महाकृषी ऊर्जा अभियान अधिसूचना – प्रधानमंत्री कुसुम योजना सद्य:स्थिती
महाकृषि ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत 100000 सौर पंपांची योजना सुरु झाली आहे. यासाठी केंद्र शासनाकडून अद्याप पुरवठादार कंपन्या व दर अंतिम झालेले नाहीत, त्यास एक महिना कालावधी लागण्याची शक्यता आहे (डिसेंबर, 2021 अखेर).
दरम्यान केंद्र शासनाचे सुचनेप्रामणे मागील वर्षाचे पुरवठादार, मागील वर्षाचे दराने सौर पंप पुरविणेस तयार असतील अशा पुरवठादारांकडून देकार मागवून 2750 सौर पंपासाठी प्रथम आलेल्या अर्जदारास प्राधान्य देऊन त्याची कार्यवाही सुरु आहे.
केंद्र शासनाकडून या वर्षीचे पुरवठादार कंपन्या व दर आलेनंतरच या पुरवठादारांना जिल्हानिहाय कोटा वाटप केल्यानंतर योजनेची अपेक्षित कार्यवाही सुरु होईल. तोपर्यंत अर्जदारांची प्राथमिक माहिती/ मोबाईल नोंदणी करणेत येत आहे.
केंद्र शासनाकडून सौर पंप पुरवठादार व दर ठरवून मिळाले व राज्य शासनाचे सुकाणू समितीकडून जिल्हानिहाय पुरवठादारास वाटप झालेनंतर अर्जदारांना प्राधान्यक्रमानुसार SMS पाठविणेत येतील. त्यानंतरच अर्जदारांची संपूर्ण माहिती भरणे, कोटेशन देणे, लाभार्थी हिस्सा स्विकारणे, कंपनी निवडणे व सौर पंप आस्थापित करणे ह्याबाबी शक्य होतील.
महाकृषि ऊर्जा अधिसूचना : महाकृषि ऊर्जा अधिसूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना; सौर कृषी पंपांसाठी ऑनलाईन अर्ज – Kusum Solar Pump Yojana
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
Recvest for fail