महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

महाराष्ट्र शिक्षण : 1 ली ते 12 वीच्या शालेय अभ्यासक्रमात 25% कपात

राज्यातली कोव्हिडची परिस्थिती आणि ऑनलाईन सुरु असणारं शिक्षण लक्षात घेत राज्य शिक्षण मंडळाने यावर्षीसाठीच्या अभ्यासक्रमात कपात केली आहे. 1 ली ते 12 वी साठीचा अभ्यासक्रम कमी करण्यात येत असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

मार्च २०२० पासून कोविड-१९ या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगामध्ये झालेला आहे, त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार मार्च २०२० पासून राज्यामध्ये सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेले आहेत. दरवर्षी साधारणत: जून मध्ये सर्व राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष सुरु होत असते. तथापि सन २०२१-२२ मध्ये नेहमीप्रमाणे शाळा सुरु करता आलेल्या नाहीत. वेळेवर शाळा सुरु करता न आल्यामुळे विहीत वेळेत पाठ्यक्रम पूर्ण करणेबाबत समस्या निर्माण होऊ शकते. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांचा इयत्ता १ ली ते १२ वी चा पाठ्यक्रम सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता कमी करणेबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

कोविड -१९ या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव सद्य परिस्थितीतही कमी झालेला दिसून येत नाही. या अनुषंगाने सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी चा २५% पाठ्यक्रम कमी करण्यात आला होता. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता सुद्धा सन २०२०-२१ प्रमाणे २५% पाठ्यक्रम कमी करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात आली आहे . सदर कमी केलेल्या पाठ्यक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद  महाराष्ट्र, पुणे यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहेत तसेच याबाबत शाळांना, विद्यार्थ्यांना तसेच पालकांना अवगत होण्यासाठी आवश्यक प्रसिध्दी देण्यासाठी, त्याबाबतचा शासन निर्णय देखील जारी केला आहे.

शासन निर्णय :

शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी कोविड -१९ या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी चा पाठ्यक्रम २५ टक्के कमी करणेबाबतचा शासन निणर्य PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – ११ वी प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२२ – CET परीक्षा वेळापत्रक जाहीर ! परीक्षा शुल्क, अभ्यासक्रम संपूर्ण माहिती – 11th Std Admission

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.