कृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी योजना

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज सुरु – २०२२-२३ – Mini Tractor Subsidy Scheme Nandurbar

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वयंसहायत बचत गटांनी 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.

स्वयंसहाय्यता बचत गटांना त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के शासकीय अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटॅव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्यात येणार आहे.

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना सन २०२२-२३ – Mini Tractor Subsidy Scheme Nandurbar:

मिनी ट्रक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3 लाख 50 हजार इतकी असून स्वयंसहायता बचत गटाने वरील कमाल मर्यादेच्या रकमेच्या 10 टक्के स्वहीस्सा भरल्यानंतर 90 टक्के म्हणजे (कमाल रुपये 3.15 लाख ) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.

अटी व शर्ती:

१) योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी गटातील सर्व सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावा.

२) बचतगट हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गट पुरुष किवा महिलांचा असावा.

३) स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे 80 टक्के अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत.

४) गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावा.

५) ट्रॅक्टर व त्याच्या उप्साधानांच्या खरेदीवर रु. ३.१५ लाख शासकीय अनुदान अनुञेय राहील.

संपर्क: योजनेच्या अधिक माहितीसाठी व विहीत नमुन्यातील अर्जांसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा.

हेही वाचा – कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य (कृषी यांत्रिकीकरण) योजनेसाठी असा करा महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

2 thoughts on “मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज सुरु – २०२२-२३ – Mini Tractor Subsidy Scheme Nandurbar

  • सुरेश इंगळे

    अर्ज कुठे आणि कसा करायचा ऑनलाईन की ऑफलाईन डिटेल्स द्या

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.