डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे? जाणून घ्या सविस्तर (Property Card)
स्वामित्व योजनेअंतर्गत ग्रामीण नागरिकांना त्यांच्या घराचे आणि जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. ज्यापद्धतीने साताबारा उताऱ्यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे याची माहिती दिलेली असते, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावाने किती बिगर शेतजमीन आहे, याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते. म्हणजे काय तर बिगर शेतजमीन क्षेत्रात एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता म्हणजेच घर, बंगला, व्यवसायाची इमारत आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर नमूद केलेली असते. या योजनेच्या माध्यमातून देशभरातल्या गावांचे ड्रोन सर्वेक्षण होणार आहे. त्यातून प्रत्येक घराचा नकाशा, मिळकत पत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
डिजिटल स्वाक्षरीतला सातबारा आणि आठ-अ कसा काढायचा हे आपण यापूर्वीच्या लेखामध्ये पाहिले आहे. आता डिजिटल स्वाक्षरीतले प्रॉपर्टी कार्ड कसे काढायचे, याची माहिती पाहूया.
डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन डाउनलोड करण्याची प्रोसेस:
खालील महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट लिंक ओपन करा.
https://digitalsatbara.mahabhumi.gov.in
आता तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील इतर सेवांचा लाभ घेऊ शकता.
पण, जर तुम्ही पहिल्यांदाच इथे आला असाल, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला इथे New User Registration या पर्यायावर क्लिक करायचे आहे. खालील प्रमाणे “Regular Login” या पर्याय निवडून नोंदणी करा किंवा “OTP” लॉगिनचा पर्याय निवडा.
New User Registration करताना एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला सुरुवातीला खालील माहिती भरायची आहे.
- वैयक्तिक माहिती – Personal Information
- पत्ता माहिती – Address Information
- लॉगइन माहिती – Login Information
यानंतर तुमच्या समोर वापर करता नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे असा मेसेज येईल. त्यानंतर लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचा आहे.
लॉगिन केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर “Digitally signed Property card” हा पर्याय तुम्ही पाहू शकता, त्यावर क्लिक करा.
त्यानंतर “डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड” नावाचे एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे, त्यानंतर जिल्हा आणि मग तुमचे गाव किंवा प्रॉपर्टी ज्या तहसील अंतर्गत येते ते कार्यालय निवडायचे आहे. त्यानंतर गाव निवडायचे आहे आणि मग CTS नंबर टाकायचा आहे. CTS म्हणजे सिटी सर्व्हे नंबर. याचा अर्थ जमीन ओळखण्यासाठी सरकारी रेकॉर्डमध्ये नोंदवलेला एक नंबर. प्रॉपर्टीशी संबंधित सगळे रेकॉर्ड या नंबरशी संबंधित असतात.
जर तुम्हाला CTS नंबर माहिती नसेल प्लॉट नंबर तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर CTS नंबर निवडा या पर्यायावर क्लिक केले की तो नंबर तिथे आलेला दिसेल. त्या नंबरवर क्लिक करून तो निवडायचा आहे.
सगळ्यात शेवटी डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर प्रॉपर्टी कार्ड डाऊनलोड होईल, PDF फाईलमध्ये डाउनलोड करून प्रिंट करून घ्या.

मालमत्ता पत्रक असे या कार्डचे शीर्षक असते. यात सुरुवातीला गाव, तालुका आणि जिल्ह्याचे नाव दिलेले आहे. त्यानंतर नगर भूमापन क्रमांक किंवा प्लॉट नंबर आणि त्याचं क्षेत्र किती आहे ते चौरस मीटरमध्ये दिलेले असते. त्यानंतर हा प्लॉट कुणाच्या नावे आहे ती माहिती हक्काचा मूळ धारक या पर्यायासमोर दिलेली असते. त्यानंतर सगळ्यात खाली एक सूचना दिलेली असते. त्यात कोणत्या सरकारी अधिकाऱ्याने कार्डवर सही केली आहे, त्याची माहिती सांगितलेली असते.
डिजिटल स्वाक्षरीत असल्यामुळे हे प्रॉपर्टी कार्ड शासकीय आणि कायदेशीर कामांसाठी वापरता येईल. आता प्रॉपर्डी कार्ड काढण्यासाठी सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयात जायची गरज पडणार नाही. स्थावर मालमत्तेवर होणाऱ्या व्यवहाराची नोंद प्रॉपर्टी कार्डवर ठेवली जाणार आहे. आतापर्यंत राज्यातल्या 1165 गावांचा ड्रोन सर्व्हे झाला असून, राज्यातल्या सगळ्या गावांमधील ड्रोन सर्व्हे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. या माध्यमातून सामान्य माणूस बँकांकडून कर्जही घेऊ शकेल.
हेही वाचा – “स्वामित्व योजना” म्हणजे काय? प्रॉपर्टी कार्डचे फायदे काय? जाणून घ्या सविस्तर
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!