महाराष्ट्र शासन निर्णय - GRमहिला व बाल विकास विभागवृत्त विशेषसरकारी योजना

पीडित महिला व बालकांसाठी सुधारित मनोधैर्य योजना – 2025

बलात्कार (Rape) / बालकांवरील लैंगिक अत्याचार (Sexual Assault), अॅसिड हल्ला (Acid Attack) व ज्वालाग्रही/ज्वलनशील पदार्थांमुळे (पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाकाचा गॅस इत्यादी ज्वलनशील पदार्थ) बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात “मनोधैर्य योजनेची (Manodhairya Yojana)” व्याप्ती शासन निर्णय दि.०१.०१.२०२४ अन्वये वाढविण्यात आली आहे. सदर शासन निर्णयामधील परिशिष्ट “अ” च्या (१) बलात्कार मधील (इ) बलात्काराच्या घटनेमुळे महिलेचा मृत्यू झाल्यास, रु.१० लक्ष पर्यंत अर्थसहाय्य देणेबाबतची तरतूद आहे.

तथापि, (२) POSCO अंतर्गत बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे बालकाचा मृत्यू झाल्यास, (३) अॅसिड हल्ला च्या घटनेमुळे महिला/बालकाचा मृत्यू झाल्यास तसेच (४) ज्वालाग्रही/ज्वलनशील (पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाकाचा गॅस इत्यादी) पदार्थाद्वारे हल्ल्यामध्ये महिला/बालकाचा मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य देण्याची तरतूद नाही. सबब, सदर तीनही घटनामध्ये पिडीत महिला/बालकाचा मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य देणे आवश्यक आहे. त्यामुळे मनोधैर्य (Manodhairya Yojana) योजनेच्या शासन निर्णयामधील परिशिष्ट “अ” व “ब” मध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

पीडित महिला व बालकांसाठी सुधारित मनोधैर्य योजना – Manodhairya Yojana:

बलात्कार (Rape)/ बालकांवरील लैंगिक अत्याचार (Sexual Assault), अॅसिड हल्ला (Acid Attack) व ज्वालाग्रही/ज्वलनशील पदार्थांमुळे (पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाकाचा गॅस इत्यादी ज्वलनशील पदार्थ) बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठीच्या “मनोधैर्य योजनेच्या Manodhairya Yojana” संदर्भाधिन शासन निर्णयामधील परिशिष्ट “अ” व “ब” वगळण्यात येत असून त्याऐवजी आता नव्याने परिशिष्ट “अ” व “ब” समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सुधारित मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडितांना मंजूर करावयाच्या अर्थसहाय्याचा तपशिल. (Manodhairya Yojana)
अ.क्र.घटनेचे विवरणअर्थसहाय्यशेरा
बलात्कार :-
अ) घटनेचा परिणाम स्वरुप मानसिक धक्का बसून महिलेस कायमचे मतिमंदत्व / शारीरिक अपंगत्व आले असेल तररु.१०,००,०००/- पर्यंतमंजूर रक्कमेपैकी ७५ % रक्कम १० वर्षासाठी पीडिताच्या नावे बँकेत मुदतठेव म्हणून ठेवण्यात येईल. तर २५% रक्कमेचा धनादेश पीडितास तात्काळ अदा करण्यात येईल. (यामध्ये वैद्यकीय खर्चासाठी रु.३० हजार इतक्या रक्कमेचा समावेश असेल)
आ) सामुहिक बलात्कार व अशा प्रकरणी महिलेस गंभीर व तीव्र स्वरुपाची शारीरिक इजा झाली असेल तररु.१०,००,०००/- पर्यंतवरीलप्रमाणे
इ) बलात्काराच्या घटनेमुळे महिलेचा मृत्यू झाल्यास,रु.१०,००,०००/- पर्यंतवरीलप्रमाणे
ई) बलात्काराच्या गुन्ह्यातील वरील “अ”, “आ” व “इ” मधील प्रकरणे वगळून इतर घटनांमधील पीडित महिला असेल तररु.३,००,०००/- पर्यंतवरीलप्रमाणे
POCSOअंतर्गत बालकांवरील लैगिक अत्याचार :-
अ) घटनेमध्ये पीडित बालकास लिंगभेद न करता कायमस्वरुपी मतिमंदत्व किंवा अपंगत्व आल्यासरु.१०,००,०००/- पर्यंतमंजूर ७५% रक्कमेपैकी रक्कम १० वर्षासाठी पीडिताच्या नावे बँकेत मुदतठेव म्हणून ठेवण्यात येईल. तर २५% रक्कमेचा धनादेश पीडितास तात्काळ अदा करण्यात येईल. (यामध्ये वैद्यकीय खर्चासाठी रु.३० हजार इतक्या रक्कमेचा समावेश असेल.)
आ) घटनेमुळे बालकाचा मृत्यू झाल्यासरु.१०,००,०००/- पर्यंतवरीलप्रमाणे
इ) बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील “अ” व “आ” येथील नमूद प्रकरणे वगळून इतर घटनांमधील पीडित बालक असेल तर,रु.३,००,०००/- पर्यंतवरीलप्रमाणे
अॅसिड हल्ला
अ) घटनेमध्ये पिडित महिला / बालकाचा चेहरा विद्रुप झाल्यास, शरीराच्या कोणत्याही भागाची हानी झाल्यास, कायमचे अपंगत्व आल्यास,रु.१०,००,०००/- पर्यंतमंजूर रक्कमेपैकी ७५ % रक्कम १० वर्षासाठी पीडिताच्या नावे बँकेत मुदतठेव म्हणून ठेवण्यात येईल. तर २५% रक्कमेचा धनादेश पीडितास तात्काळ अदा करण्यात येईल. (यामध्ये वैद्यकीय खर्चासाठी रु.३० हजार इतक्या रक्कमेचा समावेश असेल.)
आ) घटनेमुळे महिला/बालकाचा मृत्यू झाल्यास,रु.१०,००,०००/- पर्यंतवरीलप्रमाणे
इ) अॅसिड हल्ल्याच्या “अ” व “आ” येथील नमूद प्रकरणे वगळून इतर घटनांमधील पीडित महिला/बालक असेल तर घटनांमधील पीडित महिला/बालक असेल तर,रु.३,००,०००/- पर्यंतवरीलप्रमाणे
ज्वालाग्रही/ज्वलनशील (पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाकाचा गॅस इत्यादी) पदार्थाद्वारे हल्ला”
अ) घटनेमध्ये पिडित महिला / बालकाचा चेहरा विद्रुप झाल्यास, शरीराच्या कोणत्याही भागाची हानी झाल्यास, कायमचे अपंगत्व आल्यास,रु.१०,००,०००/- पर्यंतमंजूर रक्कमेपैकी ७५ % रक्कम १० वर्षासाठी पीडिताच्या नावे बँकेत मुदतठेव म्हणून ठेवण्यात येईल. तर २५% रक्कमेचा धनादेश पीडितास तात्काळ अदा करण्यात येईल. (यामध्ये वैद्यकीय खर्चासाठी रु.३० हजार इतक्या रक्कमेचा समावेश असेल.)
आ) घटनेमुळे महिला/बालकाचा मृत्यू झाल्यास,रु.१०,००,०००/- पर्यंतवरीलप्रमाणे
इ) ज्वालाग्रही/ज्वलनशील (पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाकाचागॅस इत्यादी) पदार्थाद्वारे हल्ल्याच्या गुन्ह्यातील “अ” व “आ” येथील नमूद प्रकरणे वगळून इतर घटनांमधील पीडित महिला/बालक असेल तररु.३,००,०००/- पर्यंतवरीलप्रमाणे

महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय – Manodhairya Yojana GR:

बलात्कार (Rape)/ बालकांवरील लैंगिक अत्याचार (Sexual Assault), अॅसिड हल्ला (Acid Attack) व ज्वालाग्रही/ज्वलनशील पदार्थांमुळे (पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाकाचा गॅस इत्यादी ज्वलनशील पदार्थ) बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात सुधारित मनोधैर्य (Manodhairya Yojana) योजनेची व्याप्ती वाढविणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

खालील लेख देखील वाचा !

  1. New Criminal Laws : देशात 3 नवीन फौजदारी कायदे १ जुलैपासून लागू !
  2. Labor Law : कामगार कायदे विषयी सविस्तर माहिती.
  3. महाराष्ट्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थी/ विद्यार्थीनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणीचा आदेश जारी!
  4. शासकीय कामे होत नसतील तर ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची? जाणून घ्या सविस्तर.
  5. शक्ति सदन योजना
  6. बालहक्क आयोगाकडे दाद कशी मागायची?
  7. बालविवाह प्रतिबंधक कायदा व जबाबदाऱ्या !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.