सरकारी कामेवृत्त विशेष

पॅनकार्ड आधार कार्डला लिंक कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया (Link to PAN Card Aadhar Card)

पॅनकार्ड व आधार कार्ड हे सर्वांसाठी खूप महत्वाचे दस्तऐवज आहेत. अनेक सरकारी कामांसाठी पॅनकार्ड व आधार कार्ड हे लागतेच. पण आता सरकारच्या नवीन नियमानुसार पॅनकार्डला आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे व हे सर्वांसाठी अनिवार्य आहे. तसेच मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ३१ मार्च, २०२२ पर्यंत हे काम तुम्हाला पूर्ण करावं लागेल व असे जर नाही केले तर पॅनकार्ड निष्क्रिय होईल.

आयकर विभागाच्या मते ३१ मार्च, २०२२ नंतर जर तुम्ही निष्क्रिय पॅनकार्ड वापरत असाल, तर इनकम टॅक्स कायदा सेक्शन 272B अंतर्गत 10,000 रुपये दंड भोगावा लागेल. तसेच ३१ मार्च, २०२२ पर्यंत कार्डधारकांनी जर पॅनकार्ड आणि आधार कार्डला लिंक नाही केलं तर पॅनकार्ड निष्क्रिय होईल.

पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करण्याची ऑनलाईन प्रक्रिया: (Link to PAN Card Aadhar Card)

1) पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करण्यासाठी सर्व प्रथम खालील इन्कम टॅंक्सची वेबसाईट ओपन करा.

https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar

2) त्यानंतर आपले पॅनकार्ड नंबर,आधार नंबर, नाव आणि मोबाईल नंबर टाका.

३) आधार कार्ड वर फक्त जन्म वर्ष असेल तरच “I have only year of birth in Aadhaar card” या पर्यायावर क्लिक करा, पूर्ण जन्म तारीख असेल तर ह्या पर्यायावर क्लिक करू नका.

४) पुढे “I agree to validate my Aadhaar details” या पर्यायावर क्लिक करा.

3) त्यानंतर Link Aadhar (लिंक आधार) या पर्यायावर क्लिक करा म्हणजे तुमचे आधार पॅनकार्ड लिंक करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.

Link Aadhaar
Link Aadhaar

टीप –

  • पॅन नुसार नाव, जन्म तारीख आणि लिंग आपल्या आधार तपशीलांच्या आधारे मान्य केले जाईल.
  • कृपया खात्री करुन घ्या की “आधार क्रमांक” आणि “आधार नुसार नाव” तुमच्या आधार कार्डावर छापल्यासारखेच आहे.

आधार कार्ड -पॅनकार्ड लिंक झाले किंवा नाही ते कसे पाहायचे ? (Link Aadhaar Status)

1)आधार कार्ड-पॅनकार्ड लिंक झाले किंवा नाही ते पाहण्यासाठी खालील इन्कम टॅंक्सची वेबसाईट ओपन करा.

https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/link-aadhaar-status

2) वेबसाईट ओपन झाल्यानंतर आधार कार्ड आणि पॅनकार्ड नंबर टाका

४) त्यानंतर ‘View Link Aadhaar Status’ वर क्लिक करा.

Link Aadhaar Status
Link Aadhaar Status

आता तुम्हाला पॅनकार्ड आधार कार्डला लिंक झाले किंवा नाही ते दिसेल.

हेही वाचा – 5 मिनिटात मोफत पॅन कार्ड काढा – Instant e-PAN वाटपाची सर्वसाधारण योजना

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.