वृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील खुल्या प्रवर्गातील जे गुणवंत विद्यार्थी पदव्युत्तर पदविका व पीएच.डी अभ्यासक्रमासाठी THE (Times Higher Education) /QS (Quacquarelli Symonds) Ranking २०० च्या आतील असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल अथवा प्रवेश घेतील अशा २० विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.

या शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या dtemaharashtra.gov.in या संकेत स्थळावरून सुरु करण्यात आलेली आहे.

तसेच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये परदेशातील विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील वर्ष २०२१-२२ करीता अर्ज करण्याची संधी देण्यात येत आहे. मात्र अशा विद्यार्थ्यापैकी ज्यांची निवड होईल त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ( प्रथम वर्ष) वगळता पुढील अभ्यासक्रमाच्या मान्य कालावधीसाठी शिष्यवृत्ती देय राहील.

या योजनेच्या लाभासाठी उमेदवारांच्या व त्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून रुपये ८.०० लाख इतकी करण्यात आलेली आहे.

इच्छुक उमेदवारांनी https://www.foreignscholarship2021.dtemaharashtra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाचा असून अर्ज भरण्यासाठीची अंतिम मुदत दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे.

तसेच उमेदवारांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत मूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे यांच्य साक्षांकित प्रतिसह पडताळणीसाठी विभागीय सहसंचालक यांचे कार्यालयात २० ऑक्टोबर २०२१ सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमा करणे आवश्यक आहे, असे सहसंचालक उच्च शिक्षण, मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

हेही वाचा – दहावी-बारावी मार्च 2022 च्या थेट खाजगी परिक्षेसाठी १७ नंबर फॉर्मची ऑनलाईन नोंदणी सुरु (10th-12th Online Registration of Form No. 17)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.