महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल ऑनलाईन पहा!
महाराष्ट्र राजयामध्ये मतमोजणीसह पुढील पाच वर्षांसाठी कोण सरकार स्थापन करणार आहे हे आपल्याला विधानसभा (Vidhansabha Nivadnuk Nikal) निवडणुकीचा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी शनिवारी 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. 288 जागांसाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या निकालाचे (Vidhansabha Nivadnuk Nikal) प्रत्येक अपडेट कुठे पाहाता येणार ते जाणून घेऊया. 4100 हून जास्त उमेदवार या निवडणुकीत नशीब आजमावत असून अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. राज्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होणार आहेत. महायुतीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना, तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस यांचा समावेश आहे.
मतमोजणीपूर्वी, भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) विस्तृत व्यवस्था केली आहे. मतदार आपापल्या मतदारसंघातील निकालाबाबत (Vidhansabha Nivadnuk Nikal) अपडेट राहण्याचे विविध मार्ग आहेत. शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरुवात होणार आहे. विविध टीव्ही चॅनेल, न्यूज वेबसाइट्स आणि त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह, तुम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Vidhansabha Nivadnuk Nikal) निकाल 2024 च्या लाइव्ह आणि रिअल-टाइम व अधिकृत अपडेट्ससाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल (Vidhansabha Nivadnuk Nikal) केंद्रीय निवडणूक आयोगाच्या खालील अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर महाराष्ट्र विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघाचे ताजे अपडेट्स आणि मतदारसंघनिहाय निकाल (Vidhansabha Nivadnuk Nikal) तुम्हाला पाहिला मिळतील.
महाराष्ट्र विधानसभेच्या सत्तास्थापनेत महायुती असो किंवा मविआ यांना सत्तास्थापनेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलच्या सव्हेनुसार व्यक्त करण्यात आलाय. बहुतांश एक्झिट पोलचा असाच अंदाज असल्यानं सत्तास्थापनेसाठी महायुती किंवा मविआ यांना अपक्षांसोबतच लहान पक्षांच्या आमदारांची मदत घ्यावी लागणार आहे.
मोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या साठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सध्या मतदान यंत्रे हे प्रत्येक मतदार संघात तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूममध्ये चोख बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता निकाल (Vidhansabha Nivadnuk Nikal) काय लागणार ? या कडे सर्वांचे लक्ष आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल ऑनलाईन पहा! Vidhansabha Nivadnuk Nikal:
रिअल टाइममध्ये रिटर्निंग ऑफिसर/सहायक रिटर्निंग ऑफिसरने प्रविष्ट केलेल्या डेटानुसार विधानसभा मतदारसंघ/संसदीय मतदारसंघाचे नवीनतम ट्रेंड आणि निकाल (Vidhansabha Nivadnuk Nikal) भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असतील.
मतमोजणीच्या दिवशी (Vidhansabha Nivadnuk Nikal) निकाल पाहण्यासाठी ECI वेबसाइट – https://results.eci.gov.in/ वर चेक करू शकता.
मतदारसंघनिहाय निकाल कसे तपासायचे?
ECI च्या अधिकृत वेबसाइटवर, निकालावर (Vidhansabha Nivadnuk Nikal) क्लिक केल्यनंतर तुमचे राज्य निवडा आणि तुमचा मतदारसंघ तपासा. कोणता उमेदवार आघाडीवर आहे आणि कोण पिछाडीवर आहे याची स्थिती स्क्रीनवर दिसून येईल. निकाल लागल्यानंतर मतदारसंघनिहाय विजेते देखील या पृष्ठावर प्रदर्शित केले जातील.
विधानसभा निवडणूक निकाल पहा Voter Helpline ॲपवर:
मतदार मोबाईल फोनवरील व्होटर हेल्पलाइन ॲपवर निवडणूक निकाल (Vidhansabha Nivadnuk Nikal) देखील पाहू शकतात, जे Android आणि iOS दोन्ही वापरकर्ते वापरू शकतात. व्होटर हेल्पलाइन ॲप गुगल प्ले किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते. ॲप डाउनलोड केल्यानंतर, वापरकर्ते विजयी, आघाडीवर किंवा पिछाडीवर असलेल्या उमेदवारांचे तपशील आणि मतदारसंघनिहाय निकाल (Vidhansabha Nivadnuk Nikal) पाहण्यासाठी उपलब्ध फिल्टर्स वापरू शकतात.
Voter Helpline ॲप : Voter Helpline मोबाईलॲप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा पक्षनिहाय निकालाची आकडेवारी:
- भारतीय जनता पार्टी – भाजपा – १३२
- शिवसेना – (शिंदे गट) – ५७
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) – ४१
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) – २०
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – १६
- राष्ट्रवादी काँग्रेस – (शरदचंद्र पवार गट) – १०
- समाजवादी पक्ष – सपा – २
- जन सुराज्य शक्ती – २
- राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष – १
- राष्ट्रीय समाज पक्ष – १
- ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – १
- भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) – सीपीआय(एम) – १
- भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष – १
- राजर्षी शाहू विकास आघाडी – १
- अपक्ष – २
एकूण जागा = २८८
पुढील लेख देखील वाचा!
- मतदार यादी ऑनलाईन कशी डाउनलोड करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- घरबसल्या मतदान कार्ड ऑनलाईन कसे काढायचे? सविस्तर प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- डिजिटल मतदान कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर
- निवडणूक आयोगामार्फत मतदारांसाठी विविध उपयोगी प्रणाली पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- मतदार यादीत नाव नसेल तर पात्र व्यक्तींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन !
- मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडून घेण्याचे आवाहन !
- दिव्यांग मतदारांना सक्षम ॲपच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध !
- मतदारकार्ड आधारकार्डला लिंक करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
- मतदार यादी ऑनलाईन कशी डाउनलोड करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- विधानसभा निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांची संपूर्ण माहिती पहा आणि ठरवा कोणत्या उमेदवाराला मतदान करायचे?
- मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य; पहा संपूर्ण यादी !
- निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता…!
- आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ !
- उमेदवार, राजकीय पक्षांसाठी निवडणुकीबाबतच्या परवानग्या ‘सुविधा 2.0’ मोबाईल ॲपवर मिळवा ऑनलाईन!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!