटादार वर्ग २ धारणाधिकारावर किंवा भाडेपट्टयाने प्रदान केलेल्‍या जमिनीचे भोगवटादार वर्ग १ मध्‍ये रूपांतर करण्‍यासाठी खालील प्रमाणे रूपांतर अधिमूल्‍य शासनाला अदा करावे लागेल.

हे उपरोक्त रूपांतरणाचे अधिकार मा. जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेले असल्यामुळे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय (महसुल शाखा) किंवा तहसिलदार कार्यालय येथे अर्ज करता येईल. अर्जासोबत संबंधीत जमिनीच्या हक्काबाबत असणारी साक्षांकीत दस्ताऐवज, वार्षिक दर विवरणपत्र आणि नियमात नमूद रक्कम भरण्यास तयार असल्या बाबत स्वयंघोषणापत्र सादर करावे.तसेच जर शासनाच्या त्यावेळी प्रचलित असलेल्या धोरणाप्रमाणे भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनीचा धारणाधिकार, भोगवटादार वर्ग दोनमध्ये रुपांतरीत करतांना अशा धारकाने शासनास प्रदान केलेल्या अधिमुल्याची रक्कम, वसूल करावयाच्या आधिमूल्याच्या रकमेत समायोजित करण्यात यावी.

1)जमीन ज्‍या क्षेत्रात समाविष्‍ट आहे ते क्षेत्र आणि जमिनी चा वापर:

नगर पंचायत/ नगर परिषद/ म.न.पा./ विशेष नियेाजन प्राधिकरणाच्‍या हद्दी बाहेरील कृषी प्रयोजनासाठी प्रदान केलेल्‍या जमिनी ज्‍या प्रादेशिक विकास आराखडयात शेती/ नाविकास वापर विभागात स्थित आहेत

दिनांक ०८.०३.२०१९ या दिनांका पासून दिनांक ०८.०३.२०२२ या कालावधीसाठी आकारावयाची अधिमूल्‍य रक्‍कम: – प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) शेतीच्‍या दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या ५०%

दिनांक ०८.०३.२०२२ नंतर आकारावयाची अधिमूल्‍य रक्‍कम: – प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) शेतीच्‍या दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या ७५%

2)जमीन ज्‍या क्षेत्रात समाविष्‍ट आहे ते क्षेत्र आणि जमिनी चा वापर:

नगर पंचायत / नगर परिषद/ म.न.पा. / विशेष नियोजन प्राधिकरणाच्‍या हद्दी बाहेरील कृषी प्रयोजनासाठी प्रदान केलेल्‍या जमिनी ज्‍या प्रादेशिक विकास आराखडयात अकृषिक (बिनशेती) विभागात स्थित आहेत

दिनांक ०८.०३.२०१९ या दिनांका पासून दिनांक ०८.०३.२०२२ या कालावधीसाठी आकारावयाची अधिमूल्‍य रक्‍कम: – प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) बिनशेतीच्‍या दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या ५०%

दिनांक ०८.०३.२०२२ नंतर आकारावयाची अधिमूल्‍य रक्‍कम: – प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) बिनशेतीच्‍या दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या ७५%

3)जमीन ज्‍या क्षेत्रात समाविष्‍ट आहे ते क्षेत्र आणि जमिनी चा वापर:

कृषी प्रयोजनासाठी प्रदान केलेल्‍या व सदयःस्थितीमध्‍ये नगर पंचायत / नगर परिषद/ म.न.पा. / विशेष नियेाजन प्राधिकरणाच्‍या हद्दीमध्‍ये स्थित असलेल्‍या जमिनी – ज्‍यांचा विकास आराखडयाप्रमाणे बिनशेती वापर अनुज्ञेय आहे किंवा बिनशेती वापर अनुज्ञेय नाही अशा जमिनी

दिनांक ०८.०३.२०१९ या दिनांका पासून दिनांक ०८.०३.२०२२ या कालावधीसाठी आकारावयाची अधिमूल्‍य रक्‍कम: – प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या ५०%

दिनांक ०८.०३.२०२२ नंतर आकारावयाची अधिमूल्‍य रक्‍कम: – प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या ७५ %

4)जमीन ज्‍या क्षेत्रात समाविष्‍ट आहे ते क्षेत्र आणि जमिनी चा वापर:

वाणिज्‍यीक अथवा औदयोगिक प्रयोजनासाठी कब्‍जेहक्‍काने किंवा भाडेपट्टयाने धारण केलेल्‍या जमिनी

दिनांक ०८.०३.२०१९ या दिनांका पासून दिनांक ०८.०३.२०२२ या कालावधीसाठी आकारावयाची अधिमूल्‍य रक्‍कम: – प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या ५०%

दिनांक ०८.०३.२०२२ नंतर आकारावयाची अधिमूल्‍य रक्‍कम: – प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या ६० %

5)जमीन ज्‍या क्षेत्रात समाविष्‍ट आहे ते क्षेत्र आणि जमिनी चा वापर:

रहिवास प्रयोजनासाठी कब्‍जेहक्‍काने धारण केलेल्‍या जमिनी

दिनांक ०८.०३.२०१९ या दिनांका पासून दिनांक ०८.०३.२०२२ या कालावधीसाठी आकारावयाची अधिमूल्‍य रक्‍कम: – प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या १५%

दिनांक ०८.०३.२०२२ नंतर आकारावयाची अधिमूल्‍य रक्‍कम: – प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या ६०%

6)जमीन ज्‍या क्षेत्रात समाविष्‍ट आहे ते क्षेत्र आणि जमिनी चा वापर:

रहिवास प्रयोजनासाठी भाडेपट्टयाने धारण केलेल्‍या जमिनी

दिनांक ०८.०३.२०१९ या दिनांका पासून दिनांक ०८.०३.२०२२ या कालावधीसाठी आकारावयाची अधिमूल्‍य रक्‍कम: – प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या २५%

दिनांक ०८.०३.२०२२ नंतर आकारावयाची अधिमूल्‍य रक्‍कम: – प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या ७५%

7)जमीन ज्‍या क्षेत्रात समाविष्‍ट आहे ते क्षेत्र आणि जमिनी चा वापर:

सहकारी गृहनिर्माण संस्‍थांना भाडेपट्टयाने प्रदान केलेल्‍या आणि आजही सहकारी गृहनिर्माण संस्‍थेच्‍या भेागवटयात असलेल्‍या जमिनी

दिनांक ०८.०३.२०१९ या दिनांका पासून दिनांक ०८.०३.२०२२ या कालावधीसाठी आकारावयाची अधिमूल्‍य रक्‍कम: – प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या १५%

दिनांक ०८.०३.२०२२ नंतर आकारावयाची अधिमूल्‍य रक्‍कम: – प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या ७५%

8)जमीन ज्‍या क्षेत्रात समाविष्‍ट आहे ते क्षेत्र आणि जमिनी चा वापर:

सहकारी गृहनिर्माण संस्‍थांना कब्‍जेहक्‍काने प्रदान केलेल्‍या आणि आजही सहकारी गृहनिर्माण संस्‍थेच्‍या भोगवटयात असलेल्‍या जमिनी.

दिनांक ०८.०३.२०१९ या दिनांका पासून दिनांक ०८.०३.२०२२ या कालावधीसाठी आकारावयाची अधिमूल्‍य रक्‍कम: – प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या १५%

दिनांक ०८.०३.२०२२ नंतर आकारावयाची अधिमूल्‍य रक्‍कम: – प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या ६०%

अर्ज-नमूना :- 

प्रती,
तहसीलदार,
तालुका
जिल्‍हा

विषय: महाराष्‍ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्‍या जमिनी भोगवटादार वर्ग – १ मध्‍ये रूपांतरीत करणे) नियम, २०१९ अन्‍वये अर्ज

मा. महोदय,

मी, अर्जदार नामे ……………………………………………………………………………..
राहणार ………………………………………………………………………………………
महाराष्‍ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्‍या जमिनी भोगवटादार वर्ग – १ मध्‍ये रूपांतरीत करणे) नियम, २०१९ अन्‍वये खालीलप्रमाणे अर्ज सादर करीत आहे.

१. जमीन धारकाचे नाव:

२. जमीन धारकाचा संपूर्ण पत्ता:

३. जमीन धारकाचा संपर्क क्रमांक:

४. जमीन धारकाला जमीन प्रदान करण्‍यात आलेल्‍या
आदेशाचा क्रमांक व दिनांक:

५. जमीन धारकाला प्रदान करण्‍यात आलेली जमीन
कब्‍जेहक्‍काने प्रदान करण्‍यात आली आहे की भाडेपट्टयाने?

६. जमिनीचा तपशील

भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान जमिनी भोगवटादार वर्ग १ करणे नियम

उपरोक्‍त जमीन, महाराष्‍ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्‍या जमिनी भोगवटादार वर्ग – १ मध्‍ये रूपांतरीत करणे) नियम, २०१९ अन्‍वये भोगवटादार वर्ग – १ मध्‍ये रूपांतरीत करणेकामी सर्व आवश्‍यक कागदपत्रांसह अर्ज सादर करीत आहे.
सदर जमिनीचे नियमानुसार होणारे अधिमूल्‍य शासनास अदा करण्‍यास मी तयार आहे. कृपया माझी उपरोक्‍त जमीन वर्ग – १ मध्‍ये रूपांतरीत करून मिळावी.

वरील माहिती माझ्‍या माहितीप्रमाणे खरी व बरोबर आहे.

अर्जदाराची सही
ठिकाण:
दिनांक:

· सूचना: अर्जासोबत (१) संबंधित जमिनीचे चालू सात-बारा, (२) संबंधित फेरफार,
(३) संबंधित जमीन प्रदानाची सनद किंवा प्रदान आदेश यांच्‍या स्‍वसांक्षांकीत प्रती सादर कराव्‍या.

छाननी तक्‍ता-नमूना

विषय: महाराष्‍ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्‍या जमिनी भोगवटादार वर्ग – १ मध्‍ये रूपांतरीत करणे) नियम, २०१९

१. अर्जदाराचे नाव:

२. जमीन धारकाचे नाव:

३. जमीन धारकाला जमीन प्रदान करण्‍यात आलेल्‍या
आदेशाचा क्रमांक व दिनांक:

४. जमीन धारकाला प्रदान करण्‍यात आलेली जमीन
कब्‍जेहक्‍काने प्रदान करण्‍यात आली आहे की भाडेपट्टयाने?

४-अ. जमीन धारकाला सदर जमीन कोणत्‍या
प्रयोजनासाठी प्रदान करण्‍यात आली होती?

५. जमिनीचा तपशील-

भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान जमिनी भोगवटादार वर्ग १ करणे नियम

६. संबंधित जमिनीचे चालू सात-बारा अर्जासोबत जोडले आहेत काय?

७. संबंधित जमीन प्रदान केल्‍याचा फेरफार जोडला आहे काय?

७-अ. असल्‍यास फेरफार क्रमांक:

८. ज्‍या व्‍यक्‍तीला जमीन प्रदान करण्‍यात आली होती
ती व्‍यक्‍तीच अर्जदार आहे काय?

८-अ. नसल्‍यास, अर्जदार आणि जमीन धारकाचे नाते:
९. सदर प्रदान जमिनीवर वारस नोंद झाली आहे काय?

९-अ. असल्‍यास, फेरफार क्रमांक आणि वारसदारांची नावे:
(जरूर तर स्‍वतंत्र कागद जोडावा)

१०. सदर प्रदान जमिनीबाबत शर्तभंग झाला आहे/होता काय?
(स्‍थळ पाहणी अहवाल जोडावा)

१०-अ. असल्‍यास असा शर्तभंग सक्षम अधिकार्‍याकडून
नियमानुकुल करण्‍यात आला आहे काय?

१०-ब. शर्तभंग नियमानुकुल करण्‍यात आला असल्‍यास,
सक्षम अधिकार्‍याचे पदनाम:
आदेश क्रमांक:
दिनांक:

१०-क. जमीन ज्‍या प्रयोजनासाठी प्रदान केली आहे त्‍याच प्रयोजनासाठी तिचा वापर होत आहे काय?

११. सदर जमीन, नगर पंचायत/ नगर परिषद/ म.न.पा./ विशेष नियेाजन प्राधिकरणाच्‍या हद्दी बाहेरील शेतीच्‍या कारणासाठी प्रदान करण्‍यात आली आहे काय?

११-अ. असल्‍यास, ती जमीन प्रादेशिक विकास आराखडयात
शेती व नाविकास विभागात स्थित आहे काय?

१२. सदर जमीन, नगर पंचायत/ नगर परिषद/ म.न.पा./ विशेष नियेाजन प्राधिकरणाच्‍या हद्दी बाहेरील बिन-शेतीच्‍या कारणासाठी प्रदान करण्‍यात आली आहे काय?

१२-अ. असल्‍यास, ती जमीन प्रादेशिक विकास आराखडयात
बिन-शेती विभागात स्थित आहे काय?

१३. सदर जमीन शेतीसाठी प्रदान करण्‍यात आली आहे काय?

१३-अ. असल्‍यास, सदयःस्थितीमध्‍ये सदर जमीन नगर पंचायत / नगर परिषद/ म.न.पा. / विशेष नियोजन प्राधिकरणापैकी कोणत्‍या हद्दीमध्‍ये आहे?

१३-ब. विकास आराखडयाप्रमाणे सदर जमिनीचा बिनशेती वापर अनुज्ञेय आहे किंवा नाही?
१४. सदर जमीन वाणिज्‍यिक अथवा औदयोगिक
वापरासाठी प्रदान करण्‍यात आली होती काय?

१४-अ. असल्‍यास, कब्‍जेहक्‍काने की भाडेपट्टयाने?

१५. सदर जमीन रहिवास प्रयोजनासाठी प्रदान करण्‍यात आली होती काय?

१५-अ. असल्‍यास, कब्‍जेहक्‍काने प्रदान करण्‍यात आली होती की भाडेपट्टयाने?

१६. सदर जमीन सहकारी गृहनिर्माण संस्‍थेला
प्रदान करण्‍यात आली होती काय?

१६-अ. असल्‍यास, कब्‍जेहक्‍काने की भाडेपट्टयाने?

१६-ब. सदर जमीन आजही सहकारी गृहनिर्माण संस्‍थेच्‍या
भोगवटयात आहे काय?

१७. कब्‍जेहक्‍काच्‍या रक्‍कमेमध्‍ये, चालू रेडीरेकनरमधील दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या १०% इतकी रक्‍कम अधिमूल्‍य म्‍हणून अदा करण्‍यास अर्जदार तयार आहे काय?

१८. उपरोक्‍त जमिनीची चालू रेडीरेकनर अन्‍वये काय किंमत दर्शविली आहे?

१९. सुधारीत नियम, २०१९ अन्‍वये अर्जदाराने किती टक्‍के रूपांतरण अधिमूल्‍य अदा करणे अपेक्षीत आहे?

२०. उपरोक्‍त टक्‍केवारीप्रमाणे रूपांतरण अधिमूल्‍याची किती रक्‍कम अदा करणे आवश्‍यक आहे?

लिपिक

अव्‍वल कारकूनचा अभिप्राय आणि सही

नायब तहसीलदारचा अभिप्राय आणि सही

तहसीलदारचा अभिप्राय आणि सही

उपजिल्‍हाधिकारी यांचा अभिप्राय आणि सही

जिल्‍हाधिकारी

शासन निर्णय:

शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

2 thoughts on “भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान जमिनी भोगवटादार वर्ग १ करणे नियम – शासन निर्णय २०२१

 • Subhash shevkari

  सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील भुखंड वर्ग २ मधून वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी ची प्रकिया सांगावी. तसेच पूर्वी नजराणा रक्कम भरलेली असेल तर पुन्हा रक्कम भरावी लागते का? त्याबद्दलचे नियम सांगावेत.

  Reply
  • Vishnu Dnyandeo Talpade

   वर्ग 2 ची जमिन खरेदि करते वेळेस एकदा नजराना रक्कम
   भरलेली असुन जमिन एक वर्ग झाली नाही.तरी पुन्हा
   वर्ग १ करताना परत नजराना भरावा लागेल का? प्लिज
   माहिती द्यावी

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.