वृत्त विशेषपोटनिवडणूकविधानसभा

अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीसाठी १४ उमेदवारांची नामनिर्देशने वैध

महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून याकरिता एकूण १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री.प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे व त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे :

१. श्रीमती ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)

२. श्री.मुरजी कानजी पटेल (भारतीय जनता पार्टी)

>

३. श्री.राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी)

४. श्री.बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स)

५. श्री.मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)

६. श्री.चंदन चतुर्वेदी (अपक्ष)

७. श्री.चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष)

८. श्री.निकोलस अल्मेडा (अपक्ष)

९. श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष)

१०. श्री.पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष)

११. श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)

१२. श्री.मिलिंद कांबळे (अपक्ष)

१३. श्री.राजेश त्रिपाठी (अपक्ष)

आणि

१४. श्री.शकिब जाफर ईमाम मलिक (अपक्ष).

याबाबत अधिक माहिती देताना मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी सांगितले की, आज छाननीअंती १४ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. तर येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

याचबरोबर जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या या पोटनिवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहनही मतदारांना केले आहे.

हेही वाचा – अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ३ नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.