गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन
आपण या लेखामध्ये गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार ऑनलाईन कसे बघायचे ते पाहणार आहोत. गावामध्ये कोण कोणाच्या जमिनीची खरेदी-विक्री करतो, कधी खरेदी करतो, तसेच कोणी जमिन मोजणीसाठी नोटीस पाठवली आहे, फेरफार नमुन्यात वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणं अशा फेरफार नोंदीची आणि त्याच्या बदलांची सविस्तर माहिती आता आपण घरबसल्या ऑनलाईन पाहणार आहोत
गावामध्ये फेरफार म्हणजेच गाव नमुना-6 हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण प्रत्येक व्यक्तीचा जमीन अधिकार अभिलेखात जे बदल होतात, त्याची नोंद या फेरफारा मध्ये ठेवली जाते.
तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस:
जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार ऑनलाईन पाहण्याठी सर्वात आधी खालील “आपली चावडी” हि वेबसाईट ओपन करायची आहे.
https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi
आता आपण हिथे आपल्या गावातील फेरफार नोंदी कशा जाणून घ्यायच्या ते पाहूया.
सर्व प्रथम येथे जिल्हा निवडा हा पर्याय आहे. त्याखालील जिल्हा या रकान्यासमोर तुम्हाला आपला जिल्हा निवडायचा आहे, तालुका या रकान्यासमोर तालुका निवडायचा आहे, तर गावाच्या रकानासमोर गावाचं नाव निवडायचं आहे.
वरील सर्व माहिती भरून झाली की “आपली चावडी पहा” या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर आपल्यासमोर गावातील फेरफाराच्या नोंदी ओपन होतील.

आपली चावडी उपक्रमाअंतर्गत खालील 3 प्रकारच्या डिजिटल सुविधा नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत.
- फेरफाराची नोटीस:
- फेरफाराची स्थिती:
- मोजणीची नोटीस

1) फेरफाराची नोटीस:-
आता आपण पाहू शकतो की, फेरफार नंबर सुरुवातीला दिलेला असतो. त्यानंतर फेरफाराचा प्रकार म्हणजे शेतमजिनीवर बोजा चढवला किंवा कमी केला आहे काय, वारस नोंद केली आहे काय, जमीन खरेदी केली आहे काय, याप्रमाणे प्रकार नोंदवलेला असतो. त्यापुढे फेरफाराचा दिनांक, हरकत नोंदवण्याचे शेवटची तारीख आणि ज्या सर्वे किंवा गट क्रमांकशी संबंधित जमिनीचा व्यवहार झाला आहे तो सर्वे किंवा गट क्रमांक यांची माहिती दिलेली असते.
आता आपण सध्याचा म्हणजेच 07/12/2020 ला नोंदवलेल्या फेरफाराविषयीची माहिती जाणून घेऊया.
या फेरफाराचा नंबर 982 असून फेऱफाराचा प्रकार वारस असा आहे. 487 व इतर या गट क्रमांकाशी संबंधित हा फेरफार आहे.
यासमोरील पहा या पर्यायावर क्लिक केल्यास तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
गाव नमुना 9 म्हणजेच फेरफाराची नोटीस असं या पेजचं शीर्षक आहे.
यामध्ये सुरुवातीला तालुक्याचं नाव आणि त्यापुढे गावाचं नाव नमूद केलेलं असतं. आता ही फेरफार नोटीस तीन रकान्यांत विभागलेला आहे.
- पहिल्या रकान्यात फेरफाराचा नंबर दिलेला असतो.
- दुसऱ्या रकान्यात जमीन संपादित केलेल्या अधिकाराचं स्वरूप सांगितलेलं असून त्यामध्ये जमिनीच्या कोणत्या प्रकारचा व्यवहार झाला आणि तो कोणाकोणात झाला, याविषयीची सविस्तर माहिती दिलेली असते.
- तिसऱ्या रकान्यात शेतजमिनीचा गट क्रमांक दिलेला असतो.
त्यानंतर त्याखाली या फेरफार नोंदीशी संबंधित काही हरकत असल्यास ती स्थानिक तलाठ्याकडे 15 दिवसांच्या आत कळवावी, अन्यथा तुमची कोणतीही हरकत नाही, असं समजलं जाईल, अशी सूचना तिथं दिलेली असते.
2) फेरफाराची स्थिती:
फेरफाराची स्थितीमध्ये फेरफाराच्या नोटीशीवर कुणी हरकत घेतली आहे का, हरकतीचा शेरा आणि तिचा तपशील दिलेला असतो. हरकतीसाठी 15 दिवसांचा अवधी दिला जातो. या कालावधीत कुणी हरकत घेतली नसेल तर फेरफारावरील नोंद प्रमाणित केली जाते आणि मग ती सातबाऱ्यावर नोंदवली जाते.
3) मोजणीची नोटीस:
मोजणीची नोटीस या पर्यायामध्ये तुमच्या गावात जमीन मोजणी कुणी आणली आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते. यामध्ये मोजणीचा प्रकार, मोजणीचा रेजिस्ट्रेशन क्रमांक, तालुका आणि गावाचं नाव, ज्या गट क्रमांकावर मोजणी करायची आहे तो गट क्रमांक, मोजणीचा दिनांक आणि मोजणीस येणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव आणि मोबाईल क्रमांक दिलेला असतो. यानंतर शेतजमिनीचे लगतचे खातेदार आणि सहधारक यांची माहिती नमूद केलेली असते.
हेही वाचा – जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!