वृत्त विशेषजिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी कामेसरकारी योजनास्पर्धा परीक्षा

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रे विषयी सविस्तर माहिती – Maharashtra Startup Yatra

राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८ जाहीर करण्यात आले. सदर धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यामधे स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासाकरीता पूरक वातावरणनिर्मिती करुन त्यातून यशस्वी उद्योजक घडविण्याकरीता इनक्युबेटर्सची स्थापना, गुणवत्ता परीक्षण व बौद्धिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्य, ग्रँड चॅलेंज, स्टार्टअप वीक यांसारख्या अनेक उपक्रम राबविण्यात करण्यात येतात.

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा:

नाविन्यता, कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात, त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते परंतु काही वेळा योग्य मार्गदर्शनाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत. राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी शासनामार्फत दि. १५ ऑगस्ट २०२२ ते दि. १७ सेप्टेंबर २०२२ दरम्यान महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.

वैशिष्टये: महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेची ठळक वैशिष्टये खालीलप्रमाणे आहेत

  • महाराष्ट्राच्या तळागाळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे.
  • नवसंकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरवणे.
  • राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे.
  • महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण, कल्पना असणारे सर्व नागरिक या यात्रेत सहभागी होण्यास पात्र असतील.

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे टप्पे: स्टार्टअप यात्रेचे प्रामुख्याने 3 टप्पे असतील.

१. तालुकस्तरीय प्रचार व प्रबोधन:

राज्यातील प्रत्येक तालुक्यात लोकसमुह एकत्रित होण्याच्या ठिकाणी स्टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रबोधनसाठी एक फिरते वाहन (Mobile Van) येणार आहे. या दरम्यान यात्रेबाबतची संपूर्ण माहिती, नावीन्यपूर्ण संकल्पना व त्याचे इतर पैलू तसेच विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती देण्यात येणार आहे. नावीन्यपूर्ण कल्पना असलेले नागरिक आपल्या कल्पना यावेळी नोंदवू शकतात. (क्षेत्र – कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास (सस्टेनेबिलिटी), स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, ई-प्रशासन, इतर).

२. जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा:

सर्व तालुक्यातील प्रचार प्रसिद्धी नंतर, जिल्हास्तरावर प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. प्रशिक्षण शिबिरात नवउद्योजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजक व तज्ज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने होणार आहेत. तसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांची सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

३. राज्यस्तरीय सादरीकरण स्पर्धा व विजेत्यांची घोषणा:

प्रत्येक सादरीकरण सत्रातील उत्तम १० कल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण तज्ज्ञ समितीसमोर करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय विजेत्यांना रोख अनुदान तसेच आवश्यक पाठबळही पुरविण्यात येईल.

पारितोषिके:

जिल्हास्तरावर पारितोषिके: प्रत्येक जिल्हा स्तरावरील शीर्ष 3 विजेत्यांना खाली वर्णन केल्याप्रमाणे बक्षिसे मिळतील.
प्रथम : रु २५,०००
द्वितीय : रु १५,०००
तृतीय : रु १०,०००
विभागस्तरावर पारितोषिके: प्रत्येक विभागस्तरावरील सर्वोत्कृष्ट उद्योजक व सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिकेला रोख बक्षीस मिळेल (विभाग : नाशिक, कोकण, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, पुणे).
वर्णनएकूण विजेतेप्रत्येकी रक्कम
विभागाचा स्टार्ट अप हिरो रु १,००,०००
विभागीय सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका रु १,००,०००
राज्यस्तरावर पारितोषिके:
क्षेत्रपहिले पारितोषिकदुसरे पारितोषिक
कृषी रु १,००,००० रु ७५,०००
शिक्षण रु १,००,००० रु ७५,०००
आरोग्य रु १,००,००० रु ७५,०००
सस्टेनीबिलिटी (कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छ उर्जा इ.) रु १,००,००० रु ७५,०००
ई-प्रशासन रु १,००,००० रु ७५,०००
स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता रु १,००,००० रु ७५,०००
इतर रु १,००,००० रु ७५,०००

जर एकच प्रतिभागी २ वेग-वेगळ्या गटांमध्ये विजेता ठरला तर सर्वात जास्त रकमेचे पारितोषिक त्या प्रतिभागीला घोषित करून, रिक्त गटामधे पुढील विजेत्यांचा विचार केला जाईल. सर्व विजेत्यांची घोषणा राज्यस्तरीय समारंभात केली जाईल.

रोख अनुदाना व्यतिरिक्त इतर लाभ:

  • प्री – इनक्युबेशन सहाय्य
  • इनक्युबेशन सहाय्य
  • बीज भांडवल सहाय्य
  • नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शक
  • बौद्धिक संपदा हक्क व गुणवत्ता प्रमानण यासाठी आर्थिक सहाय्य
  • सॉफ्टवेअर व क्लाऊड क्रेडिट्स

वेळापत्रक: स्टार्टअप यात्रा विभाग स्तर नुसार वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

स्टार्टअप यात्रेसाठी ऑनलाईन अर्ज करा:

इच्छुक उमेदवार यात्रेच्या प्रचार प्रसिद्धी दरम्यान अथवा https://www.mahastartupyatra.in या संकेतस्थळावर अथवा सदर जिल्ह्यातील सादरीकरण सत्राच्या ठिकाणी नाव नोंदणी करु शकतात.

संपर्क: अधिक माहितीसाठी team@msins.in वर ई-मेल किंवा 022 35543099 या क्रमांकावर कार्यालयीन वेळात संपर्क करू शकता.

हेही वाचा – राष्ट्रीय करिअर सेवा : 10वी/12वी उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; ऑनलाईन अर्ज करा ! – National Career Service

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.