वृत्त विशेषनगर विकास विभागनगरपंचायतनगरपरिषदमहानगरपालिकासरकारी कामे

नगरसेवक निधी मधून करावयाची कामे – Nagarsevak Fund and Work

राज्यातील महानगरपालिकांमध्ये प्रत्येक नगरसेवकांस नगरसेवक स्वेच्छा निधी म्हणून महानगरपालिका अंदाजपत्रकात करण्यात येत असलेल्या तरतुर्दीचा विनियोग योग्य अशा नागरी सेवा सुविधांवर व्हावा यास्तव या निधीतून कोणती कामे घेण्यात यावीत व कोणती कामे घेण्यात येऊ नयेत, याबाबत दिनांक २६ फेब्रुवारी, २००१ च्या शासन निर्णयान्वय मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली होती आणि दिनांक २८ जून, २००१ च्या पूरक परिपत्रकान्वये अनुज्ञेय कामांच्या यादीमध्ये (परिशिष्ट “अ”) ५ कामांचा समावेश करण्यात आला आहे.

केंद्र शासनाने नागरी घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम २००० ची अंमलबजावणी सर्व महानगरपालिकांवर बंधनकारक केलेली असल्याने त्याची अंमलबजावणी व संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान कार्यक्षमपणे पार पाडण्याचे दृष्टीने यासाठी हाती घ्यावयाची भांडवली खर्चाच्या कामांचा अंतर्भाव अनुज्ञेय कामांमध्ये करणे.

नगरसेवक निधी मधून करावयाची कामे – Nagarsevak Fund and Work:

शासन परिपत्रक क्र. एएमसी १४२००/२२६४/प्र.क्र.१४४/नवि-२४ दिनांक २६ फेब्रुवारी, २००१ तसेच समक्रमांकाच्या जून, २००१ च्या पूरक परिपत्रकान्वये नगरसेवक स्वेच्छा निधीमधून घेण्याच्या अनुज्ञेय कामाच्या यादी (परिशिष्ट “अ”) मध्ये खालील दोन कामांचा समावेश करण्यात येत आहे.:-

अ) नागरी घन कचरा व्यवस्थापन व निर्मुलन यांचे अंतर्गत तसेच संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान यांचे अंतर्गत घ्यावयाची सर्व प्रकारची भांडवली खर्चाची कामे.

ब) विभागावार वेगवेगळ्या खात्यातील कामगारांच्या हजेरी चौक्या तयार करणे किंवा अस्तित्वात असलेल्या चौक्यांची दुरुस्ती करणे.

स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत नगरसेवक स्वेच्छानिधीतून घेण्यासाठी अनुज्ञेय कामांची यादी (परिशिष्ट-अ)

१) रस्त्याची कामे:-

 • लहान रस्ते
 • छोटे पूल
 • रस्त्याचे डांबरीकरण
 • नळकांडी पूल
 • साकव
 • नाल्याची कामे
 • रस्त्यावरील मोरीची कामे
 • लहान नाल्यावर फरशी बांधणे
 • फूटब्रीज
 • ड्रेनेजची कामे
 • सिमेंट प्लनची कामे

२) पाणीपुरवठयाची कामे:-

१) ज्या वसाहतीसाठी नळपाणी पुरवठा योजना अगोदरच झाल्या असतील अशा वस्त्यांना जादा पाईप लाईन टाकून पाणीपुरवठा करण्यासंबंधीची कामे, तसेच पाण्याची टाकी बांधणे.

२) विहिरी

३) शहरी भागातील पाणीपुरवठांची कामे

४) सामाजिक सभागृह / समाज मंदिर

५) स्मशानभूमीची कामे

६) चावडी

७) सार्वजनिक वाचनालयाचे बांधकाम

८) प्राथमिक शाळांच्या नवीन खोल्या

९) प्राथमिक शाळा खोलीची विशेष दुरुस्ती.

१०) ज्या झोपडपट्टयांमध्ये (घोषित गलिच्छ अशा) सार्वजनिक सुविधा निर्माण करण्याची शासनाची जबाबदारी आहे अशा ठिकाणी सार्वजनिक उपयोगाकरिता स्नानगृहे, संडास, अस्तित्वात असलेल्या संडासांची दुरुस्ती, पायवाटा, सार्वजनिक स्वरूपाचा पाणीपुरवठा व दिवाबत्ती अशी सामान्य स्वरुपाची कामे.

११) महापालिका क्षेत्रातील उपकर आकारण्यात आलेल्या चाळीमधील गल्ल्या, गटारे, सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधणे व त्याची दुरुस्ती, दुरुस्त न होणाऱ्या संडासांची पुनर्बाधणी व दुरुस्ती. सार्वजनिक न्हाणी गृहे बांधणे, त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या पध्दतीच्या (Piped Water Systems) दुरुस्तीची कामे. मात्र चाळीच्या इमारतीच्या दुरुस्ती, भिंतीना प्लॅस्टर लावणे, रंग लावणे, विद्युतीकरण करणे अशी कामे या अंतर्गत घेता येणार नाहीत.

१२) महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी / शासकीय / महानगरपालिका यांच्या मालकीच्या जागांवरील घोषित गलिच्छ वस्त्यांत (Declared Slurns) सार्वजनिक उपयोगाची (Public Utility) म्हणून बालवाडया, व्यायामशाळा इ. सुविधांची कामे.

१३) महानगरपालिका परिवहन सेवेच्या बस थांब्यावर निवारे (Sheds) बांधणे. (हया थांब्यांची परिरक्षणे, देखभाल इ. जबाबदारी परिवहन सेवेची राहील आणि त्यासाठी हया कार्यक्रमातून निधी दिला जाणार नाही)

१४) अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीच्या वस्त्यांमधील समाजमंदीरांच्या दुरुस्तीची कामे.

१५) महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारतीमधील अशी विशिष्ट दुरुस्तीची कामे जसे की, गल्या, गटारे, सार्वजनिक स्वच्छतागृहे व संडास यांची दुरुस्ती व पिण्याच्या पाण्याच्या पध्दतीच्या (Piped Water Systems) दुरुस्तीची कामे, मात्र अशा इमारतीची भितींना प्लॅस्टर लावणे, रंग लावणे, विद्युतीकरण करणे अशी कामे या अंतर्गत घेता येणार नाहीत.

१६) महानगरपालिकेच्या रुग्णालयात जेथे अगोदरच अशी सोय नाही तेथेच पोस्टमार्टम रुमचे बांधकाम.

१७) महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय चाळी, महानगरपालिकेच्या मालकीच्या शाळांच्या विशेष दुरुस्तीची कामे. खाजगी इमारतीतील महानगरपालिकेच्या शाळेच्या दुरुस्तीची कामे मात्र या कार्यक्रमाखाली घेता येणार नाहीत.

खालील अटींच्या अधीन राहून महानगरपालिका क्षेत्रात पाळणाघरे बांधण्याची कामे:-

 • ह्या पाळणाघराची मालकी महानगरपालिकेची राहील.
 • अशी कामे घेण्यापूर्वी पाळणाघरे चालविण्याची तसेच त्यांची देखभाल / परिरक्षण करण्याची व्यवस्था प्रथम ठरविण्यात यावी.
 • दिनांक ९/१२/१९८७ च्या शासन निर्णयानुसार बालवाड्या चालविण्यासाठी ज्या अटीवर रजिस्टर्ड / विश्वस्त संस्थांना चालविण्यास देण्याची मुभा आहे. धर्तीवर ही पाळणाघरे विश्वस्त संस्थांना चालविण्यास देण्यात येतील.
 • पाळणाघर चालविण्यासाठी पाळणे व इतर साहित्य इ. खर्च त्या रजिस्टर्ड / विश्वस्त संस्थांना करावा लागेल.

१८) पोलीस चौकीचे बांधकाम गृह विभागाने विहीत केलेल्या आर्थिक व अन्य निकषाप्रमाणे असावे.

१९) महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या मालकीच्या बगीच्यामध्ये पुढे नमूद केलेल्या प्रकारचे पक्क्या स्वरुपाचे बसवायचे (फिक्सपर्स) खेळाचे साहित्य बसविणे.

 •  लोखंडी घसरगुंडी
 • हत्तीवरील घसरगुंडी
 • रेनबो
 • बास्केट बॉल पिलर्स
 • लोखंडी पाळणे इ.

२०) शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्र. जीईएन १०८९/१४८७/सीआर९९/८९/नवि-१६, दिनांक १८ ऑगस्ट, १९८९ अन्वये घेण्यात येणारी नागरी सामाजिक वनीकरणाची कामे.

२१) महानगरपालिकेत लोक वर्गणीपोटी सुचविलेल्या तरतुदी. उदा. पाणी पुरवठयाच्या लाईन, बीज पुरवठा इ. साठी अनामत ठेव (Security Deposit) भरणे इ.

२२) महानगरपालिका क्षेत्रात मोकळ्या जागेचे मैदानात / उद्यानात रुपांतर करणे व त्यास सरेचे कुंपण करणे (मोकळ्या जागेचे मैदानात / उद्यानात रुपांतर फवारणे व तारेचे कुंपण घालणे ही कामे वेगवेगळी न समजता एकाच कामाचा भाग म्हणून समजण्यात यावी.) जुन्या कुंपणाऐवजी नवीन कुंपण घालणे या कामात अनुद्येय रहाणार नाही.

२३) महानगरपालिका क्षेत्रातील नद्या, खाडया येथे जलवाहतुकीच्या उपयोगासाठी सध्या उतारु धक्का अस्तित्त्वात नाही तेथे उत्तारु धक्के बांधणे, या धक्क्यांची देखभाल करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची राहील.

२४) डोंगर उतारावर जेथे घोषित गलिच्छ वस्त्या असतील तेथे डोंगरावरील दरडी कोसळू नयेत म्हणून संरक्षक भिंत बांधणे तसेच समुद्राच्या नदीकाठी जेथे घोषित गलिच्छ वस्त्या असतील तेथे संरक्षक भिंती बांधणे.

२५) महानगरपालिका यांच्या मालमत्तेवर किंवा प्रकल्पांवर अतिक्रमण न होण्याच्या दृष्टीने कंपाऊंड बांधणे.

२६) महानगरपालिका क्षेत्रात स्मशानभूमीमध्ये खालिलप्रमाणे कायमस्वरुपाच्या सुविधा पुरविणे :-

 • लोकांना बसण्यासाठी शेड्स बांधणे.
 • लोकांना बसण्यासाठी बाकडी टाकणे
 • हातपाय धुण्यासाठी पाणी पुरवठयाची सोय करणे.
 • आवश्यकतंप्रमाणे प्रेतांच्या दहनासाठी स्टँड्स बांधणे.

२७) महानगरपालिका क्षेत्रात नद्या व तळी येथे सार्वजनिक उपयोगासाठी कपडे धुण्यासाठी घाट बांधणे.

२८) महानगरपालिकांच्या हद्दीत सार्वजनिक उपयोगासाठी संडास बांधणे, हे संडास महानगरपालिका यांच्या मालकीचे असतील व त्यांच्या देखभालीची जबाबदारी संबंधित संस्थेला घ्यावी लागेल. तसेच हे संडास सार्वजनिक उपयोगासाठी उपलब्ध असावेत.

२९) घोषित केलेल्या गलिच्छ  वस्त्यांमध्ये म्हाडा किंवा महानगरपालिका यांनी बांधलेल्या जुन्या सार्वजनिक संडासाची दुरुस्ती करणे,

३०) सार्वजनिक उपयोगासाठी मुताऱ्या बांधणे.

३१) प्राथमिक शाळा खोल्यांच्या आवारात संडास / मुतारी बांधणे.

३२) डोंगरी भागातील रस्त्यांच्या वळणावर, नदीच्या काठावर व उघडया विहिरीवर संरक्षक भिंती / कठडे बांधणे :-

सदर कामांच्या देखभालीची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची राहील. त्याप्रमाणे त्या संस्थांकडून देखभाल करण्याचे हमीपत्र घेण्यात यावे.

३३) महानगरपालिकांच्या तसेच शासन मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांसाठी संगणक खरेदी, संगणकाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित शाळांची राहील.

३४) दिनाक २७ जानेवारी, २००१ पूर्वी अनधिकृत वस्यांमध्ये नगरसेवक निधीतून केलेल्या कामाच्या देखभाल दुरुस्तीसाठी.

हेही वाचा – ग्रामपंचायत सरपंच, उप-सरपंचाच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य विषयीची सविस्तर माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.