कृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी योजना

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर ५०,०००/ लाभ योजना पाचवी लाभार्थी यादी जाहीर ! – Mahatma Jyotiba Phule Karj Mafi – MJPSKY 5th List

सन २०१७ ते २०२० या कालावधीत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पात्र शेतकऱ्यांची आता पाचवी यादी जाहीर केली आहे, ही यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या यादीतील शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, कर्जखाते पासबुक व बचतखाते पासबुक घेऊन नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे.

सन २०१७ –१८, २०१८–१९ व २०१९–२० या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्जाची उचल करुन शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विहित कालावधीत परतफेड केलेली आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाकडून 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

यामध्ये प्राथमिकदृष्ट्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्धीसाठी बँकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या यादीमधील संबंधित शेतकऱ्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या विशिष्ट क्रमांकासह शेतकऱ्यांनी बँक कर्ज पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेच्या शाखेमध्ये अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरणासाठी जावयाचे आहे. त्याठिकाणी संगणकावर दिसत असलेल्या कर्जखात्यांचा तपशील, आधार क्रमांक इत्यादी बाबींची खातरजमा करुन शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करावयाचे आहे. आधार प्रमाणीकरणानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यामध्ये थेट प्रोत्साहनपर लाभाची रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी बँक कर्ज खात्यास आधार क्रमांक उपलब्ध करुन दिलेला नाही. अशा शेतकऱ्यांची नावे पूर्तता झाल्यानंतर समाविष्ट करण्यात येणार आहेत.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर ५०,०००/ लाभ योजना पाचवी लाभार्थी यादी जाहीर ! – Mahatma Jyotiba Phule Karj Mafi – MJPSKY 5th List:

आपण इथे फक्त रत्नागिरी जिल्ह्याची लाभार्थी यादी उपलब्ध करून देणार आहोत, बाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या CSC सेंटर/आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा बँकेच्या शाखेत भेट देऊन यादी मध्ये नाव आहे का ते तपासा आणि आधार प्रमाणीकरण करून घ्या.

१) आपले प्रमाणीकरण सहज व सोपे होण्यासाठी वरील प्रसिध्द केलेल्या यादीमधील शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रे घेवून आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र/बँक शाखा मध्ये जावून प्रमाणीकरण करुन घ्यावे.

  • आधार कार्ड.
  • कर्ज खात्याचे व बचत खात्याचे पासबुक.
  • यादीमध्ये आपल्या नावासमोरील नमूद असलेला विशिष्ट क्रमांक ( स्वत: लिहून न्यावा).

२. काही विसंगती असल्यास पोर्टलवर असहमतीचे बटण दाबून शेतकरी तक्रार नोंदवू शकतो.

३. उपरोक्त कर्जखात्यांची यादी अंतिम नसून , बँकांकडून जशी माहिती उपलब्ध होईल त्याप्रमाणे नवीन कर्जखात्यांची यादी प्रसिध्द करण्यात येईल.

हेही वाचा – शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे पणन संचालकांचे आवाहन !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर ५०,०००/ लाभ योजना पाचवी लाभार्थी यादी जाहीर ! – Mahatma Jyotiba Phule Karj Mafi – MJPSKY 5th List

  • Pandhari Narayan mande

    Gret

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.