लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना
संदर्भाधीन दि. ०५ मार्च, २०२४ च्या पत्राव्दारे सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी आपल्या प्रशासकीय विभागाच्या व आपल्या अधिनस्त कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर (संकेतस्थळावर) कोणत्याही प्रकारच्या राजकीय नेत्यांची छायाचित्रे असल्यास, सदरची छायाचित्रे विनाविलंब काढून टाकण्याची तातडीने कार्यवाही करण्याबाबत देण्यात आलेल्या सूचनेचे पालन हे आगामी काळात होणारी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची आदर्श आचारसंहिता प्रत्यक्षात लागू झाल्याच्या दिवशी करावयाची आहे.
तसेच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या आचार संहितेच्या काळात व तद्नंतर निवडणूकीची प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत क्षेत्रियस्तरावर उपस्थित होणाऱ्या सर्वसाधारण तक्रारी व दाखल तक्रारीतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित निवडणूक अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी (म.रा.) यांच्याव्दारे वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या सूचनांनुसार प्रकरण तपासून आपल्यास्तरावर प्रकरणपरत्वे निर्णय घेणे अपेक्षित असल्याची बाब निदर्शनास आणण्यात येत आहे.
सामान्य प्रशासन विभाग:
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!