वृत्त विशेषसरकारी योजना

पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनेचे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे बाबत सूचना

पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या (गाई /म्हशी, शेळ्या, मेंढ्या, व कुक्कूट पक्षी वाटप) योजनेचे दिनांक : – ०४ डिसेंबर २०२१ ते दिनांक : – १८ डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करणे बाबत प्रेसनोट दिलेली होती.

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नाविण्यपूर्ण योजनांतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत दुधाळ गाई म्हशींचे गट वाटप करणे, शेळी – मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२१-२२ या वर्षात राबविण्यात येत आहे.

ज्या लाभार्थ्यांची या योजनेंतर्गत निवड करण्यात आली आहे (प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यासह), अशा लाभार्थ्यांनी दि. १२ जानेवारी २०२२ (सकाळी १०.०० पासून ते दि. १६ जानेवारी २०२२ (रात्री १२.०० वा. पर्यंत) होती ती मुदत आता १९ जानेवारी २०२२ रात्री १२ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे, या कालावधीत पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत.

निवड झालेल्या (प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांसह ) लाभार्थ्यांनी दि. १६ जानेवारी २०२२ रात्री १२.०० वा. पर्यंत होती ती मुदत आता १९ जानेवारी २०२२ रात्री १२ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे, या विहित मुदतीत कागदपत्रे अपलोड करण्याची संबंधित लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. लवकरात लवकर कागदपत्रे अपलोड करा, कारण कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अंतिम निवड केली जाईल.

>

सूचना: अमरावती व भंडारा या दोन जिल्ह्यांसाठी कागदपत्रे अपलोड करण्यास स्वतंत्र विंडो देण्यात येईल व त्याची तारीख लवकरच कळवण्यात येईल.

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी कालावधी:  दि. १२ जानेवारी २०२२ (सकाळी १०.०० पासून ते दि. १६ जानेवारी २०२२ (रात्री १२.०० वा. पर्यंत) होती ती मुदत आता १९ जानेवारी २०२२ रात्री १२ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

पशुसंवर्धन विभागाची अधिकृत पोर्टल: https://ah.mahabms.com/

पशुसंवर्धन विभागाचे अधिकृत अप्लिकेशन: पशुसंवर्धन – AH – MAHABMS

बंधपत्राचा नमूना PDF फाईल: बंधपत्राचा नमूना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

कागदपत्रे अपलोड करण्यापुर्वी महत्वाच्या सूचना:

1. महत्वाची सूचना – कागदपत्रे अपलोड क्षमता १०० के.बी. पर्यंत असावी, “jpg, JPG, jpeg, JPEG, png, PNG” या प्रकाराचे निवडावे या प्रमाणात असावी.
2. अर्जं प्रतीक्षाधीन ठरल्यानंतरच कागदपत्र विहीत वेळेतच कागदपत्रे अपलोड करता येतील
3. अर्जदार नोंदणीच्या वेळेस देण्यात आलेल्या आधारकार्ड नंबर व पासवर्ड भरून लॉगिन करा या बटन वर क्लिक करणे.
4. “निवडा” या बटन वर क्लिक करून कागदपत्र अपलोड करावीत
5. कागदपत्र अपलोड करताना फाइल निवडून घ्यावी व save करण्यापूर्वी शेजारी दिलेल्या विंडो मध्ये अपलोड केलेल्या कागदपत्राची खात्री करून नंतरच save करावी.
6. कागदपत्र जतन करण्यापुर्वी ते योग्य आहेत याची खात्री करून घ्यावी.
7. योजनेच्या लाभार्थी निवडीच्या निकषानुसार, अपलोड केलेल्या कागदपत्रा व्यतिरिक्त अनुषगिक अतिरिक्त कागदपत्राची मागणी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिति / संबधित पशूसवर्धन अधिकारी यांनी केल्यास ती कागदपत्रे उपलब्ध करून देणे लाभार्थ्यास बंधनकारक आहे.

संपर्क:

योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री/संपर्क क्रमांकावर अधिक माहिती घेता येणार आहे. टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी ( विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

  • कॉल सेंटर संपर्क – 1962 (10AM to 6PM).
  • टोल फ्री संपर्क – 18002330418 (8AM to 8PM).

संपर्क: योजने संदर्भात अडचण असल्यास आपल्या जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्याशी संपर्क साधण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – राष्ट्रीय पशुधन योजना (NLM- National Livestock Mission) 2021-22

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनेचे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे बाबत सूचना

  • Mogal moin beg gulab beg

    Best for farming

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.