वृत्त विशेषइतर मागास बहुजन कल्याण विभागघरकुल योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी योजना

मोदी आवास घरकुल योजना : 31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन !

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या 28 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाने इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना सुरु केलेली आहे. या योजनेंतर्गत राज्यात तीन वर्षात 10 लाख घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.

“सर्वासांठी घरे – २०२४ ” हे राज्यशासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना “सन २०२४ पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमांतर्गत विविध योजनांतर्गत भूमीहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे करिता पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना तसेच निवासी प्रयोजनार्थ अतिक्रमणे नियमानुकूल करणे, शासकीय जमिनी विनामुल्य उपलब्ध करुन देणे इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येतात.

इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील आवास प्लस मधील प्रतिक्षा यादीत नाव असलेल्या तथा आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु स्वयंचलित प्रणालीद्वारे अपात्र झालेल्या पात्र लाभार्थ्यांनी प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा यांनी निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार  इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांनी मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपले अर्ज संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्यामार्फत 31 जानेवारी, 2024 पर्यंत सादर करण्याचे असे अवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक यांनी केले आहे.

लाभार्थी पात्रता –

>

१. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा.

२. लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षे असावे.

३. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न रु. १.२० लाखापेक्षा जास्त नसावे.

४. लाभार्थ्यांचे स्वत:च्या अथवा कुटुंबियांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे.

५. लाभार्थ्यांकडे स्वत:ची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्याचे स्वत:चे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल.

६. लाभार्थी कुटूंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण / गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा.

७. एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन:श्च योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.

८. लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीमध्ये (PWL) समाविष्ट नसावा.

आवश्यक कागदपत्रे –

७/१२ उतारा / मालमत्ता नोंदपत्र / ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा अथवा ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा अथवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत, आधारकार्ड स्वेच्छेने दिलेल्या आधारकार्डची प्रत, रेशनकार्ड / निवडणूक ओळखपत्र / विद्युत बिल / मनरेगा जॉब कार्ड लाभार्थ्यांच्या स्वत:च्या नावे वापरात असलेल्या बचत खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत.

हेही वाचा – घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर – प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.